Trending

6/recent/ticker-posts

जातिव्यवस्थेच्या बुरुजाला सुरूंग लावण्याचे काम

सत्याग्रहाचे वर्ष १९३०भारताच्या इतिहासात १९३० हे वर्ष नवीन विचारांचे, प्रतिकाराचे, पराक्रमाचे व दोन जगप्रसिद्ध सत्याग्रहाचे वर्ष आहे. २ मार्च १९३०रोजी डॉ. बाबासाहेबांनी नाशिक काळाराम मंदिर१९३० हे सत्याग्रहचा सामाजिक लढा सुरू केला .तर १२ मार्च १९३० रोजी महात्मा गांधींनी दांडीयात्राने राजकीय लढा सुरू केला होता .या दोन आंदोलनातून महात्मा गांधींजी सामाजिक परिवर्तन क्रांतीला किती जगले .आणि डॉ.बाबासाहेब यांनी  सामाजिक परिवर्तन क्रांतीला किती यशस्वी केली.याचे उत्तर पुढे काळानेच दिले आहे.
       १७ नोव्हेंबर, १९२९ रोजी काळाराम मंदिर सत्याग्रहासंदर्भात देवळाली येथे  सभा घेण्यात आली. या सभेचे अध्यक्ष संभाजी रोकडे तर भाऊराव उर्फ दादासाहेब गायकवाड हे चिटणीस होते.२५ जानेवारी, १९३० रोजी  त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तिनाथ यात्रेच्या वेळी सत्याग्रहाची पहिली रुपरेषा म्हणजेच  एक टोलेजंग सभा घेण्यात आली. या सभेला डॉ.बाबासाहेब स्वत: येणार होते, पण काही कारणास्तव ते येऊ न शकल्याने अमृतराव रणखांबे यांनी अध्यक्षपद भूषविले. 
      २ मार्च १९३० रोजी बाहेरून नासिक  सत्याग्रहात आठ हजार भीमसैनिक  सामिल झाले होते.. दुपारी तीन वाजता १५ हजार लोकांची एक  भव्य मिरवणूक निघाली.आणि  नाशिक काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाने ज्वलंत इतिहासाचे पान उघडले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, अमृतराव रणखांबे, तुळशीराम संभाजी काळे, शिवराम मारू, पांडुरंग जिबाजी सबनीस, गणपत सज्जन कानडे, सावळेराम दाणी, संभाजी रोकडे, भवानराव बागूल इत्यादी कार्यकर्त्यांनी केशव नारायण देव यांच्या अध्यक्षतेखाली विहीतगाव-देवळाली येथे मंदिर प्रवेशाची घोषणा केली.  
   डॉ.  बाबासाहेबांच्या आदेशाने ३ तारखेला सत्याग्रहाची सुरुवात झाली. सत्याग्रहांच्या चार तुकड्या पाडण्यात आल्या. प्रत्येक तुकडीत दीडशे सत्याग्रही होते. या तुकड्या मंदिराच्या चारी दरवाजावर सकाळपासून ठाण मांडून बसल्या. पतितपावनदास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार खंदे सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. बाबासाहेब अन् भाऊ राव हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार अन् रामाचे दर्शन घेणार, असे ठरले होते.
    नाशिकला अलेल्याव आयुक्त घोषाळ यांनी डॉ. बाबासाहेबांचे मत जाणून घेतले.   बाबासाहेब म्हणाले, 'मी माझ्या लोकांना हक्क मिळवून देण्यासाठी लढा उभारला आहे, वाजवी तडजोड होत असल्यास आम्ही सत्याग्रह तहकूब करायला तयार आहोत.' सत्याग्रहाची सत्य परिस्थिती जाणून घेतल्यावर तत्कालीन आयुक्त घोषाळांनी हॉटसन साहेबांस एक पत्र लिहिले होते. त्यात नमूद केले आहे की,  मला आधी वाटत होते त्यापेक्षा हे प्रकरण खूपच गंभीर आहे. देवळाला सरळ सरळ वेढा घालण्यात आला आहे.  धार्मिकतेचे केंद्रबिंदू असलेले काळाराम मंदिर हे चळवळीचे केंद्रही बनले होते.काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही एक क्रांतिकारक घटना होती. जातिव्यवस्थेच्या बुरुजाला सुरूंग लावण्याचे काम या घटनेने केले.
सनातनी ऐकायला तयार नव्हते. तर बाबासाहेबही सत्याग्रह मागे घ्यायला तयार नसल्याने. एकूण परिस्थिती फार स्फोटक होत गेली.
     बाबासाहेब अन् भाऊराव हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सगळी व्यवस्था पाहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार आणि रामाचे दर्शन घेणार असे ठरले होते. ९ एप्रिल १९३० रोजी रामनवमी.असल्याने सत्याग्रहींना चुकवून रथयात्रा काढण्याचे नियोजन होते. चरण पादुकाजवळ थांबलेल्या सत्याग्रहींच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला. यावरून मिरवणूक बाजूला राहिली व मारामारी, दगडफेक झाली. तोवर बाबासाहेब प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले. दगडांचा वर्षाव चालू होता. इतक्यात पोलिसांचा कडा फोडून 'भास्कर कद्रे' नावाचा भीमसैनिक मंदिरात घुसला अन् रक्ताने माखून बेशुद्ध पडला. उपस्थित सर्व सत्याग्रह्यांना व स्वत: बाबासाहेबांनाही लहान-सहान इजा झाल्या होत्या. 
     गरीब हातावर पोट असणाऱ्या  भीमसैनिकानी आपल्या पोटापाण्याची घरादाराची आणि जीवाची पर्वा न करता काळारामाच्या  दर्शनासाठी  अखंडपणे  पाच वर्ष आळीपाळीने सत्याग्रह  सुरू ठेऊन धार्मिक केंद्र असलेले  नासिक  परिवर्तन चळवळीचे केंद्र बनले. हा सत्याग्रह १९३५ साला पर्यंत  पाच वर्ष चालला.देव हा जिवंत असता तर मंदिरा बाहेर उन् वारा पाऊस थंडी याची पर्वा न करणाऱ्या  भक्ताची दया येऊन मंदिराचे  कुलूप तोडून भक्तांना  भेटण्यासाठी बाहेर आला असता.परंतु  दगडाचां देव स्वतःला  मंदिरात कोंडून बसला तो आपला काय उद्धार करणार ?   त्याला  नाकारण्यात आपले हित आहे. याची महामानव डॉ बाबासाहेब यांना जाणीव झाली.आणि पाच वर्ष चाललेला  हा मंदिर लढा  त्यांनी बंद करून काळाराम यालाच नव्हे तर त्याच्या ३३ कोटी देवांना नाकारण्यासाठी १९३५ ला येवल्यास धर्मांतराची घोषणा केली.गांधीनी हिंदू धर्माच्या बाहेर जाऊ नये म्हणून अस्पृश्याना हरिजन म्हंटले त्याच अस्पृश्याना डॉ.बाबासाहेब यानी बौद्धजन बनविले.  आजही मंदिर प्रवेशासाठी काही लोक महीला संघर्ष करताना त्याच्या बुध्दीची कीव येते. देव दगडात शोधण्यापेक्षा माणसात  शोधाल तर धर्म ,जात,पंत सर्व काही गळून पडेल. 
                 आनंद म्हस्के
               प्रबुद्ध राष्ट्रीय संघ


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या