बांद्रे स्टेशन परिसरात हजारो मजूरांचा उद्रेक
केंद्र सरकार स्थलांतरित कामगारांसाठी घरी परत जाण्याची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्याचा हा परिणाम - आदित्य ठाकरे
मुंबई
मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर मात्र दुपारनंतर हजारोंच्या संख्येने कामगारांनी गर्दी केली. मुळचे उत्तर प्रदेश, बिहार येथील हे कामगार त्यांच्या मुळ गावच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जमले होते. आपल्या राज्यात नेण्यासाठी लांब पल्ल्याची गाडी सोडण्याची मागणी त्यांनी केली. आज लॉकडाऊन संपल्यानंतर घरी जाण्याची आशा मनी बाळगून आलेल्या या कामगारांचा उद्रेक झाला. यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण झाले होते. या गोंधळानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकारने 24 तासांसाठी ट्रेन का सुरू केली नाही असा सवाल त्यांनी केंद्राला विचारला आहे. आदित्य ठाकरेंनी ट्वीट केले की, वांद्रे स्थानकातील सध्याची विखुरलेली परिस्थिती, किंवा सूरतमधील दंगल ही केंद्र सरकार स्थलांतरित कामगारांसाठी घरी परत जाण्याची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्याचा परिणाम आहे. या कामगारांना अन्न किंवा निवारा नको, तर त्यांना आपल्या घरी परत जायचे आहे.
वांद्रे स्थानकातील सध्याची परिस्थिती, आता विखुरलेली किंवा सूरतमधील दंगल ही केंद्र सरकार स्थलांतरित कामगारांसाठी घरी परत जाण्याची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्याचा परिणाम आहे. त्यांना अन्न किंवा निवारा नको आहे, त्यांना घरी परत जायचे आहे ज्या दिवशी गाड्या बंद केल्या आहेत त्या दिवसापासून, प्रवासी कामगार घरी परत यावेत यासाठी राज्यांनी गाड्यांना आणखी २ hours तास धावण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांनी पंतप्रधान-सीएम व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये हा प्रश्न उपस्थित केला आणि प्रवासी कामगार घरी पोहोचण्यासाठी व्यवस्थेची विनंती केली. केंद्र शासनाने तयार केलेला परस्पर रस्ता नकाशा परप्रांत कामगारांना एका राज्यातून दुसर्या राज्यात सुरक्षित आणि कार्यक्षमतेने पोचण्यास मदत करेल. हा मुद्दा केंद्राकडे वारंवार उपस्थित केला जात आहे. सुरत, गुजरातमधील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती मोठ्या प्रमाणात अशीच परिस्थिती म्हणून पाहिले जात आहे आणि सर्व स्थलांतरित कामगार शिबिरांकडून मिळालेला अभिप्राय समान आहे. बरेचजण खाण्यास किंवा आत राहण्यास नकार देत आहेत. सध्या महाराष्ट्रात विविध निवारा शिबिरांमध्ये लाखाहून अधिक लोक वास्तव्यास आहेत. असेही आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
वांद्रे भागात असणाऱ्या अनेक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या या कामगारांनी टर्मिनसबाहेर जमत एक्स्प्रेस गाडी सोडण्याची मागणी केली. हजारोंच्या संख्येने झालेली ही गर्दी पाहता पोलिसांनी अथक प्रयत्नांनतर ही गर्दी पांगवली. लॉकडाऊनच्या काळात कारखान्यांमधील आणि दुसऱ्या राज्यांतील हे कामगार अतिशय कठीण परिस्थितीमध्ये राहत आहेत. शिवाय सोशल डिस्टंसिंगचंही पालन करणं त्यांच्यासाठी अशक्य आहे. त्यामुळे त्यांनी स्वगृही परतण्याचा सूर आळवला होता. आपआपल्या गावी जाण्यासाठी हे नागरिक निघाले होते. 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असल्याची कल्पना नसणाऱ्या नागरिकांनी आपल्या गावी जाण्यासाठी ही गर्दी केली होती. अचानक झालेल्या गर्दीमुळे पोलिसांची तारांबळ उडाली. पोलीस ह्या नागरिकांना समज देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तरीही हे नागरिक ऐकत नसल्याने पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. त्यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. देशभरात कोरोना व्हायरसचे संकट असतांना जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या गोष्टीचे कदाचित नागरिकांना भान राहिलेले दिसत नाही.
0 टिप्पण्या