Top Post Ad

देवांनी मैदान सोडले तरी बुद्धांनी पाय रोवलेत

आज मा. संजय राऊत साहेबांचा सामनामधील देवांनी 'मैदान सोडले' हा लेख वाचला. भारतातीतल लोकांची अंधश्रद्धाळू मानसिकता व ईश्वराची निष्क्रियता याचा खरपूस समाचार या लेखात घेतला आहे असे वाचल्यानंतर आपणास समजते. इथे मा. संजय राऊत साहेबांनी देवांवर / ईश्वरावर हल्ला चढवताना बुद्धांनाही ईश्वराचा दर्जा देऊन त्याच चौकटीत उभे केल्याचे आपणास वाचावयास मिळते. 
आता प्रश्न असा आहे की
बुद्धांनी स्वतःला कधीही ईश्वर म्हटले आहे का ? 
बुद्धांनी स्वतःला कधीही मी मोक्षदाता आहे असे म्हटले आहे का ?
उत्तर आहे "नाही."
जगात कोणत्याही धर्मापेक्षा जास्त असलेले साहित्य हे बुद्ध धम्माचे आहे. बुद्ध धम्मातील कोणताही ग्रंथ चाळा आणि बुद्धांनी स्वतःला मी ईश्वर आहे हे म्हटल्याचे दाखवून द्या. 

बुद्धांनी आपल्या ज्ञानप्राप्तीपासून ते त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत जगाला धम्म शिकवला आहे म्हणजेच माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे शिकवले आहे, निसर्ग नियम शिकवले आहे, निसर्गावर प्रेम करायला शिकवले आहे व निसर्गाची काळजी घेण्यास शिकवले आहे ( आणखी खूप काही लिहू शकतो परंतु इथे थोडक्यात ) 
मनुष्य जेव्हा निसर्ग नियमांविरुद्ध वागतो तेव्हाच अनेक रोग जन्म घेत असतात. आपल्या लेखात बोधगया महाविहार देखील बंद केल्याचा उल्लेख आहे. बुद्धांची शिकवण ही विज्ञानाला धरूनच असते त्यामुळे बोधगया महाविहार देखील बंद ठेवणे उचितच आहे.  भगवान बुद्ध कोणताही अतिरेक शिकवत नाहीत त्यामुळे बुद्धांना प्रथम जाणून घेऊन नंतरच त्यांच्यावर कोणतीही टिका टिप्पणी करावी ही आमची बुद्ध अनुयायांची आपणांस नम्र विनंती आहे. 

मा. संजय राऊत साहेबांचा हा लेख वाचून आमचे काही पुढारलेले बौद्ध बांधव त्यांचे अभिनंदन करण्यास सरसावले, सोशल माध्यमांवर त्यांचे लेख ही प्रसारित करू लागले. परंतु बौद्ध बांधवांना ईश्वरासोबतच बुद्धांबाबत सुद्धा असे लिहिणे जराही खटकले नाही.
का खटकले नसावे ?
याचे कारण एकच आहे आहे ते म्हणजे स्वतःच्या धम्माबाबत असलेले अज्ञान.
या लेखाला एक तात्काळ उत्तर / प्रतिसाद मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा आला. त्यांनी आपल्या पत्रात संजय राऊत साहेबांना म्हटले आहे - आपण या लेखाचा हिंदी, इंग्रजी व इतर भाषेत अनुवाद करावा जेणेकरून भारतीय जनता धार्मिक कोरोनामुक्त होईल. यात त्यांनी पुरोहित, भटजी, मुल्ला मौलवी, पाद्री, फादर यांच्यासोबतच भन्ते म्हणजेच बौद्ध भिक्खु गणालाही कोरोना विषाणू संबोधले आहे.
मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांना भिक्खु गणाचा असा कोणता अनुभव आला की त्यांनी त्यांना विषाणू संबोधले ? भिक्खु गणाकडून समाजाला आजपर्यंत अशी कोणती गंभीर हानी पोहचली आहे ?
एक दोन धर्मावर टीका करण्यासाठी सर्व धर्मांना एकाच नजरेतून पाहणे हे योग्य नव्हे.
तरी समस्त बुद्ध अनुयायांनी असल्या लेखांचा / पत्रांचा उदोउदो करून नवोदित बौद्धांची बुद्ध धम्माच्या बाबतीत दिशाभूल करू नये. आपण विद्वान असाल आपली विद्वत्ता ज्या क्षेत्रात कामी येते तिथे वापरावी अन्यथा बुद्धांनीच सांगितले आहे 'एही पस्सिको' - या आणि पहा. हा धम्म येऊन पाहण्यासारखा आहे, अनुभवण्यासारखा आहे. 

अरविंद भंडारे 
अध्यक्ष - पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई 
22/03/2020
------------------------------------

डोक्यातून मेंदू पळाला..!
थोतांडात मानवतावादी बुद्धाला ओढु नका...! - दिपक केदार


कोरोनोवर अग्रलेख लिहिणाऱ्या संजय राऊतांनी बौद्ध विहाराना मंदिर संबोधलं आणि विज्ञानवादी गौतम बुद्धाला थोतांडी देवाच्या लाईनमध्ये बसवले. ही त्यांची मोठी घोडचूक आहे. राऊतांचे राजकीय 40 वर्ष टाळ कुटण्यात गेले. धर्माच्या नावाखाली राजकारण करण्यात गेले, त्यांना आता गाडगेबाबा समजायला लागलेत हे दुर्दैव आहे. त्यांना गाडगेबाबाचे विचार 20 वर्ष आधी कळाले असते तर त्यांनी राम मंदिरासाठी तरुणांचे आयुष्य बरबाद केले नसते. प्रबोधनकार ठाकरेना समजून घेतले असते तर त्यांना गौतम बुद्ध समजले असते.
आज जगाला गौतम बुद्धांच्या मानवतेच्या विज्ञानवादी विचारांची गरज आहे. गोमूत्र प्या, टाळ्या-थाळ्या वाजवा म्हणणाऱ्या या देशाला गौतम बुद्धांच्या विचारांची गरज आहे. महामारी आल्यावर मंदिरातून देव पळतात हा सुद्धा मोठा जोक आहे कारण मंदिरात घंटा आणि लुटमारीच्या पेट्याशिवाय काहीच नसतं. मंदिरात बाराही महिने देव नसतो हे राऊतांनी समजून घेतले पाहिजे. त्यामुळे अस्तित्वात नसलेले देव पळून कसे जातील?
आजही देशात मोठं संकट उभा राहिलं तर बुद्ध विहार हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करायला तयार असतील आणि तिथे फक्त विज्ञानवादी डॉक्टरांचा इलाज होईल. गोमूत्र शिंपडून, अंगार धुपार करून अंधश्रद्धा निर्माण करणारा अड्डा नसेल.
आम्ही समजू शकतो अचानकपणे बदलेली भूमिका ही मंदिर व विहार आणि देव व बुद्ध यातील फरक समजून घेता येणार नाही. ज्यांनी उभं आयुष्य मंदिराच्या राजकारणात घातलं त्यांना विहारं आणि विज्ञानी मानवतावादी बुद्ध एवढ्यात समजणार नाही. प्रबोधनकार न समजू शकलेले आज गाडगेबाबा तरी उमजू लागलेत ही चांगली बाब आहे.
राऊतांनी बुद्ध समजून घ्यावा आणि जगाच्या पटलावर ईश्वर नाही ही संकल्पना व पहिला सिद्धांत बुद्धाने मांडला याचं भान ठेवावा. थोतांडी, अंधश्रद्धावादी मंदिर देव यांच्या भानगडीत बुद्धाला ओढू नये. तुमच्या घरातला देव्हारा आणि त्यातला देव सुरक्षित आहे का? त्याला मास्क, सॅनिटायझरची गरज आहे का हे त्याला विचारत बसावे उगाच बुद्धाला मधी आणू नका. बुद्धांनी आणि बौद्ध अनुयायांनी कधीच देव्हारे काढले आहेत आणि मानवतेच प्रतीक घरात आणलं आहे.
फुले, शाहू, आंबेडकर, गाडगेबाबा, संत तुकाराम, प्रबोधनकार ठाकरे यांना समजून घेतल्यास सगळे बुद्ध मांडतात, त्यामुळे महापुरुषांचा विचार रुजवला असता तर हा देश बौद्ध राष्ट्र झाला असता. परंतु पोटाची सोय करण्यासाठी दगडं जिवन्त ठेवणारी ही व्यवस्था येते मजबूत आहे. तिच्या माध्यमातून फळ चाकण सुरू आहे. सत्ता येताच पाथरीला जन्म झाला की शिर्डीला झाला यावरून जे आर्थिक धोरणाचा भांडण सुरू आहे ते जनतेला कळत. त्यामुळे उगाच बुद्धांना देवाच्या रांगेत बसवू नका. कुठून कोण पळालं यावर आमचा विश्वास नाही. एकमात्र नक्की आपल्या डोक्यातूनच मेंदू पळालेला दिसतोय...

- दिपक केदार
अध्यक्ष - ऑल इंडिया पँथर सेना
#AllindiaPantherSena










 



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com