Trending

6/recent/ticker-posts

होळी सणाची सत्यता

होलिका दहन अर्थात होळी....
 होळीच्या सणाचा थोडक्यात इतिहास हिरण्यकश्यपू हा द्रविड (बहूजन) संस्कृतीतील भारतीय राजा होता. विदेशी ब्राह्मणांनी आधीची सिंधू व गोंड संस्कृतीचा नाश करून येथील जनतेला गुलाम केले होते. याची जाण हिरण्यकश्यपूला होती. त्यामुळे हिरण्यकश्यपूने विदेशी ब्राह्मणांना आपल्या राजदरबारात थारा दिला नाही. हिरण्यकश्यपूने विदेशी ब्राह्मणांसोबत सतत संघर्ष करून आपली राजसत्ता टिकवण्याचा सतत प्रयत्न केला होता. हिरण्यकश्यपू हा शुरवीर, पराक्रमी व लढवय्या असा बुद्धीमान शासक होता, राजाला विदेशी ब्राह्मणांच्या कपटनितीचा पुर्ण अंदाज होता. म्हणून ब्राह्मणांशी सातत्याने फटकून रहावे लागत होते. विदेशी ब्राह्मणांना राजा जवळ फिरकू देत नसे . या राजाला इतरांप्रमाणे सहजासहजी पराभूत करणे शक्य नाही असे विदेशी ब्राह्मण ओळखून होते. त्यासाठी त्यांनी आपल्या कपटनितीचा उपयोग केला .विदेशी ब्राह्मणांनी आपली नजर हिरण्यकश्यपुचा मुलगा प्रल्हाद याच्याकडे वळविली व प्रल्हादाच्या मार्फत ब्राह्मणांनी हिरणकश्यपूच्या दरबारात प्रवेश मिळविण्याचा बेत आखला व त्यात विदेशी ब्राह्मण  यशस्वी झाले.
हिरण्यकश्यपू हा अंधश्रद्धेचा विरोधक होता. विदेशी आर्य ब्राह्मणा यांनी याच अंधश्रद्धेने इथल्या लोकांना मानसिक गुलाम केले आहे याची जाणीव त्याला होता. मात्र बाह्मणांनी त्याच्या मुलाला, प्रल्हादला या अंध भक्तीत रमवले व वडिलांच्या विरोधी सवयी प्रल्हादामध्ये निर्माण केल्या. त्यांनी प्रल्हादाला तथाकथित ईश्वर सांगून त्याबद्दल आसक्ती वाढवली. त्याला कुटनितीद्वारे आपलेसे केले. प्रल्हाद अंधश्रद्धेच्या आहारी गेला व वडिलांचा धिक्कार करू लागला. अशा तऱ्हेने प्रल्हादाच्या मार्फत विदेशी ब्राह्मणांनी कुट-कपटनितीचा अवलंब करून राजदरबारात प्रवेश मिळविला. कारण युद्धात बलाढ्य अशा हिरणकश्यपूला पराभूत करणे विदेशी ब्राह्मणांना सहज शक्य नव्हते. प्रल्हादाच्या मदतीने हिरणकश्यपूच्या शयनकक्षात विष्णू नावाच्या विदेशी ब्राह्मणाने प्रवेश मिळविला. चित्रविचित्र वेशभूषा करून लपून राहिला. संधी मिळताच त्याने हिरण्यकश्यपूवर झडप घातली. गाफिल असलेल्या हिरण्यकश्यपुवर अचाकन हल्ला करून कपटाने हिरण्यकश्यपूचा खून केला.
एका भारतीय राजाला विदेशी ब्राह्मणांनी अशा तऱ्हेने संपवले. (जे आज चे Sc,St, Obc, Minorities आहेत त्यांचा हा राजा होता). मात्र हा सारा प्रकार हिरण्यकश्यपूची बहिण होलिका हिने पाहिला. होलिका ही राजा हिरण्यकश्यपूच्या खुनाची एकमेव साक्षीदार होती. याची माहिती ब्राह्मणांना मिळताच एकटे गाठून होलिकावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला जिवंत जाळून टाकले आणि खुनाचा पुरावा नष्ट केला. तिच्या किंकाळ्या लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून त्या आगीभोवती जोर जोराने स्वत:च आरडाओरडा करू लागले. हिरण्यकश्यपूच्या खुनाचा पुरावा नष्ट झाल्याने त्यांनी एकमेकांना कुमकूम तिलक लावला आणि आनंदोत्सव साजरा केला. त्याला धुळीवंदन असे नाव दिले. तसेच प्रजा विदेशी ब्राह्मणांच्या विरोधात विद्रोह करू नये म्हणून भगवान विष्णूने नरसिंहावतार घेऊन राजा हिरण्यकश्यपूचा वध केला! अशा भ्रामक गोष्टींचा समाजात प्रचार केला. याप्रकारे विदेशी ब्राह्मणांनी राजा हिरण्यकश्यपूचा खून केला आणि तेथील प्रजेला गुलाम बनविले. त्यानंतर शिक्षण, संपत्ती,संरक्षणाचे अधिकार हिसकावून घेतले,असा आहे थोडक्यात होळीचा इतिहास.
आजही थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आपल्याला पहायला मिळत आहे. 
         या दिवशी पुढील गोष्टी होतात 
आई बहीणीवर अर्वाच्य/ घाणेरड्या शिव्या देणे.   दारू पिऊन तसेच इतर नशेली पदार्थ घेऊन अश्लील धिंगाना केला जातो  एकमेकांचे कपडे फाडणे, (गरीबांना व्यवस्थित कपडे घालायला भेटत नाहीत आणि या दिवशी कपडे फाडले जातात),  चौकाचौकात होळी पेटविली जाते त्यासाठी लागणारे लाकडे, गौऱ्या, गवत इ.  विनाकारण जाळले जाते. अगोदरच जंगल कमी झाले आहे. इंधन विनाकारण जाळले जाते तसेच धुरामध्ये निघणारा #कार्बन_मोनॉक्साइड पर्यावरणाचे प्रदूषण वाढवणार.. केमिकल च्या रंगांची उधळण केली जाते, रंग डोळ्यात गेला तर अंध होण्याची शक्यता, तसेच त्वचेचे आजार होण्याची शक्यता !काही जण रंग सोडून वार्निश, पेन्ट, घाणपाणी, चिखलयुक्त पाणी, डांबर,वंगन, तव्याचे काळे इत्यादी गोष्टी वापरतात यापासून होणारे दुष्परिणाम जास्त वाईट असतात. नशा करून, कोंबडे-बकरे कापून मांसाहार करणे .) चोऱ्या, लुटालूट, मारपीट, खुन-खराबा सगळ्यात जास्त होळी/धुलिवंदनाच्या दिवशी होतात.) कोणतीच गोष्ट मानवी कल्याणाची होत नाही या दिवशी सगळ्या गोष्टी नुकसानकारकच असतात
जर आपल्याला वाटत असेल कि आपल्या पूर्वजांच्या हत्येचा दिवस आणि बहिणीच्या बलात्काराचा दिवस हा आनंदोत्सव वाटत असेल तर बिनधास्त साजरा करा._एवढ्या दिवस बहीणीच्या बलात्काराच्या दिवशी रंग खेळून नाचत होतो कारण आपल्याला माहीती नव्हती आणि अजुन नाचत आहोत ! आता माहीती होत आहे आजपासून आपल्या पूर्वजांच्या हत्येच्या दिवशी आणि बहिणीच्या बलात्काराच्या दिवशी माहीती असून सुद्धा रंग खेळून नाचलो तर या जगात आपल्या एवढे नालायक कोणीच नाहीं ।


भारतीय सणांची पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचा इतिहास नक्कीच अशा काही तरी गूढ कथांनी भरलेला आहे. खरे तर आपण याचा शोध घेऊन २१ व्या शतकात तरी येणाऱ्या पिढ्यांना तो माहिती करून देणे गरजेचे आहे. त्या्मुळे चाणाक्ष लोकांनी याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. यात काय तत्थ्य आहे का हे ही शोधले पाहिजे. 


पुरान कथा, (तथाकथित ) महाकाव्ये आणि त्यांचेशी निगडीत आख्यायीकाचे विस्तार ग्रंथ इत्यादीचे आवलोकन करून त्यानुसार रुजविलेल्या सणोत्सवी परंपरा चा  करता " तुमच्या दुखाचा, तो आमच्या आनंदाचा दिवस (आणि ) तुमच्या आनंदाचा, तो  आमच्या दुखाचा दिवस" हेच तत्व केंद्रीभूत असल्याची भावना त्यातून पुढे येते.. यात '   कोणाचे दुख?' आणि "कोणाचा आनंद?' याचा विचार करण्याची आवश्यकता सणोत्सवातील  कोलाहल आणि झगमटाने आज संपुष्टात आणली आहे. परिणामत: त्याची कारणमीमांसा  करण्याऐवजी  एवढे सारे लोक जे करतात, ते कसे चूक असू शकते? अशा समूह केन्द्री धारणेला कवटाळत चुकावर हि  सतत पांघरून घालण्याची वृत्ती बळकट होते.कालांतराने तो आपल्या सवयीचा  भाग झाला कि, त्या धारणांविरोधात  निर्णय घेण्याची  हिम्मतच होत नाही. अशाप्रकारे परंपराचे  लोढणे वाहने हे जणू आपले कर्तव्यच असल्याचा समज तयार होवून त्याचे उदात्तीकरणाची प्रक्रिया दृढ होते.


होळी आणि त्यानतरचा होळीचा पाडवा हा  सुद्धा असाच एक सण आहे. पुरांणकथामधील अवास्तव व अतिरंजित सादरीकरण एका क्षणासाठी  बाजूला ठेवू या. मात्र त्या कथामधील  भाव व  द्वंदाचे  स्वरूप लक्षात घेवून विश्लेषण  करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामागची  ऐतिहासिक  पार्श्वभूमी  समजून घेन्यास मदत होते. कारण  हिरण्यकश्यप  कोण? तर म्हणजे असुर. होलिका कोण? तर त्याची बहिण. म्हणजे असुरच. परंतु हे 'असुर'लोक म्हणजे कोण? याचा विचार करताना  त्यांना दुष्ट का म्हणून लेखले? व कोणी लेखले? या असुरानच राक्षस  का संबोधले? तसेच या  कथामधील तथाकथित 'देव' लोक हे नेमके  कोणते लोकसमूह होते? आणि या पराक्रमी  असुराना कपटाने अथवा षड्यंत्र करूनच का संपविण्यात आले?  या प्रश्नाची उत्तरे  शोधण्याची तसदी  घेतल्याशिवाय पुराणकथाचे अधिराज्य  भारताच्या  समाज  मनावर  का आहे? या अनुषंगाने विचार करण्याचा रोखच तयार होत नाही.  परिणामता चुकीच्या गोष्टी विरोधात रोष निर्माण होण्याची प्रक्रिया अवरुद्ध होते.


नागपुजक  म्हणून जगणारे नागलोक हे गणतांत्रिक होते, त्यांची  गणतंत्र  होते. याउलट  स्वता:ला आर्य ( भटके हा मुळ  अर्थ नंतर श्रेष्ठ म्हणून उपयोगात आणला गेला)  मानणारे लोक भिन्न संस्कारामुळे वेगवेगळ्या प्रवृतीचे  तयार झाले होते.   अग्नीला पूजनीय मानणारे (अग्नी पूजक) अशीच त्यांची प्रतिमा आपणाला वाचायला मिळते. बुद्ध पूर्व काळातही  शिशुनाग,कालानाग, व सम्राट अशोक काळात महाकाळ इत्यादी नागवंशीय राजाचा उल्लेख आपणाला मिळतो. या नागवंशीयामध्ये  फुट पाडून त्यांचेवर  मात करण्याचे दाखले आपणाला इतिहासात मिळतात. गणतांत्रिक राज्यांना सरळ युद्धात  हरवणे कठीण मानत  कौटिल्य सुद्धा  त्यांचा बिमोड   प्राधान्याने   करण्यासंदर्भात  सूचना करतो. पुढे मौर्य साम्राज्याचा विस्तार व नंतर सम्राट अशोकाचा काल खंड  लक्षात येता एकराजे पद्धतीचा विस्तार व स्वीकृती  आणि  गणतांत्रिक  गणाचा  ऱ्हास अशा प्रकारचे चित्र दिसून येते. मात्र  अग्निपूजक व नागपुजक लोकामधील वैमनस्य  संपुष्टात  न येता  ते बराच   काळापर्यंत  धूमसतच राहिले याची कल्पना आपणाला  बुद्धपूर्व व बुद्धपश्चात काळाच्या इतिहासातून मिळते.


 नागपुजक व अग्निपूजक या  व्दंव्दात  नागलोकाना जाळल्याचे प्रतीकात्मक उल्लेख 'विषारी नागांना जाळले'  अशा स्वरुपात यज्ञवंशीय  गुणीजनांनीच  त्यांच्या ग्रंथात नोंदवून  ठेवलेआहेत. पुराणकथांमध्ये हिरण्यकश्यपची ओळख एका असूर गणपती  ( गणप्रमुख या नात्याने) च्या नात्याने करून देतो  पुरांनकथानमध्ये यज्ञवशीयांच जय व नागवशीयांबाबत पराकोटीचा व्देष अशा प्रकारचे लेखन आढळते.  ती पुराणे यज्ञवंशियानी लिहिली आहेत. त्यामुळेच हिरण्यकश्यपूविषयी  अत्यंधीक घृणा त्यामध्ये व्यक्त केलेली आहे.


-----------------------------


जेंव्हा मनुस्मृतीची जाहीर रीत्या होळी केली गेली तेंव्हाच पारंपरिक उत्सव त्यौहाराची मालिका भस्म व्हायला पाहिजे होती.
पण तसे न होता प्रत्येक पारंपरिक उत्सव हा आमच्या अन्यायाचा बळी देऊन साजरा करतात हि धारणा नेमक आम्हाला काय शिकवते.?
पारंपरिक उत्सव त्यागायचे कि आठवायचे.?
मग आठवायचे तर आम्ही अजून उत्सवा निमित्ताने गोडधोड-पुरणपोळी करुन खाणे टाळलेय का.?
जर टाळलेच नसेल तर अधुनिकतेच्या नावाने ज्ञान पाजळतांना आम्ही आज नेमकं कोणत्या ठिकाणी आहोत कुठेतरी आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे.
जर आम्ही आजही पारंपरिक उत्सव न साजरे करता घरात गोडधोड करुन खात असू तर अजूनही आम्ही मनुस्मृतीच्या अधिन आहोत हे नाकारता येणार नाही तसेच प्रत्येक उत्सव आमच्या पुर्वजांच्या अन्यायाची दास्तान म्हणून सांगत असू तर आपण हे हि मान्य करु आमचे पुर्वज अन्याय ग्रस्त झाले सनातनी व्यवस्थेकडून याच आम्हाला दुःख नाही जाण हि नाही आहे ते फक्त आपल्या ज्ञानातील अज्ञानाचा अहंकार आहे.
अर्थातच आम्हाला कळतय पण वळत नाही अस नक्कीच म्हणतां येईल.
आपण जर अधुनिक असू मनुस्मृतीला नाकारत असू तर पारंपरिक सण,उत्सव आमच्या अन्यायाची गाथा म्हणून गोड-धोड बनवून खात असू तर आपण नक्कीच प्रगत,अधुनिक आणि नास्तिक म्हणून घेण्यासाठी  पात्र आहोत की नाही हे आता प्रत्येकांने स्वतःला विचारले पाहिजे अन्यथा गपगुमान कुठल्याही सण-उत्सवाला अंगुली निर्देश न करता गोड-धोड खाऊन ढेकर दिलेला बरा.
सदर विषय हा त्या समाजबांधवा विषयी आहे जे पारंपरिक उत्सवावर भरभरून लिखाण करुन भावनिक तर करतात पण घरी सण म्हणून पुरण-पोळी करुन खातात.


----------------------------------------------------


 


 


आजही आपण पाहिले तर


६ डिसेंबर या तमाम बहुजनांच्या दु:खाच्या दिवशी बाबरी मस्जीद पाडून आनंदोत्सव साजरी करण्याचा प्रयत्न केला गेला.


२६ नोव्हेंबर संविधान दिन साजरी करण्याची सुरुवात झाली तर त्याच दिवशी करकरे आणि इतर अधिकाऱ्यांचा चकमकीत मृत्यू झाला यामागे कोणाचे षडंयत्र होते हे आता साऱ्यांनाच ठाऊक झाले आहे. संविधान दिन हा बहुजनांचा आनंदाचा दिवस त्याला दु:खाची झालर लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला


२६ जानेवारी सगळीकडे गणराज्य दिन म्हणून साजरी केल्या जात असताना त्या दिवशी सत्यनारायणाची पुजा घालून त्या दिवसाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला गेला.


Post a Comment

0 Comments