Top Post Ad

*अॅड प्रकाश आंबेडकरांची कृतिशील भूमिका

*अॅड प्रकाश आंबेडकरांची कृतिशील भूमिका आणि शरद पवारांची आघाडी : एक षडयंत्रच



'महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी मधून एक लहान ओबीसी नावाचा घटक राज सत्तेपासून वंचित राहू नये या सुञावरवर अँड प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानले आहे. जेव्हापासून आंबेडकर राजकारण करतात तेव्हापासून आतापर्यंत जो जो प्रश्न आंबेडकर उजेडात आणतात त्या प्रश्नावर महाराष्ट्रात चर्चेला सुरुवात होते पत्रकार, साहित्यिक अभ्यासक,लेखक विचारवंत शासन-प्रशासन व सगळ्या क्षेत्रात आंबेडकरांनी उचललेल्या प्रश्नावर चर्चा होते (शक्यतो नकारात्मक) मात्र त्या प्रश्नाचा धागा धरणार नाहीत ते शरद पवार कसले?


राजकीय दृष्ट्या विरोधक जरी असतील तरी राजकारणातील चाणक्य म्हणून पवारांना महाराष्ट्रात ओळखते आंबेडकरांनी संकल्पीलेल्या योजनावर बारकाईने लक्ष ठेवून पवार नेहमीच जागरूक राहात असावे'. 'प्रश्न असा उभा राहला होता की, आंबेडकरांनी ज्या प्रश्नाला वाचा फोडली तो प्रश्न सोडविण्याची ताकत सरकारात असल्यामुळे निश्चित पवारांमध्ये आहे. परंतु जर तो प्रश्न सोडवला तर वंचितांचे कल्याण होईल आणि वंचितांचे कल्याण म्हणजे 'कुटुंबशाहीचा बिमोड' "आंबेडकरांच्या संकल्पनेला हाताळायचे कसे हा प्रश्न इच्छा असो अथवा नसो परंतु पवारांना पडतोच" *मग ते त्या प्रश्नाला एकतर मोडीत काढण्याचा डाव आखतात किंवा त्याच श्रेय आंबेडकरांना जानार नाही याची काळजी घेतात किंवा त्याची मोडतोड करून आपल्या बाजुने करून घेतात अर्थात चितमी मेरी और पट भी मेरी आतापर्यंतचे चित्र असे आहे म्हणण्यास वावगे ठरणार नाही "उदाहरण म्हणुन आपण काही मुद्दे बघूयात वंचिताच्या स्टेजवरून राज्यात सत्तासंपादन मेळाव्याच्या निमित्ताने विविध जाती-जमाती आणि समूहाचे प्रश्न चर्चेला गेले राजकारणातील आमचा वाटा कुठे आहे? हा प्रश्न भटके विमुक्त,धनगर, आदिवासी, बलुतेदार अलुतेदार, यांच्या सह अनेक छोटे मोठे घटक व्यवस्थेला सत्तेचा वाटा कुठे आहे? म्हणून प्रश्न विचारणारे सत्ता संपादन मेळावे झाले. निवडणुकीच्या राजकारणात वंचितांचे एकही आमदार-खासदार निवडणून आले ही नाहीत परंतु वंचितांच्या स्टेजवरुन राजकीय दृष्ट्या अस्पर्श ठेवल्या गेलेल्या सगळ्या वंचितांना आंबेडकरांनी स्वतःचा आवाज दिला हिंमत आणि संधी दिली आणि भल्या भल्याच्या बुडाखाली आग लागली 17 जानेवारी 2018 नांदेडच्या मेळाव्या पासून चर्चेचं केंद्रबिंदू असलेल्या नाभिक समाजाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात चर्चा सुरु झाली( प्रस्तुत लेखक ) यांनी नाभिक समाजाचे प्रश्न सोडविण्यात हि घराणेशाही अपयशी झाली' 'बांधवांनो जागे व्हा अशी हाक आंबेडकर यांच्या उपस्थितीत लाखोच्या जनसमुदाया समोर दिली "पुढे हा राजकीय संधीचा एल्गार महाराष्ट्रभर दनानला यासाठी आंबेडकरांनी संधी दिली हेच सर्वात मोठे यश म्हणावे लागेल.


लोसभेनंतर आलुतेदार बलुतेदार सत्तासंपादन संवाद अभियानाच्या माध्यमातुन महाराष्ट्राच्या 28 जिल्ह्यात संवाद घडवून आनला गेला बलुतेदारांच्या प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली अभियानाचा समारोप हा दस्तुरखुद्द अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत जालना येथे झाला. महाराष्ट्राच्या राजकारणातील काळजात "बलुतेदार" हा शब्द कोरल्या गेला. पुढे विधानसभा निवडणकीत बलुतेदारांना उमेदवारी दिली गेली आणि घराणेशाही तिला घाम फुटला. निवडणुकीनंतर महविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बलुतेदारांसाठी शंभर कोटी रुपयांची घोषणा केली पुढे राज्यात 5 जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आंबेडकरांचा गड म्हणून ओळखला जाणारा अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कडून आसेगाव बाजार या खुल्या मतदारसंघात बलुतेदारांचा प्रतिनिधी म्हणून नाभिक समाजाच्या हरिहर पळसकर यांना उमेदवारी दिली. त्याबरोबर रिसोड आणि नागपूर ग्रामीण आदी ठिकाणी संधी दिली पाठोपाठ7 मार्च 2020 रोजी संत सेना महाराज यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरांनी पवारांचा गड समजला जणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपूर येथे थेट नाभिक समाजाच्या अधिवेशनात उपस्थित राहन मार्गदर्शन केले.


महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर नंतर प्रथमच नाभिक समाजाच्या प्रासाळके यांना पुणे पदवीधर मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली या सगळ्या घटना राजकीय लोक बारकाईने लक्ष ठेवून असतातच.आंबेडकरांच्या या कृतिशिल भूमिकेमुळे राज्यातील सलून व्यवसायीक बांधवाकडून समाज माध्यमात आंबेडकरांच्या समर्थनाची एकतर्फी चर्चा सुरु झाली. बलुतेदार आणि नाभिक समाजा सोबत आंबेडकरांची जवळीक वाढली आणि तेही पश्चिम महाराष्ट्रात ! हि बाब बहतेक जिव्हारी लागली असेल अशातच कोरोणाच्या लागलेल्या संचारबंदी काळात संपूर्ण राजकरणात कधीच नव्हेतर आंबेडकरांच्या धास्तीने पवारांनी नाभिक सलुन व्यावसायिक बांधवाची कळवळा व्यक्त करत आज प्रथमच शरद पवारांनी नाभिक समाजातील व्यावसायिक व कारागिरांना शासनाने मदत केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्या या अनुषंगाने काही जागरूक बांधव थेट प्रश्न विचारत आहेत कि,' पवार साहेबांना जर "जाणता राजा" म्हटल्या जात असेल तर मग त्यांच्या ताब्यात ( सत्तेत) मावळे ( बलुतेदार) का नाहीत? ' या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरं होईल.' 'बलुतेदारांसाठी 100 कोटी ची घोषणा केली,केशशिल्पी बोर्डाची स्थापना झाली आणि आपत्कालीन परिस्थितीत सलन कारागिरांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली हि सगळी परिस्थिती निर्माण होण्यासाठी आंबेडकरांनी या छोट्या जातीच्या लोकांना उठन उभे केले, जागे केले आणि सरकार वर दबाव वाढवला तेव्हाच या सगळ्या घटकावर पवारांसारख्या मोठया नेत्यांना यात आघाडी घेण्यास भाग पडले. हीच बाळासाहेब आंबेडकर यांची ताकत म्हणावी लागेल म्हणून ज्या घटकाला बाळासाहेब अक्षरशा उजेडात आणतात आणि मग या घटकाला पवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात हेच सिद्ध होते भारतात सरकार कोणाचीही असो त्याला वाकण्याची ताकत आंबेडकरां मधे आहे हे मान्यच करावे लागेल' 'हे काही आत्ताच घडलेलं नाही तर पवार कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांचे जवळपास 72हजार कोटी कर्ज मनमोहनसिंग सरकारने माफ केले. मग आंबेडकरांनी शेतमजूर आणि भूमिहीन कामगारांचे काय ही भूमिका घेतली आणि सरकारने एकूण तेरा आर्थिक विकास महामंडळकडे थकित असलेली कर्जमाफी करावी लागली. "आंबेडकरांनी असाच एक ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची साठी मोर्चा काढला होता की लगेचच सरकारने शिष्यवृत्ती चालू केली.आंबेडकरांनी परभणी येथील कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे म्हणून मोर्चा काढला आणि विद्यापीठाचे नामकरण झाले


जर आंबेडकरांनी स्वतःचा मतदारसंघ सांभाळत महाराष्ट्रात सक्रिय राजकारण केले नसते तर रामदास आठवले यांचा राजकारणात जन्मच झाला नसता हे सुध्दा कुणीही नाकारू शकत नाही म्हणूनच आंबेडकरांचं नेतृत्व दडपून टाकण्यासाठी पवार अनेक कुटील कारस्थान करतात'. "म्हणुन जो कोणी आंबेडकरांच्या सोबत असते त्याला लालच म्हणुन एखादी एजन्सी, पेट्रोल पंप कारखाने शाळा,कॉलेज वस्तीगह व्यवसाय भागीदारी शासनाचे पुरस्कार आमदारकी किंवा गत्तेदारी, वेगवेगळ्या प्रकारचे कंआट देऊन फोडल्या जाते. हे चित्र आपण बघत आलोय प्रत्येक लोकसभा निवडणुकीत अकोल्यात सर्वपक्षीय विरुद्ध आंबेडकर अशीच लढत असते. परंतु स्वतःला प्रोगामी साहित्यिक, विचारवंत लेखक म्हणून घेणारे बनावट दारुडे(अपवाद वगळून) कवि,लेखक हि सत्यता मांडत नाहीत. उलटपक्षी आंबेडकरांनाच हेकेखोर ठरवण्यात स्वारस्या मानतात.* "आता यापुढे जर खरेच वंचितांना प्रत्यक्ष सत्तेत धडक मारायची असेल आणि घराणेशाही संपवायची असेल तर छोटे ओबीसी यांनी आपापल्या जातींचे बॅनर घेऊन अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे म्हणजे त्यांची दखल तरी घेतली जाईल नाहीतर त्यांच्या एकजुटीने सत्ता तरी संपादन करता येईल..... 'अॅड बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबतं जुळणे म्हणजे कुठल्याही अर्थाने दखलपात्र होणे हा राजकीय अदमास घेत आता सर्वच बलुतेदार बांधवांनी आपल्या जातींचे मजबूत संघटन करुन अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आंबेडकर दाता आहेत हे समजून घ्या ...!" *काळाची पावले ओळखून छोट्या ओबीसी बांधवांनी राजकीय वाटचाल करावी हीच अपेक्षा...!'


*लेखक *गोविंद दळवी '  -- मो. 9881283802*


राज्य प्रवक्ता "वंचित बहजन आघाडी' "


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com