Top Post Ad

अस्पृश्य मुळात कोण

#अस्पृश्य_मुळात_कोण_?


काल ८ तास अभ्यासाच्या कालावधी मध्ये जो अभ्यासक्रम आम्ही राबवला त्यात मी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लिखित अस्पृश्य मूळचे कोण ? या ग्रंथाचा अभ्यास केला. या ग्रंथा मध्ये बाबासाहेबांनी शूद्र पूर्वी कोण ? आणि त्यांना हिंदी आर्य समाजामध्ये चौथ्या क्रमांकाच्या वर्णाचे स्थान कसे प्राप्त झाले ? याच्या मागचा इतिहास उगड केला आहे. बाबासाहेबांच्या १९४६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रभांधाचाच हा ग्रंथ म्हणजे उत्तरार्ध होय.


वर्ण व्यवस्था मध्ये चार वर्ण आहेत.  १. ब्राम्हण    २. क्षत्रिय     ३. वैश्य     ४. शूद्र    या चार वर्णाच्या बाहेर एक मोठा समूह आहे आणि तो म्हणजे अस्पृश्य आणि आदिवासी समाज.



अस्पृश्य मुळात कोण ? ह्या ग्रंथात बाबासाहेबांनी, अहिंदूतील अस्पृश्यता ?, हिंदूतील अस्पृश्यता ?, अस्पृश्य लोक गावाबाहेर का राहतात ?, अस्पृश्य हे वाताहात झालेले लोक आहेत का ?, अन्यत्र अशी उदाहरणे आहेत का?, अशा विभक्त वसाहती अन्य देशातून नष्ट कशा झाल्या ?, अस्पृश्यतेचे मूळ :- वंशभेद ?, अस्पृश्यतेचे मूळ :- उद्योगधंदे ?, अस्पृश्यतेचे मूळ :- बौद्ध धर्माचा तिरस्कार ?, अस्पृश्यतेचे मूळ गोमास भक्षण ?, हिंदूंनी गोमस कधी ही खाल्ले नाही का ?, ब्राह्मणेतरांना गोमास भक्षणाचा त्याग का केला ?, ब्राह्मण शाकाहारी कशामुळे बनले ?, गोमास भक्षणाने वाताहत झालेले लोक अस्पृश्य कसे बनले ?, अशुद्ध आणि अपवित्र ?, वाताहत झालेले लोक अस्पृश्य केव्हा बनले ?, हे सगळे महत्त्वाचे मुद्दे मांडले, की जर एखाद्या ब्राम्हण पांडीत्याने हे मुद्दे वाचले तर तो याचा मनापासून तिरस्कार करीन आणि चार चारचौघात तो हे मुद्दे उठु ही देणार नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की, ज्या वेळेस अस्पृश्य लोकांवर आत्यचार होत होते, ज्या वेळेस त्यांचां स्पर्श ही ब्राह्मणाला अपवित्र करीत होतं, ज्या लोकसमुहला हे जनावरांपेक्षा खालचा समजत होते त्या लोक समूहाच्या त्रसाकडे ज्यांनी दुर्लक्ष केलं, असपृश्यां बद्दल चारचौघात चर्चा करण्याची हिंदू संस्कृतीला लाज वाटत. कारण तसे करण्याने हिंदू संस्कृतीत अस्पृश्यते सारख्या नीच व बदफैली पद्धती किंवा सामाजिक बंधने चालू आहेत हे परराष्ट्रीय लोकांना माहीत होईल, अशी त्याला भीती वाटते.


व्हाॅल्टेअर हा कॅथाॅलिक पंथीय चर्चच्या छायाखलीच वाढला होता तरीसुद्धा बौद्धिक प्रामाणिकपणाला जागून त्याने कॅथाॅलिक पंथाच्या विरुद्ध बंड अभारले पण ब्राम्हण समाजात अजूनही व्हाॅल्टेअर निर्माण झाला नाही आणि कोणी अब्राम्हण निर्माण होत असेल तर त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचले जातात अस बाबासाहेब मांडतात.  एखाद्या ऐतिहासिक अभ्यासावर कसे संशोधन केले पाहिजे याची माहिती जर पाहिजे असेल तर त्या व्यक्तीने नक्कीच हे पुस्तक वाचाव.  जर तुम्हाला अस्पृश्य मुळचे कोण? ही माहिती हवी असेल तर त्याने नक्कीच ह्या पुस्तकावर अभ्यास करावा. ही माझी विनंती.


-किर्ती कांबळे


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com