Trending

6/recent/ticker-posts

श्रमजीवी संघटनेने दिला भुकेल्या आदिवासींना दिलासा

श्रमजीवी संघटनेने दिला भुकेल्या आदिवासींना दिलासा
पालघर


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि आदिवासी बांधवांना याचा सर्वाधिक फटका बसला. रोजच्या कमाईवर ज्यांचे जीवन अवलंबून होते. त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागले. यात सर्वात जास्त ससेहोलपट ही आदिवासी मजूर कष्टकरी बांधवांची झालेली आहे. पालघर ठाणे, रायगड, आणि नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात या लॉकडाऊनमुळे आदिवासींवर उपासमारीची वेळ आली होती. याना आधार द्यायला श्रमजीवी संघटना पुढे सरसावली आहे. आदिवासींच्या प्रश्नावर संघर्ष करणारी संघटना गेले १०-१२ दिवस सातत्याने या भुकेल्या आदिवासींना दिलासा देण्याचे काम करत आहे.


स्वतः विवेक पंडित या मोहिमेचे फिरत आहेत, जव्हार मोखाड्यात आतापर्यंत सुमारे पाच हजार कुटुंबाना तर या चार जिल्ह्यात सुमारे २० हजार कुटुंबाना ८ ते १० दिवस पुरेल इतकी जीवनावश्यक वस्तू संघटनेने वाटप करून एक अनोखा विक्रम केला आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण परिसरातील स्थलांतरित होऊन आलेले मजूर घराकडे परतत असताना त्यांचे प्रचंड हाल होत होते. आपल्या कोवळ्या बालकांसह पायी येत असताना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात त्यांना थांबवून त्यांच्या भोजनाची व्यवस्था, त्यांना आपल्या गावी किंवा सुरक्षित स्थळी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात कार्यकर्ते कुठेही कमी पडले नाही, आपल्या जीवावर उदार होऊन या संकट काळात अहोरात्र काम करणाऱ्या संघटनेच्या सर्व लढवय्या सैनिकांचे पंडित यांनी कौतुक केले.


गरिबांच्या हाकेला धावत अनेक दानशूर त्याबाबत दात्यांनी पुढे येऊन संघटनेकडे ही मदत सहकार्य पोहचविल्याने हे शक्य झाल्याचे सांगत विवेक म्हणून पंडित यांनी सर्व देणगीदारांचे आभार व्यक्त केले परिस्थितीत तर संकट काळात अजूनही सरकारची मदत मात्र राहणार या गरजूंपर्यंत पोहचली नसल्याने विवेक पंडित कर्तव्य यांनी खंत व्यक्त केली. नंतर कोरोना हे संकट महाभयंकर आहेच, त्याबाबत सतर्क राहण्याच्या दृष्टीने उपाययोजनेत सांगितले. मात्र अशा परिस्थितीत गरीब कष्टकरी कसा भुकेला राहणार नाही याची काळजी घेणे शासनाचे कर्तव्य आहे. मात्र दुर्दैवाने आज लॉकडाऊन नंतर १४ दिवस उलटले मात्र सरकारची मदत पोहचली नाही हे दुर्दैव असल्याचे पंडित यांनी सांगितले.


आता संघटनेला शक्य आहे. तितकी मदत केली आहे, मात्र आजही अनेकांना मदतीची गरज आहे, सरकार अजूनही याकडे गंभीरपणे लक्ष देत नाही, जर शासनस्तरावरून मदतीच्या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही तर संघटना केवळ मदत करून गप्प बसणार नाही तर नाईलाजास्तव संघटनेला पुढचे पाऊल टाकावे लागेल, आणि मग या भुकेल्या गरिबांच्या हक्कासाठी संघटना कायदा भंग होईल याचीही तमा बाळगणार नाही,म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी यात स्वतः लक्ष घालून ही उपासमार होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी विनंती स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या