Top Post Ad

आंबेडकरवादाची शास्त्रीय चिकित्सा


आंबेडकरवादाची शास्त्रीय चिकित्सा

 


 

मार्क्सवादी तेलतुंबडे यानां आंबेडकरवादी प्रोजेक्ट करुन जेव्हा आंबेडकरवाद्यांना उसकावणारे पोस्ट्स, लेखमाला सुरू झाले, मार्क्सच्या ऐवजी बाबासाहेबा सोबत (नातं दाखवून भावनिक करण्या हेतु ) त्यांच्या सोबत पोर्टे केलेला फोटो वायरल करण्यात आला तेव्हा हा नवीन आंबेडकरवादी सामान्य कार्यकर्त्यांना शॉकीगं वाटला. चळवळीच्या कोणत्या कॉर्नरवर हा आंबेडकरवादी उभा होता आणि आपल्याला दिसला कसा नाही ? हा प्रश्र्न पडण्याऐवजी आपलं अज्ञान समजून बऱ्याजजणांनी खंतही वाटुन घेतली असेल. त्यांना आंबेडकरवादी म्हणनं  जितकं हास्यास्पद होतं, त्याहीपेक्षा त्यांना दलित विचारवंत म्हणनं हे घृणास्पद तर त्यांनाच आंबेडकरवादाचे शास्त्रीय चिकित्सक म्हणनं हे क्लेशदायक आहे आणि विरोधाभास ही होतं !!

 

फुले-आंबेडकरवाद चळवळीची जननी ही "जातीसंस्थेचे निर्मुलन" आहे. ज्यांना जात ही विषमतेचं कारण आहे व ब्रामणवाद  विषम समाजव्यवस्थेचा शोषक आहे हे मान्य नाही तो फुले-आंबेडकर चळवळीचा भाग होऊच शकत नाही. गांधीवाद्या सारखंच साम्यवाद्यांनी, कम्युनिष्टांनी जातीला सांस्कृतिक घटणा समजत नजर अंदाज केली. प्रो कम्युनिस्ट लेखन करणारे अरूंधती रॉय, आणि तेलतुंबडे यांनी जातीच्या प्रश्नाला बायपास करत आपल्या लेखण्या झिझवल्यात. अरुंधती बाई पेक्षा तेलतुंबडे यांनी नाही म्हटलं तरी जातीच्या प्रश्नावर दोन शब्द जास्तीचे लिहले पण जातीय विषमतेला ब्रामणवाद्यांना धारेवर धरण्याऐवजी, मनुस्मृतिला जबाबदार धरण्याऐवजी उच्चविद्याविभूषित भाऊसाहेबांनी जातीचं मुळं भारतीय संविधानात शोधलं. फक्त एवढचं नाही तर स्वातंत्र भारतात बाबासाहेबानीच "आरक्षणाच्या" नावाखाली जातीसंस्थेचं पुनर्जीवन केलं, यांच्यामुळेच आजचा जातीवाद असल्याचा शेरा त्यांच्या शास्त्रीय चिकित्सेने केला !! जातीवादामुळे आरक्षण की आरक्षणामुळे जातीवाद ? हा प्रश्र्न अगदी बारावीचा मुलगा पण फेसबुकवर विचारतो. मग हाच प्रश्न तेलतुंबडे यांना पडला नसेल काय ? आरक्षण बंद करा तोपर्यंत जातीवाद संपणार नाही, व तोपर्यंत लोकांना वर्गलढ्याची जाणीव होणार नाही हा त्यांचा समज आहे. पण आरक्षण बंद केलं तर सामाजिक व नैसर्गिक प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी व जातीय हत्याकांड रोखण्यासाठी तुमच्याकडे काय कृती कार्यक्रम आहे यावर मात्र त्यांच्या ३५ वर्षाच्या लिखणात कुठंच काही बोध नाही !! मग त्यांच्या या भयाण मार्क्सवादी अज्ञाणाला काय म्हणावं ?

 

यांची शास्त्रीय चिकित्सा एवढी घसरली की नववी पास फुलेंना गुरू माननाऱ्याला म्हणजे बाबासाहेबांना विद्वान तरी कसे म्हणावे ? म्हणुन प्रश्न विचारतोय. शैक्षणिक डिग्र्याचां आणि समाजकार्याचा काय संबंध ? १८३०-४० काळात जितकं शिक्षण त्यांना घेता आलं ते घेतलं, त्याकाळात आय आयटी, आय एम एम सारख्या संस्था नव्हत्याच हे ह्या मार्क्सवाद्याला कळु नये? त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जेव्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षच काय पण त्यांचे संस्थापकही कदाचित शुक्राणुच्या अवस्थेपर्यंत ही विकसित झाले नसतील त्या काळात जोतीराव फुलेनीं अस्पृश्य व स्त्रियांसाठी शिक्षण व सामाजिक समानतेचा लढा उभारला. याचे काहीच मोल नाही का ? तेलतुंबडे यांची ही शास्त्रीय चिकित्सा नसुन कम्युनिष्टांनी त्याच्यांत फुले- आंबेडकर प्रति पोसलेली मत्सर, प्रचंड घृणा आहे. आणि जर, हे मला मान्य नाही पण तरी तेलतुंबडे यांच्या तर्कानेच कोणाला जर गुरु मान्यण्यासाठी त्याची शैक्षणिक पात्रता, डिग्री महत्वाची असेल तर तेलतुंबडेच्या तीन डिग्रासहित, सिताराम येचुरी, करात, अरूंधती रॉय,  डांगे इतकच काय कार्ल मार्क्सच्या डिग्र्या जरी एकत्र केल्या तरी बाबासाहेबांच्या शैक्षणिक डिग्र्या त्यांच्या पेक्षा तीनपट जास्त भरतात. मग बाबासाहेबा ऐवजी तुमच्या अडाणचोटाचं कोण ऐकेल ? हे तेलतुंबडेच्या लक्षात कसं आलं नसेल ? 

 

एका ठिकाणी हे मार्क्सवादी तेलतुंबडे म्हणतात आंबेडकरवाद नावाचा कोणताही ism कोणताही वाद नाही. बाबासाहेबांनी कार्ल मार्क्स सारखं थेअऱ्या लिहल्या नाही. कसं लिहिणार ? कार्ल मार्क्स हा ज्यु होता. त्याचा समाज आर्थिक दृष्ट्या सबळ होता, उद्योग, मिडिया हा युरोप मधे तेच सांभाळत, आणि खरंतर यांच्यामुळेच भांडवलवाद आहे. युरोप मधे भारता सारख्या जातीप्रथा नव्हत्या. शिवाय ज्या ज्यु समाजात तो जन्मला आला तो प्रगल्भ होता त्यांच्या न होणाऱ्या अन्याय अत्याचारा बद्दल त्याला चिंता करायची गरज नव्हती आणि ज्या इंग्लडला राहुन त्यानं त्याचं लिखाण केलं तो देश ही जातीवर आधारित मुल्यमापण करणारा नव्हता. शिवाय तो जे लिहिल ते पटणारं असल्यास सर्व स्थरावर ते स्विकारलंही जाणार होतं. (फुलेना कम्युनिस्ट आजही स्विकारू शकत नाही बाकी विषयच सोडा). आणि कार्ल मार्क्स ने लिखाणा व्यतिरिक्त काहीही केलं नाही. भारतीय समाज व्यवस्था युरोपियन सारखी असती तर बाबासाहेबांनी पण आरामात बसून फक्त लिखाण करत volume वर volume अशा थेअऱ्या लिहल्या असत्या. फक्त लिखाण तर करायचं होतं बाकी नाही !  हे तत्वज्ञानिक स्वरूपाचं सवडीचं लिखाण बाबासाहेबांना कदाचित जगाला मार्क्स पेक्षा ही मोठा मार्क्स देऊन गेला असता पण आपलं दुःख ही व्यवस्थित न मांडु शकणाऱ्या जातीनीं चळवळ मोठी आंदोलनं कशी चालवली असती ?

 

बाबासाहेब ज्या समाजाचं नेतृत्व करत होते तिथं आपण जे जगतो त्याला गुलामी म्हणतात हेच माहीत नव्हतं तर मग चळवळ, आंदोलन हा विषयच दुरचा ठरतो ! पावलापावलावर याला चळवळ म्हणतात, याला आंदोलन म्हणतात हे बाबासाहेबांना त्यांच्या शोषित लोकांना भारताच्या राज्याराज्यांत जाऊन सांगावं लागलं तेव्हा कार्ल मार्क्स सारख्या तत्वज्ञानाच्या थेअऱ्या लिहुन गपगुमान बसणं बाबासाहेबांना कसं परवडलं असतं ? म्हणुन जे कार्ल मार्क्स नी केलं नाही ते बाबासाहेबांनी केलं. ते चळवळीचे कार्यकर्ते बनले, आंदोलने चालवली प्रसंगी जीव धोक्यात घातला !! 

 

तेलतुंबडे यांची शास्त्रीय चिकित्सा सांगते की बाबासाहेब कुठेच कधी ठाम नव्हते. ते धर की सोड वृत्तीचे होते !! म्हणुन भविष्यात त्यांना धरुन चालता येणार नाही. चवदार तळ्याचा सत्याग्रह मग काळाराम मंदिर सत्याग्रह, स्वतंत्र मतदारसंघ नंतर आरक्षित जाग्यावर सहमती, हा पक्ष सोडला मग तो पक्ष धरला, काँग्रेसला विरोध नंतर काँग्रेस सोबत राज्यघटना लिहली वैगरे वैगरे गोष्टी या माणसाला धरसोड वृत्तीच्या वाटल्या आणि म्हणुनच भविष्यात कोणत्याही कारणासाठी "आंबेडकर" कामाचा नाही ! हा त्याचा निष्कर्ष.

 

तेलतुंबडे कोणत्या अंगाने इतिहास वाचत होता आणि त्यांना म्हणणारे चिकित्सक का म्हणत होते हे मला कळाले नाही. चवदार तळ्याचा सत्याग्रह असो की काळा राम मंदिर सत्याग्रह असो, हे फक्त पाण्यासाठी, देवाच्या दर्शनासाठी नाही तर मोहनदास गांधींच्या हिंदु एकतेच्या ढोगांला उघडं पाडण्यासाठी, इंग्रजांना आम्ही हिंदु नाहीत म्हणून स्वंतत्र मतदार संघ मागण्यासाठी तर अस्पृश्यांना संघटित करुन गुलामीची जाणीव करून देऊन त्याच्यां अचेतन मेंदुत संघर्ष पेटवण्यासाठी केले. एका दगडात तीन लक्ष हासील केले. अहिंसावादी गांधींच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा अस्पृश्यांच्या झोपड्या जाळुन, मारायला सुरुवात केली तेव्हा फक्त त्यांना वाचवण्यासाठी बाबासाहेबांना तडजोड करावी लागली, याला धरसोड वृत्ती म्हणत नाही. हा व्यवहारीकपणा होता.

 

बाबासाहेबांच्या चळवळीचा केंद्रबिंदू स्वातंत्र समता बंधुता न्याय हीच तत्व राहिली आहे. त्यांच्या चळवळीच्या पहिल्या दिवसापासून तर आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंतच्या बौद्ध धम्म स्विकारताना ही याच तत्त्वामुळे आपण बौद्ध धम्म स्विकारत असल्याची ग्वाही दिली ! या तत्वाच्या पालणात धरसोड वृत्ती कुठं दिसली ? आणि या धरसोडीमुळे ते भविष्यात वापरता येऊ शकत नाही म्हणानाऱ्याला त्यांच्याच ग्रंथावर आधारित RBI झालेली स्थापना, आणि संविधान दिसत नसेल तर अवघड आहे. इतकच कशाला ? आजही राष्ट्रीय आंदोलनात इतरांना सोडाच पण आंबेडकरवाद नाकारणाऱ्यापण गांधी, मार्क्स नाही तर बाबासाहेबांच्या तस्वीरीच हातात घेऊनच आंदोलने करावे लागतात ! ही relevancy कशाचं धोतक आहे मग ?

तेलतुंबडे यांची चिकित्सा ही शास्त्रीय तर दुरच पण सामान्य चिकित्सा ही म्हणता येणार नाही. खरं तर ही चिकित्सेच्या नावाखाली कम्युनिस्ट ब्रामणवाद्यांच्या वतीने  व्यक्त झालेला आकास, मत्सर होता.  पश्चिम बंगाल, केरळ सारख्या ठिकाणी जिथं कम्युनिष्ठांनी अमर्यादित सत्ता भोगली तिथं sc, st सर्वहारा विकासाच्या कोणत्या टप्प्यात आला याची शास्त्रीय चिकित्सा मार्क्सवादी तेलतुंबडे आणि मार्क्सवादी अरुंधती रॉय यांनी करावी !

आंबेडकरवादाची चिकित्सा करायला इकडे आहेत भरपुर आंबेडकरवादी लोक

तुम्ही तुमचा मार्क्स व ब्रामणवादी मास्क दोन्ही सांभाळावा !! 

बाकी   त्यांच्या "आंबेडकर भविष्यात कामाला येणारा नाही" म्हणताना मी वयाच्या ७ व्या वर्षांपासून मार्क्सवादीच आहे म्हणणाऱ्याला सुद्धा संकटकाळात आपण "आंबेडकरवादीच" आहोत हे म्हणण्याची वेळ येते तेव्हा तुमचाच व्यक्त होत असलेला "आंबेडकरवादाप्रतिचा" आशावाद आम्ही ज्यावर आजपर्यंत विश्र्वास ठेवत आलो त्यावर आणखीनच विश्र्वास वाढत नेतो, हे वेगळं सांगायची गरज पडत नाही.

 

- Rahul Pagare यांच्या वॉल वरून साभार


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com