बहुजन संग्रामतर्फे गरीब, श्रमजीवींना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
मुंबई
बहुजन संग्राम या महाराष्ट्र व्यापक सामाजिक, विधायक, संघटनेतर्फे १४ एप्रिल २०२० पासुन ते ३ मे २०२० पर्यंत अर्थात लॉकडावून उठेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर हातावर पोट असलेल्या ५ हजार गरीब, श्रमजीवी, परीत्यक्ता,निराधार महिला, पुरुषांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात येनार आहे. त्याचाच एक भाग म्हणून १४ एप्रिल २०२० रोजी कांदिवली, क्रांतीनगर, मुंबई येथे सुमारे २०० गरजू महिलांना बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भीमराव चिलगांवकर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तू वाटपाचा प्रारंभ सोशल डिस्टन्सिंगचे अनुपालन करून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बहुजन संग्रामच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रंजनाताई कांबळे, मुंबई प्रदेश संघटक बबन येडे, रवी जाधव, संघटन सचिव विनोद कांबळे, सचिव बाबासाहेब निकाळजे स्थानिक महिला मंडळाच्या अध्यक्षा जेष्ठ कार्यकर्त्या जीजाबाई वासरे , शोभा जाधव, कालिंदा केदारे, आशा बोर्डे, स्नेहा सावंत आदी उपस्थित होते. १४ एप्रिलला या धान्य वाटपाला प्रारंभ झाला असून ३ मे २०२० लॉक डाऊन असे पर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, नाशिक, औरंगाबाद सह संपुर्ण महाराष्ट्र भर बहुजन संग्रामचे पुरूष, महिला कार्यकर्ते सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करुन घरो घरी या महाराष्ट्र व्यापक सामाजिक विधायक संघटने तर्फे सुमारे ५ हजार गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
0 टिप्पण्या