उन्हाळ्यातील कैऱ्या करवंद जांभळ, तोरणं, रानमेव्यावर यंदा कोरोनाच्या संकटाचे ढग !
रानमेवा झाला गायब, आदिवासींच्या हक्काच्या रोजगारावर फिरले पाणी
शहापूर
दरवर्षी उन्हाळ्यातील एप्रिल महिन्यात खवय्यांना चाखायला मिळणारी करवंद ,जांभळं ,कैऱ्या ,तोरणं ,हा दाट जंगलात मिळणारा उन्हाळ्यातील खास रान मेवा मात्र यावर्षी बाजारात ग्राहकांना मिळणार नाही कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सर्वत्र लॉक डाऊन असल्यामुळे हा रानमेवा विक्री करण्यासाठी आदिवासी शहापूर अन्य शहरात यंदा येऊ शकला नाही. कोरोना आजाराच्या थैमानामुळे गरीब आदिवासींंचा हक्काच्या रोजगारावर गदा आल्याचे विदारक असे चित्र ठाणे जिल्हयातील ग्रामीण भागात दिसत आहे .रानमेवा विकून मिळणाऱ्या थोड्या बहुत पैशातून कुटुंबाच्या रोजच्या दिनचर्येत हातभार लावणाऱ्या रोजगारावर कोरानाच्या संकटामुळे यंदा पाणी फिरले आहे .
शहापूर तालुक्यातील वासिंद किन्हवली डोळखांब ,खर्डी , कसारा या परिसरातील दऱ्याखोऱ्यांत वास्तव्य करणारे आदिवासी जंगलात भटकंती करुन करवंद ,जांभळं ,कैऱ्या ,तोरणं , आदी रानमेवा गोळा करुन दरवर्षी उन्हाळ्यातील एप्रिल , मे ,महिन्यात शहापूर ,कल्याण ,डोंबिवली ,ठाणे ,शहरात विक्रीसाठी घेऊन येतात मात्र ऊन्हाळ्यातच मिळणारा हा दुर्मीळ रानमेवा यंदा कोरोनाच्या महामारीमुळे विक्री साठी येऊ शकलेला नाही हा रानमेवा सध्या बाजारपेठेतुन हध्दपार झाला आहे . यामुळे गरीब आदिवासींचा रोजगार हिरवला गेला आहे .
रोज २०० रुपयांच्या कमावाईवर फिरले पाणी -- दरवर्षी रानमेवा विक्रीतून आदिवासी महिलांना दिवसभरात २०० ते ३०० रुपयांची कमाई होते हा रान मेवा मोठ्या आवडीने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करतात १० रुपये वाटा याप्रमाणे कैऱ्या ,करवंद , तोरणं ,जांभळं ,यांची विक्री केली जाते हा रानमेवा शहापूरसह कल्याण ,डोंबिवली ,ठाणे ,येथील बाजारपेठेत आदिवासी विक्रीसाठी आणतात या रानमेव्यामुळे उन्हाळ्यात निदान दोन वेळच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटतो असे या व्यवसायातील आदिवासी सांगतात मात्र यंदा कोरोनाच्या ढगामुळे त्यांच्या हक्काच्या रोजगारावर संक्रांत कोसळली आहे .
0 टिप्पण्या