Trending

6/recent/ticker-posts

११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा - अजित पवार

११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा - अजित पवार
३१ मार्चअखेर राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांचा समावेश...मुंबई 
मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात  ५ हजार ४०७ कोटी १३ लाख, तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार ५५९ कोटी ८० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या