12 रुग्ण बरे होऊन घरी परत, कोव्हीड रुग्णांना होरायझन सोबत कौशल्या हॉस्पीटलचाही पर्याय

कोरोनाबाधित 12 रुग्ण बरे होऊन घरी परत,


कोव्हीड रुग्णांना होरायझन सोबत कौशल्या हॉस्पीटलचाही पर्याय


 महापालिका क्षेत्रात दिलासादायक वातावरणठाणे


ठाणे शहरात कोरोना कोव्हीड - १९ बाधित रुग्णांवर महापालिकेच्यावतीने अनेक उपाययोजना राबविण्यात असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. आजपर्यंत एकूण 12 रूग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.             कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात औषध फवारणी, ताप बाहयरुग्ण विभाग, नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टन्सची प्रभावी अंमलबजावणी, तज्ञ डॉक्टरांकडून ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे तपासणी, बाधित रुग्णांसाठी आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचार पद्धती आदी उपाययोजनामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होवून बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. एकूणच ठाण्यातील परिस्थिती समाधानकारक असून यापुढेही नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.


 ठाणे शहरातील कोव्हीड बाधित रूग्णांनी आवश्यक वैद्यकिय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिका विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करीत असून आता कोव्हीड रूग्णांना होरायझन या खासगी रूग्णालयासोबतच कौशल्या हॉस्पीटलचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले आहे. कोव्हीड बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. सिंघल यांनी यापूर्वीच ठाणे जिल्हा सामान्य या सरकारी रूग्णालयाबरोबरच घोडबंदर येथील होरायझन प्राईम हे खासगी रूग्णालय कोव्हीड रूग्णालय म्हणून घोषित केले होते. तथापि कोव्हीड रूग्णांची संख्या लक्षात घेवून या दोन रूग्णालयाबरोबरच आता कौशल्या हॉस्पीटलही आता कोव्हीड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले असून त्या ठिकाणी कोव्हीडसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad