Trending

6/recent/ticker-posts

बँकिंग, फार्मा आणि ऑटो शेअर्समध्ये वाढ

बँकिंग, फार्मा आणि ऑटो शेअर्समध्ये झाली वाढ


 कोरोना संदर्भात जागतिक स्तरावरील प्रयत्नांचा परिणाम 


मुंबई


  कोरोना विरोधात जागतिक स्तरावरील मजबूत प्रयत्न, औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय तसेच १४ एप्रिल २०२० नंतर लॉकडाउन शिथिल होण्याची आशा यामुळे सप्ताहारंभीच आलेल्या सुट्टीनंतर खुल्या झालेल्या भांडवली बाजारांनी निराशेची साखळी मोडत उत्साही वळण घेतल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.


निफ्टी बँक इंडेक्सने १०.५१% ची वाढ दर्शवली. इंडसइंड बँकेने २२.५६% आणि अॅक्सिस बँकेने १९.४८% ची वाढ दर्शवली. दरम्यान एनएसईमध्ये आयसीआयसीआय बँक १३.६७% तर एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये १०.११ टक्के वाढ दिसून आली. केवळ बँक ऑफ बडोदा आणि बंधन बँक अनुक्रमे १.१३ टक्के आणि ७.८८ टक्के या दराने घसरली.


औषधांच्या निर्यातीबरील निर्बंध शिथिल करण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचा परिणाम फार्मा शेअर्सवर दिसून अमर देव सिंह यांनी सांगितले. बंदी हटवल्यानंतर निफ्टी फार्मामध्ये १०.३७ टक्क्यांची वाढ दिसून आली. ओरोबिंदो फार्माचे शेअर्स १६.५५ टक्क्यांनी वाढले. तर डॉ. रेड्डी्ज लॅब, कॅडिला हेल्थ, टोरेंट फार्मा आणि सन फार्मा या कंपन्यांच्या शेअर्सनीदेखील ११ ते १३ टक्क्यांदरम्यान वृद्धी दर्शवली.


वाहन क्षेत्रालाही काही प्रमाणात संजीवनी मिळाल्याचे श्री सिंह यांनी नमूद केले. बीएसईमध्ये महिंद्रा अँड महिंद्राने १४.४४%, मारुती सुझूकीने १३.४१%, बजाज ऑटोने १२.०५% आणि हिरो मोटोकॉर्पने ११.८३% टक्क्यांनी वाढ दर्शवली. या वर्षी ५० ते ७० % दराने वाहन क्षेत्र घसरल्यानंतर बाजारातील घडामोडींना नव्याने सुरुवात झाल्याचे चित्र दिसले. फक्त भारत फोर्ज आणि क्युमिन्स इंडिया या दोन कंपन्यांचे शेअर्स एसअँडपी बीएसई ऑटो इंडेक्समध्ये घसरले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या