Top Post Ad

सोन्याच्या किंमती वाढण्याचा अंदाज

कच्च्या तेलाच्या किंमतीत ५ टक्के वाढ : एंजल ब्रोकिंग


सोन्याच्या किंमती ४६,०००/१० ग्राम पर्यंत वाढण्याचा अंदाज


मुंबई


      मागील आठवड्यात, स्पॉट गोल्डच्या किंमतीत २.५ टक्क्यांची वाढ झाली. मध्यवर्ती बँकांकडून जागतिक पातळीवर उपाययोजनांच्या अपेक्षेच्या तुलनेत अमेरिकी डॉलर इंडेक्समध्ये नकारात्मकता असल्याने सराफा धातूंच्या किंमतींना आधार मिळाला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने गेल्या आठवड्यात बुधवारी गेल्या महिन्यातील धोरणात्मक बैठकीचा अहवाल जाहीर केला. अमेरिकी फेडरलने प्रभावी धोरणांची आवश्यकता जोखून त्यानुसार पावले उचलली. या आठवड्यात सोन्याच्या किंमती ४६,०००/१० ग्राम पर्यंत वाढतील, असा अंदाज माल्या यांनी व्यक्त केला.


गेल्या आठवड्यात एलएमईवरील बेस मेटलच्या किंमतींनी केवळ अॅल्युमिनिअम वगळता सकारात्मकता दर्शवली. अॅल्युमिनिअमवर मागणीचा दबाव कायम राहिल्याने त्याचे दर गेल्या आठवड्यात ०.४% नी कमी झाले होते. इटली, फ्रान्स, स्पेनमधील मृतांच्या संख्येत घट आणि चीनमध्ये नोंद झालेल्या नवीन प्रकरणांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याकडे कल दर्शवला आहे. दरम्यान, अमेरिका, युरोझोन आणि जपाननी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजनामुळे औद्योगिक धातूंच्या किंमती सुधारतील आणि घसरणीवरही मर्यादा येतील असा विश्वास  माल्या यांनी व्यक्त केला.  


गेल्या आठवड्यात, पुरवठ्यासंबंधी चिंता कमी झाल्यामुळे गेल्या आठवड्यात क्रूडचे दर ४ टक्क्यांनी कमी झाले. जगभरातील मागणीच्या अभावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या. तसेच अमेरिकेतील ऊर्जा माहिती प्रशासनाडून मिळालेल्या अहवालानुसार, कच्च्या साठ्यात गेल्या आठवड्यात १५ दशलक्ष बॅरलची नोंद झाली असून त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीवर दबाव वाढला. अमेरिकेत रिफायनरी बंद असल्याने तसेच कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कच्च्या तेलाची मागणी घटली.


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलनचे प्रमुख विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले की, ओपेक+ बैठकीमुळे आता परिस्थिती काही प्रमाणात बदलली आहे. ओपेक+ ग्रुपिंगने ऐतिहासिक उत्पादन कपातीची घोषणा केली. जागतिक संघटनेने ९.७ दशलक्ष बॅरल उत्पादन घटवण्यावर सहमती दर्शवली आहे. त्यानंतर उत्पादनावरील हे निर्बंध एप्रिल २०२२ पर्यँत शिथिल केले जातील. या घोषणेच्या पार्श्वभूमीवर,कच्च्या तेलाच्या किंमतीत ५ टक्के वाढ झाली आणि नजीकच्या काळात हे दर वाढतेच असतील.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com