Top Post Ad

कोरोनाची दहशत :

कोरोनाची दहशत :


चिंतेपेक्षा चिकित्सा व चिंतन करणे आवश्यक 
मागील तीन महिन्यापासून संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या दहशतीत जगत आहे. दररोज एक नवीन देश कोरोनाग्रास्त देशाच्या यादीत समाविष्ट होत आहे. यामुळे ही दहशत दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालली आहे. अशातच संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावाला जागतिक महामारी घोषीत केल्याने त्याचा परिणाम जगाच्या एकुणच सर्व व्यवहारावर पडला आहे. कोरोना वायरसच्या साथीला जग सद्यातरी आरोग्य विषयक संकट म्हणून पहात आहे. मात्र हे केवळ आरोग्य विषयक संकट राहिलेले नही. कोरोनाच्या साथीचे आर्थिक परिणाम हे खूप व्यापक व खोल आहेत, ते स्थानिक स्तरापासुन ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत समजून घेतले पाहिजेत. 
चीनच्या वुहान शहरातुन सुरु झालेल्या 'कोविद-१९' या विषाणूच्या प्रार्दुभावाने या अडीच महिन्याच्या कालावधीत ११२ देशात फैलाव केला आहे. आतापर्यंत सव्वा लाख लोक या आजाराने बाधीत झाले असून  सुमारे ४५०० लोकांचा मृत्यु झाल्याचे वृत्त आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव आणि मृत्युचा आकडा यामधील तफावत लक्षात घेतल्यानंतर कोरोनापासून मरणाऱ्यांचे प्रमाण फार मोठे असे नाही. असे असताना सुध्दा या आजाराची दहशत ही संपूर्ण जगाला हादरवून सोडणारी आहे. यापूर्वी कोणत्याही आजाराची अशी दहशत व हाहाकार जगाने अनुभवला नाही. यापूर्वी २००० च्या दशकात 'एचआयव्ही' त्यानंतर ७०० लोकांचा जीव घेणारा २००२-०३ मधील 'सार्स' विषाणूचा प्रार्दुभाव, २००९ मध्ये हजारो लोकांचा बळी घेणारा 'स्वाईन फ्लू' आणि २०१४ ते २०१६ या दरम्यान पश्चिम आफ्रिकेत ११ हजार लोकांचा जीव घेणारा 'इबोला' वायरसचा प्रार्दुभाव जगाने पाहिला आणि अनुभवला आहे. पण त्याची दहशत कोरोनासारखी जगातील लोकांच्या मना-मनात दिसून आली नाही. अर्थव्यवस्थेवरही तेव्हा-तेव्हा त्याचा फारसा काही प्रतिकूल परिणाम दिसून आला नाही. एवढेच काय तर डब्ल्यूएचओने 'स्वाईन प्लू' ला जगातील महामारी घोषित केली असताना तेव्हा आजच्या कोरोनासारखी दहशत दिसून आली नाही. कोरोनापासून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या त्याची लागण होण्याच्या तुलनेत अत्यंत नगण्य असताना सुध्दा संपूर्ण जग या विषाणूच्या दहशतीच्या छायेत ज्या प्रकारे भयभित झाले आहे ते पाहता यामागे आरोग्य विषयक धोका यापेक्षा आणखी फार मोठे कारस्थान दडले असावे असे वाटुन जाते. ते कारस्थान काय असू शकेल? याचा वेध घेणे किंवा त्यामागील पार्श्वभूमी चाचपडून पाहणे यामुळेच आवश्यक होऊन जाते. 
सद्याचे युग हे अतितिव्र तंत्रयुग किंवा एक्सपॉनेशीयल टेक्नो युग आहे. या युगात तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा विकास आणि व्यवहारात त्याचे होणारे तत्काळ उपयोजन यास अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. तीव्रतम वेगाने पसरणारे तंत्रज्ञान व त्यातून होणारी प्रचंड आर्थिक उलाढाल यामुळे जागतिक स्तरवार अर्थसत्तेला अनन्य साधारण महत्व आले आहे. जगातील प्रत्येक सज्ञान व्यक्ती आणि जग आपल्या विकासाचे मोजमाप आपल्या जवळ असलेल्या धन-संपत्ती आणि व्यापार-उदीम यावरुन करतो. ही धन संपती वेगवगळ्या उपक्रमात, उत्पादक व्यवहारात गुंतवीणे यासाठी जागतिक स्तरावरील संचार आणि आंतर्देशीय प्रवास हे भांडवल वृद्धी करण्याचे महत्वाचे अंग बनले आहे. कोरोना विषाणुचा नेमका धोका या संचार आणि आंतरदेशीय प्रवास यावर होणार आहे. ज्यानी जगाच्या एकुण व्यापार व्यवहारात प्रचंड भांडवल गुंतवीले आहे, त्यांना नफा कमावून भांडवल वृद्धी करण्यास आतापर्यंत मनुष्यश्रम अत्यंत महत्वाचे होते. अतितीव्र तंत्र युगात आता या मनुष्य बळाची जागा अत्याधुनिक यंत्र-तंत्रांनी आणि सॉफ्टवेअरनी घेतली आहे. तोही पल्ला आता पार करुन कृत्रिम बुध्दीमत्तेचे युग दृष्टीपथात आहे. त्यामुळे मनुष्यबळ जवळपास गौण ठरत आहे. त्याचा परिणाम असा की, जगात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अविकसित आणि तिसऱ्या जगातील  लोक मोठ्या संख्येने भूकबळी ठरत आहेत. चीन मधील दररोज उपाशी राहणाऱ्या लोकांची संख्या जवळपास १८-१९ कोटींच्या घरात आहे. तर भारतात तीच संख्या २० कोटीच्या घरात आहे. हे दोन्ही देश जगात सर्वाधिक लोकसंख्येचे देश म्हणून गणले जातात. यात चीन हा जगात सर्वाधिक कमांक एकचा देश आहे. दुसऱ्या बाजुने मानवाने आपल्या विलासितेसाठी आणि पुंजीपती भांडवलदारांनी आपल्या धन-संपत्तीत वाढ करण्यासाठी भूमीगत संपत्तीपासून ते नैसर्गिक संपत्तीचे यादरम्यान मोठ्या प्रमाणात दहन करुन एकूण या पृथ्वीस्तरावरील वसुंधरेला, वातावरणाला पार उध्दवस्त करुन टाकले आहे. त्याचा परिणाम वायू, जल, जमीन प्रदूषण आणि पर्यावरण यात झपाट्याने बदल होण्यात झाला आहे. नैसर्गिक स्त्रोत व पर्यावरण यांचे असंतुलन याचा परिणाम जगातील मानवी जीवनावर अत्यंत प्रतिकूल झालेला आहे. यात गोर-गरिबांना कोणतेही स्थान राहिले नाही. 
जनकल्याणकारी संकल्पना आपसूकच अप्रत्यक्ष सरकारच्या व्यवहारातून मागे पडत आहे. श्रीमंत आणि भांडवलदारांचा बोलबाला झालेला आहे आणि गरिबांना वाऱ्यावर सोडले गेले आहे. अशी एकूण सद्याची वैश्विक सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रार्दुभाव आणि त्यापासून उद्भवलेली जगभरातील दहशत व हाहाकार हे विद्यमान काळातील सामाजिक कल्याणाची हतबलता जाहीर करते. कोरोना वायरसचा प्रार्दुभाव हा चीनच्या वुहान शहरातून झाला. त्याचा पहिला बाधीत हा ३१ डिसेंबर २०१९ रोजी आढळला. या विषाणूचा प्रार्दुभाव तेथील मांसमच्छी बाजारातून झाल्याचे बोलले गेले. पुढे त्याच्या विसंगत मतेही आलीत. कोणी असे सांगू लागले की, चीनने आपल्या शत्रूना नामोहरण करण्यासाठी 'जैविक शस्त्र' म्हणून कोरोना वायरसला आपल्या प्रयोगशाळेतून जन्माला घातले. तेथे काम करणाऱ्या व्यक्तीचा असावधगिरीमुळे तो बाहेर येऊन त्याचा लोकात प्रार्दुभाव झाला. यात खरे काय आणि खोटे काय? हे नक्की सांगता येणार नाही. पण त्याच्या वैश्विक प्रार्दुभावामुळे जनतेत हाहाकार तर माजलाच शिवाय जगाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा हादरा बसला. 
शेअर मार्केट सतत कोसळत आहे. विमान आणि इतर वाहतुकीवरही त्याचा मोठा विपरीत परिणाम झाला आहे. समुद्री जहाजांनी पाण्यात नागर टाकले. तर दुसऱ्या बाजुने सोन्याचांदीचे भाव कडाडले. बऱ्याच देशांनी आंतरराष्ट्रीय आवागमनास तात्पूर्ती बंदी आणली. पेट्रोलचे भाव धडाक्यात कोसळले. त्यावरुन सौदी अरब व रशिया या दोन राष्ट्रात दरावरुन पेट्रोल युध्द छेडले जात आहे. यात अमेरिकाही प्रभावात येत आहे. बऱ्याच देशांनी कोरोनाच्या दहशतीमुळे शाळा, कॉलेज, रेस्टॉरेंट, बार आणि गर्दीत संचार यावर प्रतिबंध घातले आहेत. कोरोना वायरसची दहशत जगातील विकसित राष्ट्रांच्या बँकांनीही घेतली आहे. युरोपीय सेंट्रल बँकेने कोरोनाचा आपल्या युरो अर्थव्यवस्थेवर परिणाम पडू नये म्हणून उपाय योजले आहेत. बँक ऑफ इंग्लंडनेही आपल्या व्याज दरात मोठी घट केली आहे. अशीच घट आपल्या देशातील भारतीय रिजर्व्ह बँकेने केली आहे. डॉलरच्या तुलनेत पुन्हा रुपयात मोठी घसरण झाली आहे. पूर्वीच आपल्या देशात मोदी सरकारच्या चुकीच्या पतधोरणामुळे मंदीची सावट असताना त्यात कोरोनाचा प्रार्दुभाव आणि त्याला रोखण्यासाठी चालविलेल्या उपाय-योजनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणखी आर्थिक अनिष्ठाची सावट अधिक दाट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम गोरगरिबांच्या रोजगार आणि जगण्यावर होणे क्रमप्राप्त होणार आहे. त्यातून आत्महत्याचे प्रमाण वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण कोरोना विषाणूच्या दहशतीने जगाच्या आर्थिक नस-नाड्या थंडावल्यासारख्या झालेल्या आहेत. 
कोरोनाचे भय दाखवुन तुम्हाला तुमच्या कामावरती जाण्यास रोखले जाणार आहे. काम नाही तर पगार नाही. पगार नाही तर घर, गाडी, शिक्षण कर्ज याचे हफ्ते व EMI कशातून जाणार ? उत्पादन व व्यापार बंद झाल्यामुळे अनेक कंपन्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला येईल. यामुळे पहीली कुऱ्हाड कामगारांवरच कोसळणार हा नियमच असतो. अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने शेअर बाजार कोसळत जाणार, यातुन करोडो लोकांची गुंतवणूक विरघळत जाणार आणि त्यातून उद्भवणारी विपन्नता, उध्वस्तिकरण याची कल्पनाही करता येत नाही इतके हे महाभयानक संकट आहे. त्यातून लोकांची कयशक्ती निश्चितच घटल्याशिवाय राहणार नाही. हा एकूण प्रकार म्हणजे गोर-गरिबांच्या जगण्याची कोंडी म्हणता येईल. ही कोंडी कोरोना वायरस पेक्षा त्याच्या प्रचार आणि प्रसारातून सर्वसामान्य लोकात निर्माण करण्यात आलेल्या दहशतीतून करण्यात आली आहे. ती निर्माण करण्यामागे जगातील भांडवलदारांचे षड्यंत्र हे त्या-त्या देशातील सरकारच्या मदतीने करण्यात आल्याचा अंदाज बांधता येईल. कारण अत्याधुनिक यंत्र-तंत्राच्या या युगात मनुष्यबळ कालबाह्य होत असल्याने जगापुढे त्यांच्या रोजगारीचा आणि जगण्याचा मोठा बाका प्रसंग निर्माण झाला आहे. या गैरउपयोगी लोकांना असे बाजूला सारता येत नाही, म्हणून कदाचित कोरोनाची दहशत निर्माण करुन त्यांची जगण्याची कोंडी अशा प्रकारे केली गेली असावी असा तर्क जगाची एकूण सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी लक्षात घेतल्यानंतर करण्यास वाव मिळतो. त्यामुळे  असा प्रश्न ओघानेच निर्माण होतो की, कोरोनाची आकलनाच्या पलीकडे निर्माण करण्यात आलेली दहशत आणि त्यामुळे लोकात निर्माण झालेला हाहाकार हा कुठेतरी वैश्विक सुनियोजित कट-कारस्थानाचा भाग वाटतो. त्यामुळे ही दहशत कुणाच्या फायद्याची ? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. या दहशतीची चिंतेपेक्षा चिकित्सा व चिंतन करणे आवश्यक आहे.


 


 1981मध्ये "दि आयज ऑफ डार्कनेस" नावाचे पुस्तक प्रकाशित झाले, ज्यांचे लेखक नाव डीन कोंट्ज आहे .


----- पृष्ठ page 353 मध्ये असे लिहिले गेले आहे की "कोरोना व्हायरस" चीनने त्याच्या मूळ गावी वुहानमधील प्रयोगशाळेत तयार केला होता आणि नंतर चीनने त्याचा उपयोग गरीब लोकांची लोकसंख्या कमी करण्यासाठी जैविक शस्त्राच्या रूपात केला जेणेकरून ती एक सुपर पॉवर बनू शकेल. हो, अजीब इत्तफाक म्हणजे कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहान शहरातीलही आहे आणि हळूहळू या विषाणूने संपूर्ण जगाचा ताबा अगदी चीनपर्यंत नेला.


आणि या पुस्तकात कोरोना विषाणूचे नाव "वुहान 400" असे ठेवले गेले आहे. या पुस्तकात असे आधीच सांगितले गेले आहे की चीन नंतर या विषाणूचा उपयोग जैविक शस्त्र म्हणून करेल ..


आणि चीनने ही अंमलबजावणी 2020 मध्ये केली आहे, ज्याचा आज जग दु: ख भोगत आहे.


 


-----------------


 


नाही, डीन कोंट्जने 1981 मधील कादंबरीत कोरोनाव्हायरसचा अंदाज लावला नव्हता
हरमीत कौर, सी.एन.एन.2046 GMT (0446 HKT) 13 मार्च 2020 रोजी अद्यतनित केलेलेखक डीन कोंट्झ यांनी १ in .१ मध्ये "अंधेचे डोळे" ही कादंबरी लिहिली आणि एका खून विषाणूचे वर्णन केले ज्याच्या दावाानुसार सध्याच्या कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाचे प्रतिध्वनी आहे. कोरोनाव्हायरस हा अधिकृतपणे जागतिक साथीचा रोग आहे, म्हणून नैसर्गिकरित्या लोक इतर उद्रेकांबद्दल निर्भयपणे चित्रपट आणि पुस्तके खाऊन चिंता व्यक्त करतात. त्यातील काही सध्या काय घडत आहेत याविषयी विलक्षण समानता दर्शवितात, इंटरनेटवरील काही लोकांना असा दावा करण्यास प्रवृत्त करतात की विशिष्ट कथाकारांनी कोरोनाव्हायरसच्या प्रसाराचा "अंदाज" लावला होता.
डीन कोन्ट्झ यांच्या "द डोळ्यांचे अंधकार" नावाच्या थरारक कादंबर्‍याचे एक विशेष उदाहरण. त्यानंतर व्यापकपणे सामायिक केलेल्या एका ट्विटमध्ये, कोणीतरी म्हटले आहे की कोंट्सने पुस्तकाच्या पृष्ठाच्या स्क्रीनशॉटच्या आधारे कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाची भविष्यवाणी केली होती. पण असे म्हणायचे की कोंटझने हे सर्व पाहिले आहे हे थोड्या वेळाने आहे. कादंबरी ही काल्पनिक गोष्ट आहे. 
कादंबरीच्या स्क्रीनशॉट पेजमध्ये, डोम्बे नावाच्या एका पात्राने एका चिनी वैज्ञानिकांविषयी एक कथा सांगितली आहे ज्याने अमेरिकेत "वुहान -400" नावाचे जैविक शस्त्र आणले:
डोम्बे म्हणाले, "हे समजून घेण्यासाठी तुम्हाला वीस महिने मागे जावे लागेल. त्याच वेळी ली चेन नावाच्या चिनी वैज्ञानिकांनी अमेरिकेत प्रवेश केला आणि चीनमधील सर्वात महत्वाच्या आणि धोकादायक नवीन जैविक शस्त्राचे डिस्केट रेकॉर्ड ठेवले. दशक. ते सामग्रीला 'वुहान -400' म्हणतात कारण ते वुहान शहराबाहेरील त्यांच्या आरडीएनए लॅबमध्ये विकसित केले गेले होते आणि त्या संशोधन केंद्रात तयार केलेल्या मानवनिर्मित सूक्ष्मजीवांचा हा चारशेवा व्यवहार्य ताण होता. "
प्रथम, हे लक्षात घेण्यासारखे आहे की "अंधेरीचे डोळे" च्या 1981 च्या मूळ आवृत्तीत, या जैविक शस्त्राला रशियन परिसरातील संदर्भात "गोरकी -400" म्हटले गेले. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या म्हणण्यानुसार १ 198 in in मध्ये जेव्हा पुस्तक पुन्हा प्रकाशित झाले तेव्हा शस्त्राचे नाव बदलून "वुहान -400" केले गेले.
हे खरं आहे की सध्याच्या कोरोनाव्हायरसचा उद्रेक चीनच्या वुहानमध्ये झाला. परंतु हा विषाणू लॅबमध्ये तयार झाला ही कल्पना एक असत्य सिद्धांत आहे जो असत्यापित सोशल मीडिया खात्यांमधून उद्भवली आणि तेव्हापासून चीन आणि पश्चिम या दोन्ही देशांतील शास्त्रज्ञांनी याला व्यापकपणे नाकारले.
तज्ञ अद्याप विषाणूचे अचूक स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु संशोधनात असे दिसून आले आहे की याची उत्पत्ती बॅटमध्ये झाली आहे आणि लोकांकडे उडी मारण्यापूर्वी मध्यंतरी होस्टमध्ये प्रसारित केले गेले होते - जसे त्याच्या चुलतभावाप्रमाणेच 2003 च्या सार्स साथीच्या आजाराला कारणीभूत ठरले.
पुस्तकात, विषाणूचा मृत्यू दर 100% आहे
नंतरच्या परिच्छेदात, डॉम्बे हे पात्र पुढे असे म्हणते की व्हायरसने संक्रमित कोणीही टिकू शकत नाही:
"आणि बहुतेक जैविक एजंट्सपेक्षा वुहान -400 चे इतरही तितकेच महत्वाचे फायदे आहेत. एका गोष्टीसाठी, आपण विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर केवळ चार तासांनंतर एक संसर्गजन्य कॅरियर बनू शकता. हा एक आश्चर्यकारकपणे गर्भलिंग कालावधी आहे. एकदा संसर्ग झाल्यानंतर कोणीही जगत नाही चोवीस तासांहून अधिक. बारामध्ये बहुतेकांचा मृत्यू होतो. वुहान -400 चा मारण्याचे प्रमाण शंभर टक्के आहे. "
कोरोनाव्हायरसच्या बाबतीत असे नाही.
पहिल्यांदाच, कोरोनाव्हायरसने संसर्गग्रस्त लोकांच्या संपर्कात येण्याच्या पाच दिवसानंतर आणि जवळजवळ नेहमीच दोन आठवड्यांच्या आत लक्षणे निर्माण होतात, 
एका अलीकडील अभ्यासानुसार.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com