लॉकडाउनसंबंधी प्रत्येक घडामोडीवर मार्केटची करडी नजर
बाजारातील अनिश्चिततेचा ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तूंवर परिणाम
मुंबई
सेन्सेक्स आणि निफ्टी आज बुधवारच्या बाजारात थोडे घसरणीकडे जाताना दिसले आणि ०.५%ची घट घेत बंद झाले. दोन्ही मार्केटनी कालचा उल्लेखनीय पुलबॅक कायम ठेवला आणि सूक्ष्म दुरुस्ती करत बंद झाले. संपूर्ण मार्केट सध्या लॉकडाउनसंबंधीच्या प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिडेटचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी व्यक्त केले.
औषधांवरील निर्बंध हटवल्याचा सकारात्मक परिणाम औषध कंपन्यांवर पडला. निफ्टी फार्मा इंडेक्स ३.५४% ने वाढला तर एस अँड पी बीएसई हेल्थकेअरदेखील ३.८५%ने वाढला. एफएमसीजी आणि आयटी शेअर्सनी जोरदार घसरण घेतली असताना फार्मा कंपन्यांनी मार्केटला दिलासा मिळाला.
बाजारातील अनिश्चिततेमुळे ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तूंवरही परिणाम झाल्याचे श्री अमर देव सिंह यांनी निदर्शनास आणले. सध्या अनेक राज्ये केंद्र सरकारकडे लॉकडाऊन वाढविण्याची विनंती करीत आहेत. या वाढीव लॉकडाउनमुळे ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तूंच्या क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे आज बीएसईमध्ये पीसी ज्वेलर आणि टायटन या शेअर्समध्ये अनुक्रमे ४.९४% आणि ३.४७ % घसरण दिसून आली.
बुधवारी वाहन क्षेत्रातही मजबूत सुधारणा दिसून आली. एनएसईवर अशोक लेलँड १०.०४ %, टीव्हीएस मोटर्स ८.१३% आणि भारत फोर्ज ५.९७ %नी वाढलेले दिसले. बजाज ऑटो आणि एमआरएएफसारखे काही शेअर्स मात्र घसरणीकडे दिसले. दुसरीकडे एफएमसीजी कंपन्यांचे शेअर्सही वाढलेले दिसले. निफ्टी एफएमसीजीमधये इमामी आणि गोदरेज कंझ्यूमर ७.३६% नी वाढले तर पी अँड जी, टाटा ग्लोबल बेव्हरेजेस, डाबर इंडियाआ णि युनायडेट स्पिरिट्स यासारखे इतर महत्त्वाचे एफएमसीजी प्लेअर्स देखील २ ते ५ टक्क्यांची वृद्धी घेताना दिसले. ब्रिटानिया इंडस्ट्रीज, आयटीसी आणि युनायटेड ब्रेवरीज हे १ ते २ टक्क्यांची घसरण घेऊन बंद झाले.
0 टिप्पण्या