Top Post Ad

युद्धपातळीवर शहर निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम सुरू 

सर्व परिमंडळातील प्रभाग समिती कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना


युद्धपातळीवर शहर निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम सुरू 
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी


ठाणे


 कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.शहरातील दुकाने, मेडिकलशॉप, बसस्टॉप, रुग्णालये व कार्यालये 10 ट्रॅक्टर्स,10 बोलेरो ,10 अग्निशमनदलाची वाहने, 110 हॅण्डपंपाद्वारे 1230 लिटर सोडियम हायपोक्लोराईटचा वापर करून जवळपास  12,300 लिटर औषधाची फवारणी करण्यात आली.  


      निर्जंतुकीरणाची व्यापकता आणि तीव्रता वाढावी या पार्श्वभूमीवर टाटा एसीईची 5 वाहने व 5 बोलेरो ही १० अतिरिक्त वाहने या मोहिमेत सहभागी करून स्प्रेईंगची क्षमता वाढविण्यात येत आहे. आज 1230 लिटर सोडियम हायपोक्लोराईटचे 1:10 हे प्रमाण घेवून 12,300 लिटर सोडियम हायपोक्लोराईटचे स्प्रेईंग शहरातील दुकाने, मेडिकलशॉप, बसस्टॉप, रुग्णालये व कार्यालये आदी ठिकाणी करण्यात आले.  करोना ( कोविड - १९ ) बाबत प्रतिबंधक उपाययोजनेसाठी प्रत्येक प्रभाग समिती निहाय कृती आराखडा तयार करण्यात आला असून ट्रॅक्टर / बोलेरो जीप जेट स्प्रेव्दारे सोडियम हायपोक्लोराईटने  संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.




 


सर्व परिमंडळातील प्रभाग समिती कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना


नागरिकांनी काही अडचणी असल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन


ठाणे


नागरिकांना त्यांच्या आरोग्य, स्वच्छता व वैद्यकीय सेवेबाबत तसेच जीवनावश्यक सेवा पुरवठ्यासंदर्भात काही अडचणी असल्यास आवश्यक ती सर्व कार्यवाही महापालिकेमार्फत करण्यासाठी सर्व परिमंडळ उपआयुक्त, सर्व प्रभाग समिती स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून नागरिकांनी आपल्या अडचणी संदर्भात नजिकच्या प्रभाग समिती कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.


   ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोव्हीड - १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यात येत आहेत . या संदर्भात केंद्रशासन तसेच राज्यशासनाने २१ दिवसांच्या लाकडाऊनचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे शहरामध्ये विविध वस्तु सेवा पुरवण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ नये व या परिस्थितीत  नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक महापालिकेच्यावतीने आवश्यक ती मदत करण्यासाठी सर्व परिमंडळ उपआयुक्त, सर्व प्रभाग समिती स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष त्वरित कार्यान्वित करण्यात आले आहेत. नागरिकांना काही अडचणी असल्यास नजिकच्या प्रभाग समिती कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या नंबरवर संपर्क साधता येणार आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची नोंद घेऊन शासन निर्देशानुसारआवश्यक ती उपाययोजना महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे.
      
       सदर प्रभाग समिती स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन कक्षावर दैनंदिन ३ पाळयांमध्ये किमान २ कर्मचारी तक्रारी नोंदवुन घेण्यासाठी असेल व त्याबाबत पुढील पाठपुरावा करण्यासाठी एक वरिष्ठ अधिकारी अशा ३ जणांचे पथक प्रत्येक प्रभाग समितीमधील सार्वजनिक बांधकाम विभाग , करवसुली विभाग, समाज विकास विभाग , सचिव विभाग व प्रभाग स्तरावरील अन्य विभागामधील कर्मचाऱ्यांमधून नेमणूक करण्यात येणार आहे.
       
     या पथकामार्फत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल Covid१९.tumc@thanecity.gov.in व mc@thanecity.gov.in या संकेतस्थळावर पाठविण्यात येणार आहे.
     
     प्रभाग समिती निहाय नियंत्रण कक्ष नौपाडा प्रभाग समिती: ०२२-२५३३४४७१, उथळसर प्रभाग समिती :
०२२-२५४७३५६८, वागळे प्रभाग समिती :०२२-२५८२६८६३, लोकमान्य- सावरकर प्रभाग समिती :
०२२-२५८८५८०१, वर्तकनगर प्रभाग समिती :
०२२-२५८८५०४३, माजीवडा मानपाडा प्रभाग समिती :-
०२२-२५४४७२२०, कळवा प्रभाग समिती ०२२-२५४१०४७०, मुंब्रा प्रभाग समिती ०२२-२५४६२४२४/२५४६२४४४ तरी नागरिकांनी  काही अडचणी असल्यास नजिकच्या प्रभाग समिती कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधावा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com