Top Post Ad

आयटी आणि बँकिंग स्टॉकमध्ये मोठी घसरण; वाहन क्षेत्रावरही परिणाम

आयटी आणि बँकिंग स्टॉकमध्ये मोठी घसरण; वाहन क्षेत्रावरही परिणाम


मुंबई,


२०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीच्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने ४%ची घसरणीसह हा दिवस नकारात्मक ठरला. आयटी आणि बँकिंग स्टॉकनी मोठी घसरण घेतल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. टेक महिंद्रा, टीसीएस आणि माइंड ट्री या टॉप आयटी प्लेअर्समध्येही सर्वाधिक ९.५ टक्क्यांनी घट दिसून आली तर कोटक बँक (एनएसई) सुद्धा ८.८३% नी खाली आले.


कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळे वाहन क्षेत्रातही तीव्र घट दिसून आल्याचे अमर देव सिहं यांनी सांगितले. भारतातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझूकीने सर्वात मोठी फेब्रुवारी महिन्यातील १५८,०७६ अंकांवरून आज मार्चमध्ये ८३,७९२ अंकांवर विक्रमी रितीने घसरली. दुसरीकडे अशोक लेलँडची विक्री मार्च महिन्यात ९०% पेक्षा कमी अंकांनी घसरली. या निर्देशानंतर निफ्टी ऑटो इंडेक्स १.५६ टक्क्यांनी घसरला तर बीएसई ऑटो इंडेक्स १.५४ टक्क्यांनी घसरला. हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो आणि एक्साइड इंडस्ट्रीजसह काही मोजकेच समभाग विरुद्ध दिशेने जाताना दिसले.


मार्च महिन्यात देशात लॉकडाउन असल्याने एफपीआयने भारतीय इक्विटी मार्केटमधून १५.९ अब्ज डॉलर्सची विक्रमी गुंतवणूक मागे घेतली. आशिया खंडातील हा सर्वाधिक एफपीआय आउटफ्लो असून यामुळे मार्केट खाली आले. येत्या काही दिवसांत भारताच्या कोरोना नियंत्रण उपायांवर एफपीआय काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे गंभीर स्वरुपाचे ठरेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com