Top Post Ad

तहसीलदारांना अरेरावी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल






तहसीलदारांना तुझी गाडी फोडून टाकीन,

तू स्वतःला काय समजते असे बोलणाऱ्या इसमावर व त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल 

 

शहापूर तहसीलदार निलिमा साहेबराव सूर्यवंशी

 

शहापूर 

राज्यात लागू असलेल्या संचारबंदीचे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथीचे रोग प्रतिबंधक कायदयाचे उल्लंघन करून गैरकायद्याची मंडळी जमवून शासकीय कामात अडथळा आणून शहापूर तहसीलदार निलिमा साहेबराव सूर्यवंशी यांना तुझी गाडी फोडून टाकीन, तू स्वतःला काय समजते असे अपशब्द वापरून धमकी देणाऱ्या एका इसमावर व त्याचे साथीदारांवर रविवारी सायंकाळी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्यात लॉकडाऊनमुळे स्थलांतरित कामगार, मजुर यांना कामाअभावी राज्यतील व राज्याबाहेच्या मूळ निवासाच्या ठिकाणी परत जाणे अशक्य झाले आहे. तसेच निराश्रित व्यक्तींना बाहेर फिरू न देणे हे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अत्यंत आवश्यक असल्याने जिल्हा व तालुका प्रशासनाने पुढाकार घेऊन आशा व्यक्तींना निवासाची व भोजनाची सोय उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये अनुषंगाने तालुक्यातील आरोग्य विभाग, महसूल यंत्रणा, तसेच इतर शासकीय यंत्रणा, व ग्रामीण भागातील सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक सेवाभावी संस्था अहोरात्र कार्यरत आहेत. 

मागील रविवारी (२९ मार्च) रोजी रात्री च्या सुमारास वसई, विरार व मुंबई येथील ८० मजूर हे मूळगावी परत जाण्यासाठी शहापूर तालुक्याच्या हद्दीत आले असता. शासनाने दिलेल्या सूचनेनुसार सादर कामगार, मजूर यांना निवासस्थान व भोजनाची व्यवस्था करून देण्या करिता शहापूर पोलीस ठाण्यामार्फत मौजे शिरोळ येथील शासकीय आश्रम शाळेत नेले असता शिरोळ येथील रहिवासी फारुख सत्तार दळवी व इतर त्याचे साथीदार यांनी कामगार, मजुरांना येथे राहणे बाबत विरोध केला. याबाबत शहापूर तहसीलदार निलिमा सूर्यवंशी याना स्थानिक व्यक्तिद्वारे कळविला असता निलिमा सूर्यवंशी यांनी तात्काळ शहापूर पोलीस निरीक्षक घनश्याम रामचंद्र आढाव, कसारा पोलीस निरीक्षक दत्तू पांडुरंग भोये यांना उपस्थतीत राहण्याबाबत कळविले. तहसीलदार घटनास्थळी रात्री १२.३० वाजता पोहचल्या असता आरोपी फारुख दळवी व त्याच्या साथीदारांनी सदर कामगार, मजुरांना येथे राहणे बाबत विरोध करून निलिमा सूर्यवंशी यांचेशी अरेरावी करत तुझी गाडी फोडून टाकीन, तू स्वतःला काय समजते असे अपशब्द वापरून धमकी दिली. तरी सादर मजुरांना शासकीय आश्रमशाळा शिरोळ येथे  ठेवण्याकरिता शहापूर पोलीसांमार्फत घेऊन गेले असता फारुख सत्तार दळवी व इतर त्याचे साथीदार यांनी सादर मजुरांना आमच्या गावातील आश्रमशाळेत ठेवायचे नाही असे सांगितले तेव्हा तहसीलदार यांनी त्यांना व त्याचे साथीदारांना दिलेल्या सूचनेप्रमाणे मी सरकारी काम करीत आहे असे सांगितले. शहापूर तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांच्या बुधवारच्या (१एप्रिल) लेखी पत्रानुसार आरोपी फारुख सत्तार दळवी व इतर अनोळखी यांचेवर भारतीय दंड संहिता १८६० अधिनियमान्वये कलम ५०६, ५०४, ३५३, १८८, १४३,१४१ नुसार रविवारी सायंकाळी ६.०७ वाजता कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तू पांडुरंग भोये करीत आहेत.

 

 प्रतिक्रिया : "

इथे वसई, विरार व मुबईचे स्थलांतरित लोक ठेवणार, आमचा आदिवासी भाग आहे. आम्हालाच काही झाले तर आमचे कोण आहे. माझा विरोध हा गावासाठी होता. माझे आणि तहसीलदार मॅडमचे काही वयक्तिक भांडण नाही. मी त्यांना सांगितले खाली हायवेला माझे मोठे हॉटेल आहे तेथे भरपूर जागा आहे. या लोकांची तिथे व्यवस्था करू तसेच माझी ओळख देखील दिली. परंतु त्यांनी काही एक न ऐकता पदाचा गैरवापर केला आहे." -

(फारूक सत्तार दळवी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- आठवले गट )


 

 



 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com