Top Post Ad

शहापूर तालुक्यात होम कॉरन्टाईन व्यक्ती  ४०

शहापूर तालुक्यात होम कॉरन्टाईन व्यक्ती  ४०

 

सर्वात जास्त संख्या वासिंदमध्ये २१

 


 

शहापूर (संजय भालेराव) :

 

शहापूर तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये अनुषंगाने तालुक्यातील आरोग्य विभाग, महसूल यंत्रणा, तसेच इतर शासकीय यंत्रणा, व ग्रामीण भागातील सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक सेवाभावी संस्था अहोरात्र कार्यरत आहेत. मंगळवार (७) पर्यंत एकही कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण निर्दशनास आलेला नसून  शहापूर तालुक्यात होम कॉरन्टाईन व्यक्ती  ४० असून त्यात सर्वात जास्त संख्या २१ वासिंदमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांनो आता स्वतःला सांभाळा अशा सूचना तहसीदार निलिमा सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.शहापूर तालुक्यात मंगळवार(७) अखेर पर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण निर्दशनास आलेला नसून रविवारी ०१ मार्च पासून परदेश प्रवास करुन आलेल्या व त्या कारणास्तव शहापुर तालुक्यात  होम कॉरन्टाईन केलेल्या व्यक्तींची संख्या प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय  टेंभा-६, अघई-२, वासिंद २१, शेंद्रुण-७, शेणवा-१, किन्हवली-१, डोळखांब-१, टाकीपाठर-१ अशी एकूण ४० व्यक्ती आहेत. 

 कॉरन्टाईन केलेल्या व्यक्तींपैकी २० व्यक्तींचा कॉरन्टाईन कालावधी समाप्त झालेला असून उर्वरित २० व्यक्तींचा कॉरन्टाईन कालावधी येत्या दोन-तीन दिवसात संपणार आहे. याव्यतीरिक्त काळजी  म्हणुन १२ व्यक्तींची कोरोना संबधित तपासणी करण्यात आलेली असून तपासणी अहवालानुसार त्यापैकी कोणीही कोरोना बाधीत नसलेचे परीक्षणात दिसून आले आहे. तसेच  या १२ व्यक्तींना देखील होम कॉरन्टाईन केले असून सदर व्यक्ती ह्या  टेंभा, शेंद्रुण व खर्डी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील आहेत. त्याच प्रमाणे मुंबई,  ठाणे,कल्याण,पुणे, पिंपरी चिंचवड तसेच महाराष्ट्र राज्या बाहेरुन आलेले लोक देखील प्रशासनाने प्रतिबंधक उपाय  प्रयोजनार्थ होम कॉरन्टाईन केले आहेत व त्या व्यक्ती बाबत प्रशासन संपुर्ण निरीक्षण व दक्षता घेत आहे. तालुक्यात होम कॉरन्टाईन केलेलया व्यक्तींचे तालुका प्रशसनाने योग्य नियोजन केल्याने अद्याप पर्यंत यापासून कुठलीही गंभीर परिस्थिती निर्माण झाली नाही. असे असले तरी लगतच्या शहरांतील सदय परिस्थिती नुसार तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला आवाहन आहे की आपण शहापुर तालुका कोरोना मुक्त ठेवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी स्वता गर्दी करणार नाही व गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही अनावश्यक घराबाहेर फिरणार नाही. या नियमाचे पालन केले तर आणि गर्दीचे फोटो काढण्या ऐवजी गर्दी कमी करण्यासाठी तिथे सोशल डिस्टन्सिंग चे लोकाना आवाहन केले तरच लोकांच्या सहकार्यातून कोरोना विषाणू प्रार्दुभावास कारणीभूत  ठरणाऱ्या गर्दीवर व कोरोना संर्सगावर  वर नक्कीच मात करु. प्रशासनास यासाठी जनसामान्यांचे  सहकार्य हवे आहे व तसे सर्वाना मी तालुका प्रशासनाच्या वतीने आवाहन करत आहे. अशी माहिती शहपूरच्या तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी दिली आहे.

 


सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी आता मटन, मासळी बाजार स्वतंत्र

 

कोरोना या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केलेले आहे. परंतु एकत्र बाजारपेठ असल्याने गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर  गुरुवारपासून त्यांच्या आवारात मटन, मासळी बाजार स्वतंत्र सुरू करणार अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत उबाळे यांनी दिली. 

              चेरपोली, गोठेघर कळंबे ग्रामपंचायत तसेच शहापूर नगरपंचायत हद्दीतील बकरा, मेंढ्याचे मटन विक्रेते, गावरान व देशी कोंबडीचे मटन विक्रेते, ओली व सुकी मासळी, अंडी विक्रेते यांची शहरातील मुख्यबाजारपेठेतील सर्व दुकाने शहरात बंद ठेवण्यात आली असून त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्वतंत्रपणे जागा देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा नियम अंमलात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मटन, मासळी, अंडी विक्रेत्यांचा हा बाजार गुरुवारी (ता.९) सकाळ पासून  येथे सुरु होणार आहे.

आता त्यांना गाळे उघडून तसेच काही मोकळ्या जागेत दुकाने उभी करण्यासाठी मंडप टाकून देण्यात येत आहे. हे काम बुधवारी दिवसभरात पूर्ण होईल. आणि गुरुवारी सकाळी पासून बाजार सुरु होईल. आता मुख्यबाजारपेठेतील मटनविक्रेत्यांची दुकाने बंदच राहतील ती एकत्रितपणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उघडली जातील. त्यामुळे

ग्राहकांना एकाच जागी या वस्तू उपलब्ध होतील व सोशल डिस्टन्सिंगचे पालनही योग्य होईल. असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत उबाळे यांनी माहिती देतांना सांगितले. 


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com