लावणी कलावंतांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी
पुणे
कोरोना साथीचा तडाखा राज्यातील लावणी कलावंतांनाही बसला आहे. कोरोनाच्या साथीमुळे या सर्व लावणी कलावंतांचे मुंबई, पुणे, नगर, सोलापूर, कोल्हापूर, साताऱ्यात होणारे नियोजीत शोज रद्द झाले. त्यामुळे या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या सुमारे तीन हजार कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. तमाशाला वर्षाला अनुदान मिळतं पण लावणी शो करणाऱ्यांना याचा फायदा मिळत नाही. म्हणूनच शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी माया कुटेगावकर, चैञाली राजे, अर्चना जोगळेकर या आघाडीच्या लावणी कलावंतांनी मुख्यमंञ्यांकडे केली आहे. मार्च ते मे या 3 महिन्यात लावणी कलावंतांची वर्षभराची कमाई होत असते. पण करोनामुळे सगळ्या यात्रा-जत्रा कॅन्सल झाल्यामुळे खूप नुकसान झालं आहे. तरी सरकारनं याचा विचार करावा आणि मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे.
0 टिप्पण्या