Top Post Ad

वासिंदकरांनी केली पोलीसांना खिर- पुरणपोळी देऊन बाबासाहेबांची जयंती साजरी

वासिंदकरांनी केली पोलीसांना खिर- पुरणपोळी देऊन बाबासाहेबांची जयंती साजरी

 


 

शहापूर

 

सालाबादप्रमाणे संपूर्ण जगात भारतीय संविधान निर्माते  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या हर्ष जल्लोषात साजरी केली जाते. परंतु चालू वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्वांनी आपआपल्या घरातच जयंती साजरी केली.  जयंती निमित्त वासिंदमधील सामाजिक कार्यकर्ते राजेश निकम, भास्कर गायकवाड तसेच वासिंद ग्रामपंचायत सदस्या प्रेरणा प्रवीण गायकवाड यांनी वासिंद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांना खीर पुरणपोळी देऊन त्यांचे समवेत आगळी वेगळी भीम जयंती प्रथमच साजरी केली.

लॉकडावूनच्या काळात पोलीस प्रशासन कंबर कसून जीवाची पर्वा न करता काम करीत आहे. म्हणूनच वाशिंद पोलिस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीचे औचित्य साधून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आंबेडकरी विचारवंत  राजेश निकम, सामाजिक कार्यकर्ते भास्कर गायकवाड तसेच  वासिंद ग्रामपंचायत सदस्या प्रेरणा प्रवीण गायकवाड यांनी पोलीस स्टेशन वाशिंद येथे पुरणपोळी व खिर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना देऊन जयंती साजरी केली.

याप्रसंगी रिपाई वासिंद शहर अध्यक्ष प्रविण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सागर सोनावणे, सुधीर जाधव आदी उपस्थित होते. यावेळी सर्व पोलीस वृंद यांनी आयोजकांना  धन्यवाद व्यक्त करत जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व  कोरोनावर मात करूया असा संकल्प केला.  पुरणपोळी व खीर बनविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या रजनी निकम, लक्ष्मी गायकवाड, भावना निकम, अंजनी गायकवाड, सूनयना गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com