मुंबईत बनावट सॅनिटाइझर्स जप्त: संस्कार आयुर्वेद नावाच्या कंपनीवर छापा
मुंबई -
कोरोनाच्या भीतीचा फायदा उचलण्यासाठी बनावट उद्योगधंद्यांनी कंबर कसली आहे. अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या नावाने सॅनिटाइझरची निर्मिती सुरु केली आहे. फक्त पाणी आणि केमिकल मिसळून बनावट सॅनिटायझर बनविण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. मुंबईच्या अन्न व औषध विभागाने (एफडीए) वाकोला येथील संस्कार आयुर्वेद या फॅक्टरीत छापेमारी करत मोठ्या प्रमाणात बनावट सॅनिटाइझर जप्त केले आहे. संस्कार आयुर्वेद नावाची सॅनिटाइझर तयार करणारी फॅक्टरी 8 दिवसांपासून सुरू केल्याचे तपासात उघडकीस आले. याप्रकरणी चार लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे.
एफडीएचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले की, "सदरील कंपनी विनापरवागनी सॅनिटाइझर तयार करत होती. या कंपनीची स्थापना 8 दिवसांपूर्वी बनावट मार्गाने केली गेली होती. कंपनीच्या फॅक्टरीत मिळालेल्या सॅनिटाइझर बॉटल्सवर लायसेन्स नंबर किंवा बॅच नंबर नव्हते." दरम्यान, ही कंपनी 'मेड इन वकोला' या नावाने बनावट सॅनिटायझर्सची विक्री करीत असल्याचे एफडीएच्या तपासणीत असे दिसून आले आहे. हे बनावट सॅनिटाइझर बाजारात 105 ते 190 रुपयांपर्यंत विकले जात होते. यामध्ये पाणी आणि निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरण्यात येत होता. चिंतेची बाब म्हणजे, कोणत्याही तपासणीशिवाय वैद्यकीय स्टोअर्समध्ये बिनधास्तपणे ग्राहकांना हे बनावट सेनेटिझर्स विकले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, अन्न व औषध प्रशासनाकडून आलेल्या सूचनांनुसार गृहविभागातील वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक आज 14 march पार पडली. कोरोना व्हायरसनंतर मास्कचा काळाबाजार व डूप्लीकेट सॅनिटायझर बनवण्याचं कोण काम करत असेल तर अशांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. यामध्ये मास्कचा काळाबाजार असेल किंवा सॅनिटायझर डूप्लीकेट प्रकार असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेच शिवाय ज्या फेक न्यूज आहेत. मोबाईलच्या व्हॉटसअप मेसेजवरून गैरसमज पसरवत आहेत त्यांच्यावर सायबर गुन्ह्याखाली कारवाई करण्यात येणार आहे असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. तुरुंगातील कैद्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर संशयित कुणी सापडलं तर त्यांच्यासाठी अतिदक्षता विभाग स्थापन करून त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना गृहविभागाच्यावतीने पोलिसांना देण्यात आल्या आहेत अशी माहितीही अनिल देशमुख यांनी दिली
"कोरोना इतना मत डरोना"
"कोरोना आजार जागतिक औषध कंपन्याचे षढयंञ"
अगोदरच लोक घाबलेत आणि औषध कंपन्या आपले प्रोडक्ट संपावायसाठी शक्कले लढवू लागलीत.. लोक घाबरलेत कोरोनाच्या आजाराला तर एकीकडे आपल्या औषधाचा खप कसा होईल यासाठी हा औषध कंपन्याचा प्रयत्न चाललाय... हे जागतिक औषध कंपन्याचे एक षढयंञ आहे. लवकरच त्यांचा भांडाफोड होईल. वरील औषध विक्रेते असतील त्यांनी वाईट मानून घेऊ नये. कारण या अगोदर कधी त्या रोगाचा कधीही उल्लेखही आढळला नाही. आणि रोग आल्याबरोबर लगेचच औषधे बाजारात उपलब्ध होतात. त्यामुळे सरसकट सर्व औषध निर्मिती करणारे यात सामिल असतील. त्यांचा संपूर्ण अभ्यासाअंती निष्कर्ष बाहेर येईलच. सरकारी सुचना नियमांचे पालन करा, कोरोना सदृष्य लक्षणे आढल्यास सार्वजनिक रुग्नालयात आपली तपासणी करा. आपण आपली व आपल्या घरातल्याची काळजी घ्या. सरकारी रुग्नालयात मोफत आणि योग्य पद्धतीने उपचार केले जात आहेत.!
माहिती जनहितार्थ प्रसारीत
श्री. मिलिंद शां. महाडीक
- पञकार, छायाचिञकार, माहिती अधिकार कार्यकर्ता व शासकीय माहिती अधिकार प्रशिक्षक (अधिकृत-यशदा)
0 टिप्पण्या