Top Post Ad

कोरोनाविरुद्ध लढ्यात ‘रोबोट’ करणार डॉक्टरांची मदत

कोरोनाविरुद्ध लढ्यात ‘रोबोट’ करणार डॉक्टरांची मदत


दिल्ली ‘एम्स’मध्ये मिलाग्रोचे ‘रोबोट’ होणार तैनात; प्रायोगिक तत्वावरील परीक्षणाला झाली सुरुवात ~


नवी दिल्लीभारतासह जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. प्रत्येक देश विविध उपाययोजनांद्वारे या संकटातून बाहेर पडण्यासाठी झगडत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांना मदत करण्याच्या उद्देशाने रोबोटिक्स ब्रँड मिलाग्रोने आपले रोबोट दिल्ली एम्समध्ये तैनात (कार्यरत) करण्याची घोषणा केली आहे. या प्रयत्नांतर्गत कंपनीच्या एआय पॉवर्ड रोबोट 'मिलाग्रो आयमॅप ९' आणि 'ह्यूमनॉइड इएलएफ'च्या प्रायोगिक तत्त्वावरील परीक्षणाला आजपासून दिल्लीतील एम्सच्या अत्याधुनिक कोव्हिड-१९ वॉर्डमध्ये सुरुवात झाली आहे. 


भारतात निर्मित मिलाग्रो आयमॅप ९ हा फरशीला निर्जंतूक करणारा रोबोट असून तो ऑटोमॅटिकरित्या फरशी स्वच्छ करतो. सोडियम हायपोक्लोराइडच्या मिश्रणाचा वापर करून हा फरशीच्या पृष्ठभागावरील कोव्हिडचे बीजाणू नष्ट करु शकतो. आयसीएमआरनेही याची प्रशंसा केली आहे. एलआयडीएआरने मार्गदर्शन केलेला आणि अॅडव्हान्स एसएलएएम टेक्नोलॉजीयुक्त असा हा रोबोट न पडता स्वत:च चालतो. याव्यतिरिक्त या रोबोटमध्ये मिलाग्रोची पेटेंटे़ड रिअल टाइम टॅरेन रिकग्निशन टेक्नोलॉजी आहे जी रिअल टाइममध्ये फ्लोअर मॅपिंग करते.


मिलाग्रो ह्युमनॉइड ईएलएफ हा रोबोट डॉक्टरांना एखाद्या व्यक्तीशी संपर्क न करता संक्रामक कोव्हिड-१९ च्या रुग्णांवर देखरेख आणि चर्चा करण्यास मदत करतो. यामुळे संसर्गाची जोखीम खूप कमी होते. तसेच आयसोलेशन वॉर्डांमध्ये कंटाळा आलेले रुग्ण रोबोटच्या मदतीने वेळोवेळी आपल्या नातेवाईकांशी बोलू शकतात. यात हाय डेफिनेशन व्हिडिओ आणि ऑडिओमध्ये सर्व घटना रेकॉर्ड करू शकतो.८ तासांची बॅटरी लाइफ असलेला हा सुमारे २.९ किमी प्रति तास या वेगाने प्रवास करू शकतो. हा ९२ सेंटीमीटर उंच असून यात ६० पेक्षा जास्त सेंसर्स आहेत. एक थ्री डी आणि एक एचडी कॅमेरा तसेच १०.१ डिस्प्ले स्क्रीन आहे. तसेच अॅडव्हान्स ह्युमनॉइडमध्ये भावना दर्शवणारे डोळेदेखील आहेत.


एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, 'नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात मिलाग्रो फ्लोअर रोबोट आयमॅप ९.० आणि मिलाग्रो ह्यूमनॉइडचे परीक्षण केले जाईल.'


मिलाग्रोचे संस्थापक अध्यक्ष राजीव कारवाल म्हणाले, ‘ कोरोना महामारीविरोधातील प्रयत्नांमध्ये एम्सची मदत करण्यासाठी मिलाग्रो रोबोट खूप खुश आहे. वास्तविक परिस्थितींमध्ये मिळणा-या प्रतिक्रियांच्या आधारे जास्त उत्पादने विकसित करण्यासाठी आम्ही मिळून प्रयत्न करू. अमेरिका, चीन आणि इटलीसारख्या देशांनी कोव्हिड-१९ रुग्णांच्या उपचारात मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी आरोग्य सुविधांमध्ये आधीपासूनच एआय बेस्ड रोबोटचा वापर सुरू केला आहे. भारतदेखील आरोग्य कर्मचा-यांचा कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत बचाव करण्यासाठी या मॉडेलचा वापर करू शकतो. कोरोनाचा प्रहार भयंकर स्वरुपात वाढत असून अशा स्थितीत आपण अत्याधुनिक रोबोटद्वारे व्हायरसचा फैलाव रोखणे तसेच डॉक्टर, नर्स आणि देखभाल करणा-यांना संसर्गापासून वाचवण्यात मदत करू शकू.’


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com