जागतिक महिला दिनानिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने महिला स्नेहसंमेलन
नेरूळ नवी मुंबई
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक ९३ व ९५ , महाविकास आघाडीच्या वतीने व नगरसेवक नामदेव भगत, माजी नगरसेविका सौ. इंदुमती भगत यांच्या विशेष पुढाकाराने नेरुळ येथील मारुती बाळू भगत विद्यालयात स्नेहसंममेलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री दिपाली सय्यद, अभिनेत्री पल्लवी शेट्टी, महिला संघटक रंजना शिंत्रे, नगरसेवक नामदेव भगत, माजी नगरसेविका सौ इंदुमती भगत, नगरसेविका पुनम पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांनी खुमासदार आगरी शैलीतील विनोदातून प्रबोधन करीत उपस्थितांची मने जिंकली. या स्नेहसंममेलन समारंभात दोन हजाराहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.
नामदेव भगत, माजी नगरसेविका सौ. इंदुमती भगत हे दाम्पत्य प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे, रंजल्या - गांजल्यांच्या हाकेला धावून जाणारे दांपत्य असल्याचे सांगून योग्य काम करा, योग्य माणसावर विश्वास ठेवा, बऱ्या वाईटाची पारख करा, कोणाच्याही अमिषाला बळी पडू नका असे आवाहन अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी नेरुळ येथे केले.
पावसाळा सुरु झाला की जागोजागी भूछत्र उगवतात. जागोजागी, गल्लोगल्ली उगवलेले हे भूछत्र मोसमी असल्याने ते फार काळ टिकत नाहीत. म्हणूनच आपल्याला विकास हवा असेल तर बऱ्या वाईटाची पारख करण्याची आणि योग्य त्या माणसाला पाठबळ देण्याची गरज असल्याचे मत नगरसेवक नामदेव भगत यांनी यावेळी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आई वत्सला प्रतिष्ठान आयोजित, शिवसेना पुरस्कृत व नामदेव भगत इंदुमती भगत यांच्या विशेष पुढाकाराने एन आर भगत विद्यालयात महाआरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यात नामवंत डॉक्टरांच्या उपस्थितीत महिलांच्या विविध आरोग्य तपासण्या करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या शुभहस्ते उद्घाटन झालेल्या या शिबिराचा परिसरातील शेकडो महिलांनी लाभ घेत कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी विजय नाहटा यांनी नामदेव भगत, इंदुमती भगत या दाम्पत्यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करीत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. मोहनराव उज्जैनकर यांनी विशेष मेहनत घेतली.
0 टिप्पण्या