Top Post Ad

कोरोना एक षडयंत्र : कर्जबुडव्यांची चर्चा गायब

कोरोना एक षडयंत्र



देशात 3 मिनिटाला 2 मृत्यू टीबीने, एक मिनिटाला दिवसात 10 शेतकरी आत्महत्या करतात मात्र देशात सर्वाधिक चर्चा कोरोनाची आहे. वूहान नावाच्या शहरात हा व्हायरस जन्माला आला आणि हजारो चीनी त्याने यमसदनी धाडले, प्रत्येक देशाने आपल्या देशात येणारा प्रत्येक नागरिक तपासून सोडण्याची मोहीम हाती घेतली, भारत उष्णकटीबंदात येत असल्याने संबंधित व्हायरसचा निभाव लागेल अशी शक्यता नसल्याचे वैद्यकीय तज्ञाने सांगितले. देशात एकही रुग्ण दगावला नाही मात्र केवळ कोराना या व्हायरसच्या चर्चेने देशाचे 5 लाख कोटीचे नुकसान झाले. मेंढराची वृत्ती हा भारतीय मानसिकतेचा अविभाज्य घटक आहे, बुद्धीप्रामाण्यवादी न राहता झुंड जिकडे तिकडे उडी मारणारे अफवेला शाश्वत आणि असत्याला सत्य करवून जातात, नुकसान झालेले कळायला वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच काळजी घेताना तिची अफवा होणार नाही याची काळजी आम्ही कधी घेणार आहोत, चार लोग एक जगह पर न आयीये म्हणणारे पंतप्रधान मोदी आणि प्रथमच देशात मोबाईल कंपन्यानी खोकला डायलर टोन लावली. म्हणूनच कोरोना हि आमच्या देशाची करुणावस्था ठरली आहे.
    कोरोना नावाचा एक व्हायरस आला आणि जगाने धास्ती घेतली, ज्या चीनमध्ये हा व्हायरस जन्माला आला त्या चीनचा निवडक भाग सोडला तर सर्व व्यवहार सुरळीत आहेत मात्र भारताला मात्र मोठा फटका बसला जिथे एकही रुग्ण दगावला नाही. देशाचे पंतप्रधान चार लोकांनी एकत्र येण्याचे टाळावे असे सांगतात, मोबाईल कंपन्या तसे संदेश पुरवत आहेत, एक डॉक्टर म्हटले अहो व्हायरस कमी आणि अफवाच वेगाने पसरत आहेत. परवा बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथे रुग्ण सापडला आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले नंतर कळले ती अफवा होती. या अफवेच्या मागे कोण आणि कुणाचे डोके हेतू असतो, अर्धा दिवस जिल्हा प्रसाशन एका अफवेने कामाला लावले, हे आमच्या व्यवस्थेचे दुर्दैव नाही काय ? पोल्ट्री हा व्यवसाय करणारे किती तरी शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले,  खोट्या अफवेने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले याला कारण आपण या अफवेवर विश्वास ठेवला म्हणून.  सामान्य शेतकरी शेतीला पूरक असा कुक्कुटपालन व्यवसाय करतो त्याच बरोबर शेळ्या, मेंढ्या यांचे पालन करतो. काही प्रमाणात पशूपालन करून दुग्ध व्यवसाय पण करतो, त्यामधून येणारा पैसा खूप नसतो पण तो उदरनिर्वाह करण्यासाठी महत्वाचा असतो. आधीच शेतकरी जास्त किंवा कमी पावसामुळे अडचणी येतो, कधी पिके वाहून जातात तर कधी पाणी नाही म्हणून पिके सुकून जातात. या संकटांना तोंड द्यावे म्हणून शेतीपूरक व्यवसाय करतो पण त्यालाही या अफवेचा मोठा फटका बसतो आणि यासाठी आपणच जबाबदार आहोत कारण आपण अफवेवर विश्वास ठेवतो.मुंबईत चार आणि पुण्यात दोन संशयित रुग्ण आहेत. पुण्यातील अहवाल आज येईल. त्यानंतर काही ते समजेल. त्यामुळे कोणीही घाबरुन जाऊ नये. राज्यात सहा जण निरीक्षणाखाली असून 146 जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 551 विमानांमधील 65 हजार 621 प्रवासी तपासण्यात आले आहेत. आग्र्यातील एका कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेल्या कुटुंबाचा अहवाल निगेटिव्ह आलाय. सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. आग्रामधील कपूर कुटुंबाय 25 फेब्रुवारीला इटलीहून परतले होतं. तेव्हापासून त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. तसेच पुण्यातील लॅबमध्ये त्यांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. ते रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. मग पूर्ण देश आम्ही कामाला केवळ अफवेवर लावला. कोरोना संदर्भात अफवा पसरवणारावर सायबर अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे . ग्रामीण भागाच्या आर्थिक घडी केवळ या अफवेने विस्कटली आहे.  एका दिवसात मास्क चे वाढलेले भाव आणि लोकांची उडालेली धांदल हे आमच्या मानसिकतेचे दिवाळेपण सिद्ध करणारे आहे. विशिष्ट मिडिया कोरोना ला पुढे करून आपला अजेंडा तडीस नेत आहे का याचा देखील विचार झाला पाहिजे. अमेरिकन कंपन्यांनी अफवा पसरवली यामुळे शेतकर्‍यांचे तब्बल 600 कोटींचे नुकसान झाले आहे. आपले सरकार या बद्दल गांभीर्य ठेवत नसून देशात अश्या अफवांना रोखण्याचे कुठलेही पाउल उचलत नाही हे दुर्दैवी आहे.


अफवेत कर्जबुडव्यांची चर्चा गायब
१  रिलायंस ग्रुप - अनिल अंबानी - १.२५ लाख कोटी
२ वेदांत ग्रुप - अनिल अग्रवाल - १.०३ लाख कोटी
३ आयशर ग्रुप - रीवी ब्रदर - १.०१ लाख कोटी
४ अदानी ग्रुप - गौतम अदानी - ९६,०३१ कोटी
५ जेपी ग्रुप - मनोज गौर - ७५,१६३ कोटी
६ जे एस डब्ल्यू - सज्जन जिंदाल - ५८, १७१ कोटी
७ जी एम आर ग्रुप - जी एम राव -४७,९७६ कोटी
८ लिनी ग्रुप - एल मधुसूदन राव ४७,१०२ कोटी
९ व्हिडीओकोन ग्रुप - वेणुगोपाल धूत - ४५४०५ कोटी
१० भूषण पावर स्टील - बृज भूषण सिंगाल ३७,२४८ कोटी
११ जी व्ही के ग्रुप - रेड्डी - ३३,९३३ कोटी
१२ अलोक इंड - सुरिंदर कुमार भून - २२,०७५ कोटी
१३ अमितेक ऑटो- अरविंद दरम -१४०७४ कोटी
१४ मुनीत एनर्जी - संदीप जीजोदिया - १२११५
१५ इलेक्त्रीस्तील - उमंग केजरीवाल १० २७३ कोटी
१६ एरा इन्फा इंज्नियारिंग - एच एस भरण १०,०६५
१७ ए बी जी सीपी - रिशी अग्रवाल - ६ , ९५३ कोटी
१८ ज्योती स्ट्रीकटेरेस - संदेश डी . क्षीरसागर  - ५ ,१६५ कोटी
🙏🙏🙏🙏🙏


सदर लेख
"अफवेच्या बाजारात देशाची करुणावस्था..." 


क्रॉसलाईन
दैनिक लोकाशा 9613331111



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com