अति जोखीम गटातील व्यक्तींचा शोध घेवून त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करा- ठामपा आयुक्त

अति जोखीम गटातील व्यक्तींचा शोध घेवून त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करा- ठामपा आयुक्तठाणे


       महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज महापालिका मुख्यालयामधून व्हिडीओ कान्फरन्सिंगद्वारे सर्व सहाय्यक आयुक्तांशी संवाद साधून कोरोना कोवीड १९ बाबत आढावा घेतला. या आढावा बैठकीमध्ये सिंघल यांनी बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अति जोखीम गटातील व्यक्तींचा शोध घेवून त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. याबाबत कुठलीही हयगय चालणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कळवा आणि मुंब्रा प्रभाग समितीमधील कोरोना बाधीत व्यक्तींची वाढती संख्या लक्षात घेता कळवा आणि मुंब्रा प्रभाग संपूर्णत: लॅाकडाऊन करण्याबाबत स्थानिक नगरसेवक आणि पोलिसांशी समन्वय साधून निर्णय घेण्याच्या सूचना  सिंघल यांनी दिल्या.
        ठाणे शहरामधील ज्या व्यक्ती बाधीत आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्या अति जोखीम गटातील व्यक्तींचा शोध घेण्याच्या सूचना देण्याबरोबरच त्या व्यक्तींना काही लक्षणे आढळून आल्यास त्यांना विलगीकरण कक्षात पाठविणे, त्यांची तपासणी करणे ही कामे अतिप्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.या बैठकीत त्यांनी प्रत्येक केसनिहाय आढावा घेवून प्रत्येक व्यक्तीचा कंटेनमेंट प्लॅन तयार करावा, त्या प्लॅनतंर्गत एकूण घरे, एकूण लोकसंख्या निश्चित करून त्यांचा सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या सर्वेक्षणमध्ये काही लोकांना कसली लक्षणे आहेत का, असतील तर त्याबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्याबाबत सांगितले. कोरोनाबाबत सर्व सहायेयक आयुक्तांनी त्या त्या प्रभाग समितीमधील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून काम करण्याच्या सूचनाही सिंघल यांनी दिल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA