वाडा तालुक्यातील रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी
पालघर
वाडा तालुक्यातील गावपाड्यांवरील रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे संदर्भात मा. जिल्हाधिकारी पालघर, मुख्यकार्यकारी अधिकारी जि प पालघर,सां बा जव्हार जि पालघर यांच्याकडे आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेने मागणी केली आहे. वाडा तालुक्यातील गावपाड्यांवरील रस्त्यांची अवस्था अतिषय बिकट झाली आहे, अगोदरच अरुंद व त्यातच खड्डेमय रस्ते नागरीकांचे जीवघेणे झाले आहेत. शाळकरी विद्यार्थी, अबालवृद्ध , पादचारी, वाहनचालक यासह सर्वाना या खड्डेमय रस्त्यांचा त्रास जाणवत आहे.
१) नेहालपाडा ते कुसवडे रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. २) अघई मेन रोड ते काकडपाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. ३) नेहरोली ते चिखले रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. ४) अघई मेन रोड ते चेंदवली गावापर्यतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. ५) कुयलु ते भुरकुडपाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. ६ तिळगाव झाडखैरे वारनोल रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. ७) कोनसई मेन रोड ते टोकेपाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. या रस्त्यांची अतिशय खराब अवस्था लक्षात घेऊन व तातडीने पाहणी करुन लवकरात लवकर रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा साहेब यांनी मा. जिल्हाधिकारी मुख्यकार्यकारी जि प पालघर,सां बा विभाग जव्हार जि पालघर, यांच्याकडे केली आहे. अशी माहिती आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना पालघरचे जिल्हा संघटक नितिन दळवी यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या