Top Post Ad

५७ टक्के विद्यार्थ्यांद्वारे शिक्षणासाठी ऑनलाईन मंचाचा वापर: ब्रेनली

५७ टक्के विद्यार्थ्यांद्वारे शिक्षणासाठी ऑनलाईन मंचाचा वापर: ब्रेनली


~ शिक्षकांच्या वैयक्तिक मार्गदर्शनाची येते आठवण ~


मुंबई


    सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये सुमारे ५७% विद्यार्थी विविध ऑनलाईन मंचांचा वापर शिकण्यासाठी करीत असल्याचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठीची जगातील सर्वात मोठी ऑनलाइन कम्युनिटी ब्रेनलीने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणा-या ऑनलाइन क्लासेसबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.


भारतातील २००० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतलेल्या या सर्वेक्षणात ५७% विद्यार्थी सध्या ऑनलाइल मंचाचा वापर करीत असल्याचे आढळून आले तर  . यापैकी ५३.७% विद्यार्थ्यांनी हे क्लासेस चांगले वाटत असल्याचे ही सांगितले. सहभागींपैकी ५९.४% विद्यार्थ्यांनी या विश्रांती काळात गृहपाठही दिला जातोय असे देखील नमूद केले.


शाळा त्यांच्या अधिकारानुसार विद्यार्थ्यांचे शिक्षण  विना अडथळा आणि अखंड व्हावे, यासाठी प्रयत्न करत असून ४६.९% विद्यार्थ्यांनी ऑनलाइन क्लासेस घेताना त्यांना शिक्षकांच्या सततच्या मार्गदर्शनाची आठवण येते असे म्हटले तर ४६.९% विद्यार्थ्यांनी घरी कंटाळवाणे होत असल्याचे सांगितले. तसेच ४५.४% विद्यार्थी त्यांच्या कुटुंबासमवेत जास्त वेळ घालवतात, असे या सर्वेक्षणात दिसून आले.


ब्रेनलीचे सह संस्थापक आणि सीईओ मिशल बोर्कोव्हस्की यांनी सांगितले की, ‘ सपूर्ण शिक्षणक्षेत्र सध्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी तसेच तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहे, ते खरोखरच अभिमान्स्पद आहे.  आमच्यातर्फे आम्ही विद्यार्थ्यांना अभ्यासात आणि गृहपाठात येणा-या अडचणींमध्ये माहिती देणारे सहाय्यक पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत.  #कॅरीऑनलर्निंग या दृष्टीकोनातून बहुतांश विद्यार्थी आणि पालक ब्रेनलीसारख्या मंचाकडे वळत आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जागतिक शिक्षण क्षेत्रात आमचे हेच योगदान आहे, असे आम्हाला वाटते.’


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com