Top Post Ad

 बौद्धांनी आपला धर्म नवबौद्ध सांगून जनगणनेत बेदखल होऊ नये- गणराज्य अधिष्ठान

 बौद्धांनी आपला धर्म नवबौद्ध सांगून जनगणनेत बेदखल होऊ नये- गणराज्य अधिष्ठान



मुंबई
केंद्र सरकारकडील धर्माच्या यादीत हिंदू, इस्लाम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन हे सहाच धर्म आहेत. त्यापेक्षा वेगळा धर्म सांगणाऱ्या नागरिकांची नोंद ‘इतर’ या वर्गात केली जाते. त्यामुळे बौद्धांनी आपला धर्म नवबौद्ध असा सांगून जनगणनेत बेदखल होऊ नये, असे आवाहन गणराज्य अधिष्ठानचे डॉ जी.के.डोंगरगावकर -अध्यक्ष आणि दिवाकर शेजवळ -सरचिटणीस यांनी  पत्रकाद्वारे केले आहे. देशात होऊ घातलेल्या जनगणनेत धर्म आणि अनुसूचित जातींची अचूक लोकसंख्या नोंदली जाण्याच्या मुद्यावरून बौद्ध समाजात निरनिराळ्या मतप्रवाहांमुळे संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण वाढीस लागले आहे. ते लक्षात घेता भारतीय बौद्ध महासभेने बौद्ध समाजाला योग्य ते मार्गदर्शन तातडीने करावे, असे आवाहनही पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.



“व्ही पी सिंग सरकारने केंद्रात दिलेल्या सवलतींचा लाभ घ्यायचा की त्या सवलतींचा त्याग करायचा?”


“अनुसूचित जाती अत्त्याचार प्रतिबंधक कायद्याचे लाभलेले सुरक्षा कवच कायम राखायचे की गमवायचे?”


“संविधानिक अधिकार म्हणून अनुसूचित जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणारे हक्काचे राजकीय प्रतिनिधित्व आणि विशेष घटक योजनेखाली अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणाऱ्या निधीचा विकासासाठी लाभ घ्यायचा की त्यावर पाणी सोडायचे?”


 असे प्रश्न बौद्ध समाजापुढे जनगणनेनिमित्त उभे ठाकले असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.



बौद्ध समाजाला येत्या जनगणनेत ‘बौद्ध’ म्हणूनच आपली धार्मिक ओळख अमिट राखतांनाच वरील प्रश्नांवर साधक बाधक विचार करून दुरदर्शीपणे व्यापक समाज हितासाठी योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. त्या दृष्टीने बौद्ध महासभेसारख्या धार्मिक संघटनांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे, असे डॉ डोंगरगावकर आणि शेजवळ यांनी म्हटले आहे. आजघडीला आंबेडकरवादी पक्षाचा राज्यात एकसुद्धा आमदार,खासदार नाही.बौद्ध समाजाच्या हिताचा एखादा कायदा करण्यासाठी वा सध्याच्या कायद्यात बदल करणाऱ्या घटना दुरुस्तीसाठी संसद आणि विधिमंडळात आपले संख्याबळ शून्य आहे. त्यामुळे तात्काळ मंजूर न होणाऱ्या मागण्यांसाठी दशको न दशके चालणारे लढे समाजावर लादून जनगणनेतील उद्दिष्टापासून फारकत घेणे परवडणारे नाही, असा इशाराही गणराज्य अधिष्ठानने दिला आहे.


 


काही निवडक प्रतिक्रिया फेसबूकवरून.............


* Raju Rote बौध्द भारतात सर्वत्र आहेत.महाराष्ट्रातील बौद्धाचे वेगळेपण आहे.ते धर्मातरीत बौद्ध आहेत. बौध्दांना जातीय निकषावर आधारीत सवलती नाहीत ते धार्मिक अल्पसंख्याक गटात मोडतात.या स्थितीत पुर्वीचा महार पण आताचा धर्मातरीत बौध्द म्हणजे नवबौध्द अशी ओळख निर्माण झालेल्या व्यक्तीला जातीय निकषावर सवलती प्राप्त होतात. आता बौद्ध म्हणावयास भाग पाडणे म्हणजे त्याचे धार्मिक अल्पगटात स्थान निश्चित कारण्यासारखे नाही का? आणि असे केल्यास shedhuld list मधून ते बाहेर पडल्या सारखे होणार नाही का? कृपया या शंकेचे निरसन करावे.


Diwakar Shejwalkar to Raju Rote महाराष्ट्रात बौद्ध हे धार्मिक अल्पसंख्याक म्हणून सवलतीचे लाभार्थी मुळीच नाहीत। व्ही पी सिंग यांनी त्यांना अनुसूचित जातीच्या सवलती दिल्यानंतरही राज्यात ते नवबौद्ध म्हणून ओबीसींच्या यादीत 161 अनुक्रमांकावर आहेत। अन केंद्रातील सवलतींपासून आजही बौद्ध वंचीत आहेत, याची आपण नोंद घ्यावी।


Raju Rote याबाबत एकच ठाम पर्याय समाजापुढे ठेवायला हवा.सर्वच लोक आभ्यास करीत नाहीत त्यामुळे अभ्यासू लोकांची ही जबाबदारी आहे.पहीला टप्पा निष्कर्ष काढणे व दुसरा टप्पा त्याबाबत जागृती करणे ही होय.


Chandrakant Jadhav नवबौद्ध, धर्मांतरित बौद्ध, बुद्धिष्ट बुद्धिझम इ. शब्द राजकारणी लोकांनी प्रचारात आणलेले दिसतात. महाराष्ट्र-केंद्र शासन व संविधानातही हे शब्द नाहीत...
अनुसूचित जातींची यादी इंग्रजांनी प्रथम 1936 आली तयार केली होती ती यादी कोणत्याही धर्माशी संबंधित नव्हती.
#घटनादुरुस्त्या  संविधानाच्या अंमलबजावणी नंतर प्रथम इंग्रजांनी बनवलेली अनुसूचित जातीची यादी 1950 साली घटना दुरुस्ती करून हिंदू धर्माला जोडली कारण हिंदू धर्मातील अनुसूचित जातींचा या यादीत समावेश होता व हे पाहून शीख धर्मीयांनीही सांगितलं या यादीत आमच्याही धर्मातील जाती आहेत त्यामुळे त्यांनी 1956 मध्ये घटना दुरुस्ती करून घेवून आपल्या धर्माचा संविधानात समावेश करून घेतला व 1990 मध्ये पंतप्रधान श्री. व्ही पी सिंग यांच्या राजवटीत बौद्ध धर्मात ही अनुसूचित जाती आहेत हे जाणून बौद्ध धर्माचाही संविधानात समावेश करून त्या धर्मातील अनुसूचित जातींना सवलती घटना मान्य करुन घेतल्या ..
घटना/ संविधान दुरुस्तीचा क्रम क्रोनाॅलाॅजी समजून घ्यावी या घटनादुरुस्त्या आपणास ऑनलाईन ही पाहता येतील त्याचबरोबर घटनेच्या पुस्तकात ही पाहून समजून घेता येतील..
वरील परिस्थितीत बौद्ध धर्मीय सुशिक्षित बांधवांनी आगामी जनगणनेत आपला धर्म बौद्ध व जात जी राज्य शासनाच्या अनुसूचित जातीच्या यादीत आहे उदा. महार मांग चांभार भंगी इत्यादी नमूद करणे व्यवहार्य व शहाणपणाचे ठरेल व तसेच अशिक्षितांना व अज्ञानी समाजबांधवांना मार्गदर्शन करणे उचित होईल


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com