Top Post Ad

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ब्रिटीशकालीन अमृतांजन पूल पाडणार

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ब्रिटीशकालीन अमृतांजन पूल पाडणार


      सध्यास्थितीत मोडकळीस आलेला ब्रिटीशकालीन अमृतांजन पूल  आता कायमचा पाडला जाणार आहे... राज्यात असलेली लॉकडाऊन परिस्थिती आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात घटलेली रस्तेवाहतूक याचा फायदा घेत रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य (MSRDC) हा पूल पाडणार आहे... ४ एप्रिल ते १४ एप्रिल २०२० या काळात स्फोटकांचा वापर करुन हा पूल पाडण्यात येणार आहे.        रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य अमृतांजून पूल पाडण्याचा विचार गेले अनेक दिवस करत होते... मात्र, या पूलाखालून एक्सप्रेस वे जातो... त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते... अशा स्थितीत हा पूल पाढण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळत नव्हता... अखेर लॉकडाऊनमुळे ही संधी आयतीच चालून आलीये... रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांनी लागलीच ही संधी साधत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रायगड यांना माहिती देत हा पूल पाढण्याबाबत परवानगी माहितली... जिल्हा दंडाधिऱ्यांनीही वेळीच ही मान्यता दिल्याने आता हा पूल पाडला जाणार आहे... कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर असलेला धोका ओळखून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन पाळण्यात आला आहे... लॉकडाऊन परिस्थितीमुळे बहुतांश व्यवहार ठप्प आहेत... त्यामुळे अवघ्या देशाचे चक्रच थांबले आहे... असे असताना रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मात्र या स्थितीचा चांगल्या कामासाठी वापर करताना दिसत आहे...


अमृतांजन पूलाचा थोडक्यात इतिहास...
       अमृतांजन पूल हा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आहे... या मार्गावर सुमारे ४५.५०० मीटर अंतरावर हा पूल आहे... हा पूल ब्रिटीशकालीन आहे... ब्रिटीशांच्या काळात या पूलावरुन होणारी वाहतूक ही तितकी गतीमान आणि अधिक प्रमाणात नव्हती... मात्र पुढे राज्याच्या विकासासोबत या पूलावरुन होणारी वाहतूक वाढली... परिणामी वहातुकीसाठी पूल अरुंद आणि अपूरा ठरु लागला... त्यातच खंडाळ्याच्या घाटाच्या अलीकडे या पूलाचा खांब येत होता, जो वाहतुकीसाठी अडचण ठरत होता... या पूलावरील अरुंद वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले होते... त्यामुळे नागरिकांकडूनही हा पूल पाडण्यात यावा अशी मागणी होत होती...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com