नवविशाल बौद्ध मित्र मंडळाच्या वतीने गोरगरीब गरजू लोकांची निरंतर सेवा सुरूच

नवविशाल बौद्ध मित्र मंडळाच्या वतीने गोरगरीब गरजू लोकांची निरंतर सेवा सुरूचठाणे


ठाणे स्टेशन परिसरात वावरणाऱ्या गोरगरीब गरजू लोकांना नवविशाल बौद्ध मित्र मंडळाच्या वतीने आज दिनांक ११/०४/२०२० रोजी सिडको बस स्टँड येथे जेवणाची सोय करण्यात आली होती ही व्यवस्था लॉक डाउन झाल्यापासून निरंतर चालू ठेवण्यात आलेली आहे   तसेच ही जेवणाची  व्यवस्था १५ एप्रिल २०२० पर्यंत चालू ठेवण्यात येणार होती पण महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्याच्या कोरोनोग्रस्त रुग्णाच्या संख्येची होणारी वाढ  लक्षात घेऊन लॉक डाउन ची तारीख ३० एप्रिल २०२० पर्यंत वाढविण्यात आल्यामुळे आपल्या मंडळाच्या वतीने सुद्धा १५ एप्रिल ही तारीख वाढवून ३० एप्रिल तारखेपर्यंत  ही अन्नदानाची सोय करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी या प्रसंगी उमेद फाऊंडेशनचे  अध्यक्ष नीलेश (सनी ) कोळी तसेच मंडळाचे सदस्य अजय पवार , गणेश जयस्वाल, मुकेश पवार, किशोर बनकर,  डोनल्ड , दगडू ,कानिफ पवार, साहिल,  समीर,सलिम इ .उपस्थित होते. भरत वामन कोळी यांसकडून या सामाजिक उपक्रमा करिता धनादेश देण्यात आला तसेच उमेद फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश कोळी (सनी) यांनी धान्याच्या रूपात मंडळास सहकार्य केले तसेच नितेश पाटोळे(आऊ) शाखाप्रमुख यांनी सुद्धा धान्याच्या रूपात सहकार्य केले


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad