मुंबईच्या हवामानात कमालीची सुधारणा
मुंबई :
कोरोनाने देशभरातील जनजीवन ठप्प केले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि रुग्णांची संख्या आटोक्यात राहावी, यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यातही अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतूक व्यवस्था बंद आहे. अपवाद वगळता बहुतांश उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे मुंबईच्या प्रदूषणात लक्षणीय घट झाली आहे. अनेक भागांमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या हवेची नोंद करण्यात आली. सफर या हवेच्या गुणवत्ता नोंदवणाऱ्या संस्थेने ही माहिती दिली आहे.
मुंबई शहरासह उपनगरातील हवेचा दर्जा कमालीचा सुधारला आहे. भांडुप, कुलाबा, माझगाव, वरळी, बोरिवली, बीकेसी, चेंबूर आणि अंधेरी या भागातील हवेची गुणवत्ता उत्तम आणि समाधानकारक नोंदवण्यात आली आहे. मालाड, नवी मुंबई या परिसरातील हवा मध्यम दर्जाची नोंदवण्यात आली आहे. लॉकडाऊन जारी होण्यापूर्वी मुंबईतील हवेचा दर्जा खालावला होता. शिवाय, हवेत प्रदूषण ही मोठ्या प्रमाणात होते, पण आता हवेचा दर्जा सुधारला असून ही मुंबईकरांसाठी सकारात्मक बाब आहे.
0 टिप्पण्या