Top Post Ad

पैसा अडका त्याच्यासाठी गौण

पैसा अडका त्याच्यासाठी गौण

 


 

आज सकाळी भाजीपाला घ्यायला बाजारात गेलो होतो..
एक शेतकरी द्राक्षच्या जाळ्या घेऊन बाजारात द्राक्ष विकायला उभा होता..
काका कशी दिली द्राक्ष..??
२५/- रुपये किलु लावली.. घ्या...
गोड हाय खुप..
जास्त दिसाचा माल झाल्यामुळे जास्त साखर उतरलीय त्यात..एकदम गोड हाय दराख..

खोट वाटत असेल तर एखादा मणी तोंडात टाकून पहा..
द्राक्ष खरच खूप गोड होती...
म्हंटल काका करा तीन किलो...
आठ दिवस पुरतील अशी.....
द्राक्ष मी पिशवीत टाकली...
मला एक गोस्ट जाणवली बाजारात गर्दीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या त्या काकांनी तोंडाला काहीही बांधलेल नव्हतं..म्हणून मी त्यांना माझ्या खिशात एक्स्ट्रा असलेल एक मास्क काढल….
आणि त्यांच्या हातात देऊन ते तोंडाला लावायला सांगितल..
खर तर ते घ्यायलाच तयार नव्हते..पण मी बळजबरीने ते त्यांच्या हातात दिलेल होत...
हो नाही करता-करता काकांनी माझ्या तोंडाकडे बघत हसत हसत दोन्ही दोऱ्या कानाच्या मागे अडकवल्या...
हायला...
मी तर आता डाक्टर सारखा दिसायला लागलो असन...
😀😀
बहुदा ह्या सगळा प्रकार त्यांच्यासाठी नवीन असावा...
म्हणून त्या गोष्टीच त्यानां अप्रूप वाटत असाव...
पैसे देऊन मी थोडा पुढे गेलो...
त्या काकांनी परत आवाज दिला...
ये दादा थोडा माघारी ये..
मी परत त्यांच्या जवळ गेलो...
त्यांनी एक मोठा द्राक्षचा घड जाळीतून उचलला आणि माझ्या पिशवीत टाकला...
मला ते थोड ऑड वाटल..
म्हंटल काका..
तुमच्याकडून कसली अपेक्षा म्हणून मी तुम्हाला मास्क दिल नव्हतं...
इतक्या गर्दीत तुम्ही दिवसभर उभे रहाणार हे मला योग्य नाही वाटलं म्हणून मी काळजी पोटी ते तुम्हाला दिल होत...
तुम्ही तर जाग्यावर त्याची परत फेड करून टाकली...😢😢
नाही नाही पोरा...
अस काही समजू नको..
तुला माझी कीव आली त्याला काय म्हणत्यात......ते तू खिश्यातून चटकन काडून मला दिल...
मग तू एक माझ पोरगच म्हणून तुला एखादा दराखाचा घड जास्ती दिला तर कुठ काय बिघडल...?
तिकड अक्खा माल बागत सडून चालला आणि तुला एखादा घड जास्त दिला तर काय फरक पडणार हाय पोरा..
असू दे...
घरी पोरबाळ खातील...
खर सांगू मित्रांनो शेतकऱ्यांची जातच अशी असते ना...
त्याच्या हातात कायम देण्याची दानत असते...
खोट वाटत असेल तर एखाद्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बघा...
वावरात भाजीपाला असेल तर तो तुम्हाला कधीच रिकाम्या हाती परत येऊ देणार नाही...
काही का होईना वानोला तुमच्या सोबत देणारच...
पैसा अडका त्याच्यासाठी गौण आणि माणुसकी/ आपुलकी त्याच्या नजरेत कायम महान असते...
काही शिकली सवरलेली लोक त्यांची अवहेलना करतात...

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com