Trending

6/recent/ticker-posts

ठाण्यात पत्रकारावर हल्ला, स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद

ठाण्यात पत्रकारावर हल्ला, स्थानिक पोलिसांची भूमिका संशयास्पद


चंद्रभूषण विश्वकर्मा यांचा आरोपठाणे
 हिन्दी दैनिक तरुणमित्रचे ठाण्यातील विशेष प्रतिनिधि  चंद्रभूषण विश्वकर्मा यांच्यावर १० मार्च  रोजी राहत्या घरात हल्ला करण्यात आला. यामध्ये त्यांना दुखापत झाली असून सुदैवाने ते बचावले.  हा हल्ला संध्याकाळी ५:५० च्या सुमारास  अनिल निषाद व प्रदीप निषाद यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.   १० ते १२ जण सळया, बांबु घेऊन मारण्याकरीता आले होते. त्यांनी चंद्रभूषण यांच्यावर हल्ला केला. मात्र सुदैवाने ते बचावले. त्यांना बांबु आणि सळयांनी मारहाण केली. याबाबत स्थानिक पोलिस स्टेशनला तक्रार नोदंवण्यात आली आहे. सदर व्यक्तींवर श्रीनगर पोलिसांनी एफ.आय.आर दाखल न करता केवळ एन.सी.लिहून घेतल्याने यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप चंद्रभूषण यांनी केला आहे. 
 मला मारहाण केली तेव्हा माझ्या परिसरातील महिला साक्षीदार आहेत. सदर दोन महिलांना या मारहाणीत जखम देखील झालेली आहे. तरी सदर मुलांवर काही कार्यवाही केली नाही. त्यामुळे मला व माझ्या परिवाराला अनिल निषाद व प्रदीप निषाद सोबत असलेली मुले यांच्यापासुन आमच्या जिवितास धोका आहे. सदर मला व माझ्या परिवारास काही बरे वाईट झाले तर त्याचे जबाबदार अनिल निषाद, प्रदीप निषाद आणि शासन व प्रशासन असेल, असे चंद्रभूषण यांनी सहाय्याक पोलिस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. 


Post a Comment

0 Comments