*निःशब्द...
*ताई माझं बाळ वाचवा... मी वर्षभर तुमच्याकडे कामाला येईल...*
📝 वेळ रात्री पावणेदोन वाजेची... हातावर पोट भरणाऱ्या चाकरमान्यांच्या वस्तीत म्हणजे नाशिकच्या चुंचाळे शिवारातील दत्तनगर येथील मजूर महिलेच्या कुटुंबावर बेतलेला प्रसंग...
📝 रात्रीची वेळ... सध्या लॉकडाऊनमुळे वाहने बंद... दत्तनगरच्या मजूर कुटुंबातील गर्भवती महिलेला अचानक वेदना सुरू झाल्या...
📝 सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोंदणी केली होती, मात्र हॉस्पिटलमध्ये पोहचण्यापर्यंत परिस्थिती नव्हती... या कुटुंबासाठी मदत मिळणे अशक्यच होते...
📝 पुढे दिसणारा रस्ताच जणू अंधारलेला... या परिसरात असलेल्या साईसुर्या हॉस्पिटलच्या संचालिका आणि तनिष्का डॉक्टर्स फोरमच्या सदस्या डॉ. चंचलताई साबळे यांच्यापर्यंत ही वार्ता पोहचली...
📝 परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तनिष्का भगिनी देवदूत बनून या मजूर कुटुंबाच्या मदतीला धावल्या... अनेक ठिकाणी कोरोनाच्या भीतीने सर्वत्र चिंतेचे वातावरण असतानाही डॉ. चंचलताई साबळे यांनी कसलेही रिपोर्ट अथवा फाईल रुग्णासोबत नसताना यशस्वीपणे प्रसूती करत कुटुंबाला मोठा आधार देत सामाजिक बांधिलकी जपलीय.
📝 *ताई, आज तुमच्यामुळे माझे बाळ वाचले, मी वर्षभर तुमच्याकडे कामाला येऊन तुमचे बिल परतफेड करेल*, असे म्हणत त्या रडत होत्या...
📝 डॉक्टरांमधील माणुसकी जोपासत कुठलीही फी न घेता मोफत सेवा दिल्याचे या कुटुंबाला कळाल्यावर मात्र मजूर कुटुंब हमसून हमसून रडले...
📝 कुटुंबाच्या चेहऱ्यावर एका बाजूला बाळ जन्माला आल्याचे आनंदाश्रू आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टरांमधील देवदूत भेटल्याने भरून आलेलं मन... या वातावरणात तनिष्का भगिनी डॉ. चंचलताई साबळे यांनाही अश्रू आवरणे कठीण बनले होते...
📝 *रात्री पावणेदोन वाजता माणुसकीला जोपासणारा हा प्रसंग निःशब्द करून गेला... तनिष्का भगिनी देत असलेल्या सामाजिक योगदानाचा नेहमीच अभिमान वाटतो.... अभिनंदन डॉ. चंचलताई साबळे... सलाम तनिष्का..*.
*- विजयकुमार इंगळे*
✌🏻 *तनिष्का भगिनी बनली तिच्यासाठी देवदूत...*
0 टिप्पण्या