"मी पुन्हा येईन..!" जितेंद्र आव्हाड
ठाणे
'सुदैवाने माझ्या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तरीही प्रोटोकॉलनुसार मला आता किमान 14 दिवस होम क्वारन्टाइन व्हावे लागणार आहे. जी की अत्यावश्यक बाब आहे,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. "कळवा,मुंब्रा,सोलापूर आणि माझ्या महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना विनंती आहे की,कृपा करून घरी बसा.आणि आपली तशीच आपल्या परिवाराची काळजी घ्या. येत्या 7 दिवसात पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करण्यात येईल.आणि मला विश्वास आहे की, या टेस्ट चा रिपोर्ट देखील निगेटिव्ह येऊन,लवकरात लवकर तुमच्यामध्ये "मी पुन्हा येईन..!" असेही आव्हाड म्हणाले
आव्हाड आणि इतर काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले. त्यानंतर आव्हाड यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारन्टाइन करून घेतलं आहे. ठाण्यातील या कोरोना पॉझिटिव्ह PSI च्या संपर्कात अनेक पत्रकारही आले आहेत. त्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यातील एक पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यानंतर आता सर्वांना क्वारन्टाइन करण्यात आलं आहे, जितेंद्र आव्हाड यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ' अशी माहिती आज सकाळी समोर आली.
"हो,काल माझी देखील कोव्हीड 19 ची टेस्ट करण्यात आली.माझ्या सोबत काम करणाऱ्या एका पोलीस सहकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. यात माझा देखील समावेश होता. माध्यमात या बातम्या आल्या आणि अनेकांचे फोन आणि मेसेजेस येत आहेत. आपण माझ्यावर जे प्रेम आणि विश्वास नेहमीच दाखवता त्याबद्दल मी आपला आभारी आहे." "दुःख एका गोष्टीच वाटत की,लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कळवा मुंब्रा भागात मी अन्नाची पाकीट गरजूंना वाटत होत.त्या मी रोज स्वतःच्या निरीक्षणाखाली बनवून घेत होतो.आता पुढील 14 दिवस ते शक्य नाही. तरी माझे सहकारी हे काम थांबवणार नाहीत, याची मी हमी देतो."
जितेंद्र आव्हाड हे स्वत: होम क्वारंटाईन असताना, आता त्यांच्यासोबतच्या 13 जणांना देखील कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. यामध्ये आव्हाडांचा ड्रायव्हर, अंगरक्षक आणि एका माजी नगरसेवकाचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला की नाही हे आता कोरोना चाचणीनंतरच स्पष्ट होणार आहे. जितेंद्र आव्हाड मागील अनेक दिवसांपासून नागरिकांनाच्या मदतकार्यात सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारी देखील होते. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन या सर्वांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
0 टिप्पण्या