Top Post Ad

माझी हत्या करण्याचे ठरले; आव्हाडांचा दावा




घराची रेकी झाली; माझी हत्या करण्याचे ठरले; आव्हाडांचा दावा

 


 





मुंबई:

 

काही लोकांनी माझ्या घराची रेकी केली. माझी हत्या करण्याचंही ठरलंय, असा दावा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना तुमचा दाभोळकर करू अशा धमक्या येत असतानाच आव्हाड यांनी  केला आहे. ट्विटरवरून त्यांनी हा दावा केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून मला ट्रोल केलं जातंय. अश्लील भाषेत टीका करताना धमक्याही दिल्या जात आहेत. माझ्या घराची रेकीही करण्यात आली. ही रेकी कुणी केली? माझी हत्या करण्याचेही ठरले आहे. कोण आहेत ते? असा सवाल करताना पोलीस त्यावर निश्चितच कारवाई करतील, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. तसेच आईच्या आशीर्वादामुळेच मी सुखरूप आहे, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या ट्विटमध्ये आव्हाड यांनी त्यांना धमकावणाऱ्या पोस्टही पोस्ट केल्या आहेत. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, ठाणे पोलीस, मुंबई पोलीस आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांना टॅग केलं आहे. आव्हाड यांच्याविरोधात अश्लील भाषेत पोस्ट टाकल्याबद्दल आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी एका अभियंत्याला चोप दिला होता. त्यामुळे भाजपने आव्हाड यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. मात्र, आव्हाड यांनी या अभियंत्यांचे सर्व कारनामे उघड करून भाजपलाच अडचणीत आणले आहे. तसेच ज्या तरुणाने त्याला माझ्या देखत आणि माझ्या माणसांनी मारहाण केल्याची तक्रार केली त्याला मी ओळखत नाही. माझ्या विरोधात गेली ३ वर्षे हा अभियंता नाही नाही त्या पोस्ट करतोय, हे माझे कार्यकर्ते मला अनेकदा सांगायचे. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. मी सतत २४ तास माझ्या मतदारसंघात आणि सोलापूर जिल्हयात कामात व्यस्त आहे. अभियंत्याला मारहाण हा प्रकार मला सोशल मीडियातून कळाला असा खुलासाही आव्हाड यांनी केला आहे.

 

 


 

 

 


 

 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com