Top Post Ad

डोर्फ केटल केमिकल कंपनीतर्फे ५००  कुटुंबियांना  तीन महिने मिळणार मदत 

लोक कलावंत आणि मजुरांना डोर्फ केटल केमिकल कंपनी चे अर्थसहाय्य 

५००  कुटुंबियांना  तीन महिने मिळणार मदत 

 


 

ठाणे -

डोर्फ केटल केमिकल्स इंडिया प्रा. लिमिटेड तर्फे कामगार आणि लोक कलावंत अशा एकूण 100 जणांना पहिल्या टप्प्यामधील मदत या आठवड्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून आधार कार्ड ,बँक अकाऊंट ची माहिती मागवण्यात आली आहे . तसेच त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधून चर्चा करून हा निर्णय घेण्यात येत असल्याची महिती कंपनी चे सामाजिक उत्तरदायित्व विभाग प्रमुख संतोष जगधने यांनी दिली.  करोना मुळे आर्थिक संकटात सापडून उपासमारीची वेळ आलेल्या राज्यातील लोक कलावंतांना मुंबई तील डोर्फ केट्ल केमिकल कंपनी च्या वतीने आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे .   

राज्यात कोरोना व्हायरसच्या संकटामुळे गाव खेड्यातल्या यात्रा-जत्रा बंद झाल्या आहेत. त्याचा अतिशय मोठा फटका तमाशा, दशावतार आणि अन्य लोककलांना, लोककलावंतांना बसला आहे. वृद्ध, थकलेल्या आणि निराधार लोककलावंतावर  उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब  हेरून कंपनी च्या वतीने अर्थ साहाय्य करण्यात येणार आहे .       आर्थिक संकटात लोक कलावंतांना मदत करण्यासाठी  लोककलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या काही संस्था आणि व्यक्त एकत्र आल्या आहेत .  गरीब, गरजू, निराधार लोककलावंतांना किमान एक ते पाच हजार रुपये मासिक अर्थसाहाय्य करण्याची योजना आखण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे . डोर्फ केटल केमिकल इंडिया प्रा. ली.चे सुबोध मेनन, संतोष जगधने, लोकरंग सांस्कृतिक मंचच्या शैला खांडगे, शांताराम नांदगावकर प्रतिष्ठानच्या सुहासिनी नांदगावकर, प्रशांत नांदगावकर, लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे . 

      केरळमधील लोककलावंतांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या  डोर्फ केटल केमिकल इंडियाने आता अडचणीच्या काळात महाराष्ट्रातही लोककलावंतांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे निमित्त साधून १४ एप्रिलपर्यंत राज्यातील गरजू लोककलावंतांच्या खात्यात ही रक्कम थेट जमा केली जाईल आणि त्यासाठी पहिल्या टप्प्यात १०० लोककलावंतांची यादी तयार करण्यात आली असल्याचे कंपनीचे संचालक सुबोध मेनन यांनी सांगितले. तसेच  कवीवर्य शांताराम नांदगावकर यांच्या आमदार निवृत्तीची पूर्ण रक्कमही या आर्थिक सहाय्यता निधीत जमा केली जाणार असल्याचे सुहासिनी नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे. 

डोर्फ केटल केमिकल कंपनी द्वारे लोककलावंतांना तीन महिने दर महिना 5 हजार रुपये याप्रमाणे त्यांच्या खात्यात कंपनी द्वारे भरले जाणार आहेत. याबाबत डोर्फ केटल केमिकल्स इंडिया प्रा. लिमिटेड चे संस्थापक सुबोध मेनन म्हणाले की ,करोना च्या संकटामुळे मजूर वर्गाला उवजीविकेचे साधन नसल्याचे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . यासाठी त्यांना अन्नधान्य खरेसी करता यावे यासाठी मजुरांना दत्तक घेणे आमचे कर्तव्य आहे. जगभरातच आर्थिक संकट निर्माण झालेले असताना गावोगाव कला सादरीकरण करून पोट भरणारे लोककलावंत अधिकच अडचणीत सापडले आहेत. या मध्ये ही काही घटक उद्या काय होणार ? या चिंतेने अधिक ग्रासले आहेत. लोककलावंतांना देखील मदतीचा हात डोर्फ केटलने दिला आहे. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com