ऑनलाइन इव्हेंट आयोजनासाठी पेटीएम इनसायडरची सुविधा
~ केवळ ३ टप्प्यांत स्वत:चा डिजिटल इव्हेंट करा सुरू ~
मुंबई
कोव्हीड-१९ या आजाराच्या साथीमुळे बाहेरील मनोरंजनाचे कार्यक्रम पूर्णतः रद्द झाले आहेत. लाइव्ह इव्हेंट्स आणि ऑनलाइन अनुभव ही सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन पेटीएम इन्सायडरने इव्हेंट्सचे ऑनलाईन आयोजन करण्यासाठी नव्या सुविधेची घोषणा केली आहे. याद्वारे आयोजकांना प्रकाशन, तिकिट आणि डिजिटल इव्हेंट व्यवस्थापनाची सुविधा या ३ सोप्या टप्प्यांमध्ये एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करता येईल. हा मंच सध्या झूमवर आधारीत इव्हेंट पब्लिशिंगला सपोर्ट करतो. लवकरच हा इतर मंचांशीदेखील जोडला जाईल. ऑनलाइन इव्हेंटचा सेटअप आणि मार्केटकरिता अत्यंत सोपे, प्रभावी आणि वेगवान मंच उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे.
संयोजकांनी पेटीएम इनसायडरवर इव्हेंट सेट केल्यानंतर झूम या वेब कॉन्फरन्सिंग मंचाद्वारे संबंधित वेळेत इव्हेंट सेट केला जातो. तसेच तिकिट खरेदी करणा-यांना तसेच एका लॉगइनकरिता एकाच व्यक्तीसाठी हा इव्हेंट मर्यादित असतो, हे टीमला माहिती असते. जे ग्राहक तिकिट खरेदी करतात त्यांना तिकिटावर अॅक्सेसचे डिटेल्स मिळतात तसेच शो लाइव्ह सुरु होण्यापूर्वी रिमाइंडर तसेच हजर राहणा-यांना व्हॉट्सअप किंवा ईमेलद्वारे बॅकएंड्स मिळतात.
साधारण वर्षभरापूर्वी पेटीएम इनसायडरमधील एका छोट्या समूहाने ‘डिजिटल इव्हेंट’ नावाच्या प्रायोगिक प्रकल्पावर काम सुरू केले. एखादा इव्हेंट ऑनलाइन घेणे हादेखील एक क्रांतिकारी अनुभव असू शकतो, अशी या समूहाची भावना होती. अशा रितीने कलाकार आणि चाहतेदेखील स्थळ, उपलब्धता आणि हंगामी मर्यादांवर मात करू शकतात. या इव्हेंट्समध्ये लाइव्ह स्ट्रीमिंग टेक्नोलॉजीचा समावेश असेल. तसेच कलाकार आणि चाहत्यांना परस्परांमध्ये गुंतवण्यासाठी प्रभावी इंटरॅक्टिव्ह फीचर्सदेखील यात आहे.
पेटीएम इनसायडरचे सीईओ श्रेयस श्रीनिवासन म्हणाले, ‘ लाइव्ह इव्हेंट्स आणि अनुभव आता ऑनलाइन झाले. त्यामुळे आयोजक आणि चाहत्यांसाठी आम्ही यातील अखंडीत अनुभव देण्यावर भर देत आहोत. एखादा डिजिटल इव्हेंट करण्यासाटी आधी इव्हेंट तयार करून विश्वसनीय तिकिट किंवा
पेमेंट सोल्यूशन तयार करणे व त्यानंतर पुन्हा इव्हेंट स्ट्रीमिंग करण्यासाठी प्लॅटफॉर्म शोधणे या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. पण पेटीएम इनसायडरच्या थ्री स्टेप इव्हेंट पब्लिशिंग प्रोसेसमध्ये एकाच साधनाद्वारेवरील तिन्ही गोष्टींची पूर्तता होते आणि चाहत्यांना सर्वोत्कृष्ट सामग्री देण्यावर लक्ष केंद्रीत करता येते.’
या घोषणेपूर्वी विनोदी कलाकार साहिल शाह यांनी ही सुविधा वापरली. त्यांनी ऑनलाइन तिकिट घेत स्टँड अप कॉमेडी शो केला. साहिल म्हणाला, ‘ मी यापूर्वी काही ऑनलाइन गिग्स केले आहेत. आता इनसायडर आल्यानंतर मी आणखी कार्यक्रम करण्यासाठी उत्सुक होतो. आपले घर न सोडता आणि लोकांनाही त्यांच्या घरात बसूनच कार्यक्रम पाहण्याचा हा उत्तम मार्ग आहे. प्लॅटफॉर्मकडून मिळणारी ही सुविधा खरोखरच मजेदार आहे. इनसायडर यात असल्याने मी सुद्धा ‘इनसायडर आहे.
0 टिप्पण्या