Trending

6/recent/ticker-posts

भारताच्या स्पेशल फोर्सेस मधिल जांबाज जवानांनी एक बहुमुल्य कामगिरी

भारताच्या स्पेशल फोर्सेस मधिल जांबाज जवानांनी एक बहुमुल्य कामगिरी

 

नवी दिल्ली

 

अवघा देश कोरोनाशी युध्द लढत असताना तिकडे भारताच्या स्पेशल फोर्सेस मधिल जांबाज जवानांनी एक बहुमुल्य कामगिरी करून दाखवली आहे. परंतु या अत्यंत महत्वाच्या कामगिरीकडे ना मिडीयाचे लक्ष गेलय ना नेल्सवर याविषयी देशवासियांना अवगत केलय. स्पेशल फोर्सेसचे कमांडो म्हणजे केवळ म्हणायला मनुष्यप्राणी. अफाट ताकदीची ट्रेनिंग घेऊन देशरक्षणासाठी तयार झालेले हे अद्भुत योध्दे असतात. जम्मूकाश्मिर मधे LOC जवळ दहशतवादी घुसखोरी करणार असल्याची पक्की खबर मिळाल्यावर भारतिय सैन्यदलाने सर्च ऑपरेशन सुरू केल. पण प्रचंड प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टीमुळे आणि दृष्यमानता जवळजवळ शुन्यावर आल्याने या कामगिरीसाठी SFचे राट्रूपर्स पाठवण्याचा निर्णय झाला.

या अत्यंत कठिण कामगिरीसाठी सुभेदार संजिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली हवालदार देवेंद्र सिंग, आणि ३ राट्रूपर्स छत्रपालसिंग, बाळकृष्ण व अमितकुमार अशी पाच जणांची टीम कामाला लागली. स्पेशल फोर्सेस मधिल हे पाचही जण अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीदेखिल खंबीरपणे एकएक पाऊल टाकत या दहशतवाद्यांच्या मागावर निघाले होते. बर्फामधे दहशतवाद्यांच्या पावलांच्या उमटलेल्या ठशांवरून त्यांनी हुषारीने माग काढला. परंतु एकेठिकाणी ठिसूळ बर्फावरून यापैकी काहीजण बरेच खाली दरीत कोसळले. दुर्दैवाने जिथे कोसळले तिथेच दहशतवादी लपून बसले होते. अर्थातच दहशतवाद्यांकडून अगदी जवळून बेछूट फायरींग सूरू झाले. परंतु आपले कमांडो एवढे बहाद्दूर होते की त्याही परिस्थीती मधे त्यांनी तुफान मुकाबला केला आणि आपल्या विशेष रायफलमधून क्रॉसफायर चालु केले. या कारवाई मधे एकएक करत पाचही दहशतवादी ठार झाले

परंतु  भारताने आपले अत्यंत तरूण,जांबाज पाचही कमांडो गमावले. हुतात्मा राट्रूपर अमितकुमार साहेब यांच्या छातीत १५ बुलेट फायर झाल्या परंतु आश्चर्यकारक पणे त्यांनी तशाही अवस्थेत दोन दहशतवाद्यांना खलास केले. हुतात्मा अमितकुमार साहेब यांचा विवाह १४ एप्रिल रोजी ठरला होता. पण कोरोनामुळे तो पुढे क्टोबरपर्यंत ठकलण्यात आला. देशाला आपली असलेली गरज ओळखून अमितकुमार साहेब आपल्या कर्तव्यावर त्वरीत हजर झाले. असे आहेत आपल्या देशाचे हे जवान. त्यांच्या कर्तृत्वाची ना कुठल्या मेलला बातमी ना कुठल्या पेपर मधे कव्हरेज. इंटरनेटच्या माध्यमातून जास्तितजास्त माहिती जमा करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. जेणेकरून आपल्या शूर जवानांची यशोगाथा कोरोनाच्या कहरामधे सुध्दा आपल्याला समजावी. 

Post a Comment

0 Comments