Top Post Ad

कोरोनाच्या संकटामुळे नाका कामगारांचे हाल

कोरोनाच्या संकटामुळे नाका कामगारांचे हाल




ठाणे
 कोरोना' नावाचे संकट पुढ्यात येऊन उभे राहिल्याने नाका कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामेच मिळत नसल्याने त्यांच्यावर त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घराची दुरुस्ती, इमारतींचे बांधकाम यासारख्या कामांसाठी नाका कामगारांची आवश्यकता असते. मात्र सध्या कोरोनामुळे जागतिक आणिबाणी निर्माण झाल्याने त्याचा फटका या कामगारांनाही बसला आहे. मात्र रोजंदारीवर काम करणाऱ्या या कामगारांना सध्या दिवसाला काही मिळात नसल्याने रात्री उपाशी झोपण्याची वेळ येत आहे. 
ठाण्यात कळवा नाका, काबुरबावडी नाका, जांभळी नाका अशा ठिकाणी तर  कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, खडकपाडा, म्हसोबा चौक, नाना पावशे चौक, तिसगावनाका, शहाड तसेच डोंबिवली रेल्वेस्थानक, पाटकर रोड, टाटा पॉवर, कोळेगाव अशा नाक्यांवर  हजारांच्यावर नाका कामगार रोज सकाळी कामासाठी उभे असतात. आधीच जीएसटी तसेच ग्रामीण भागातील कामे बंद झाल्याने या कामगारांवर उपासमारीचे संकट आले असतानाच कोरोनामुळे तर त्यांना कामच मिळायचे बंद झाले आहे. 
इमारतींच्या कामांसह घरातील कामे ७० टक्के बंद झाली आहेत. तसेच, जी कामे सुरू होणार आहेत, ती कोरोनामुळे सुरूच झाली नाहीत. त्यामुळे, नाका कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. महिन्यातून सुमारे १५ हजार रुपये मिळायचे; मात्र आता सात हजार रुपयांवरच त्यांना घरखर्च भागवावा लागत असल्याचे महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांनी सांगितले. नाका कामगारांवर उपासमार होत असून काही दिवसांपासून त्यांना काम मिळत नसल्याचे सत्यशोधक कामगार संघटनेचे सचिव संजय जाधव यांनी सांगितले. कोरोनामुळे  नाका कामगारांची संख्या कमी झाली नाही. हातावर पोट असल्याने त्यांना काम सध्या मिळत नसल्याने उपासमारी होत असल्याचे असंघटित कामगार कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत माळी यांनी सांगितले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com