Top Post Ad

कोरोना सहाय्यता निधीसाठी टाटा ट्रस्टने दिली आजवरची सर्वात मोठी मदत

कोरोना सहाय्यता निधीसाठी टाटा ट्रस्टने दिली आजवरची सर्वात मोठी मदत



मुंबई


करोनाशी लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये टाटा ट्रस्टने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. ट्रस्टने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ५०० कोटी रुपये देऊ केले आहेत. तसेच टाटासन्स कडून १००० कोटी रुपयांची भर टाकण्यात आली आहे. यामुळे आता टाटा ग्रुपकडून तब्बल १५०० कोटी रुपये मदत देण्यात आली आहे. यापूर्वी बजाज ग्रुपने १०० कोटी रुपयांची मदत करोनाशी लढण्यासाठी सरकारला देऊ केली होती.


रतन टाटा यांनी ट्विटद्वारे म्हटले की, करोनाचं संकट हे मानवजातीसमोरील अत्यंत कठीण आव्हान आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या कंपन्यांनी यापूर्वी देशाच्या गरजा भागवल्या आहेत. सध्याचं संकट हे मानवी शर्यतीतील भेडसावणार्‍या कठीण आव्हानांपैकी एक आहे
दरम्यान, टाटा ट्रस्टने सर्व बाधित रुग्णांचे संरक्षण आणि सबलीकरण करण्याची ग्वाही दिली आहे. त्यासाठी त्यांनी ५०० कोटी रुपये देण्याचे वचनही दिले आहे. टाटा ट्रस्टने म्हटलंय की, करोना विषाणूंशी लढण्यासाठी जी यंत्रणा उभी करावी लागणार आहे, त्यासाठी याचा वापर करण्यात यावा.
करोनाशी लढताना अग्रभागी असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) निर्माण करणे
वाढत्या घटनांवर उपचार करण्यासाठी श्वसनप्रणाली निर्माण करणे
दरडोई चाचणी वाढविण्यासाठी चाचणी किटची निर्मिती करणे
संक्रमित रूग्णांसाठी मॉड्यूलर उपचार सुविधा उभारणे
आरोग्य कर्मचारी आणि सामान्य लोकांचे ज्ञान व्यवस्थापन आणि प्रशिक्षण देणे
टाटा ट्रस्ट, टाटा सन्स आणि टाटा ग्रुप ऑफ कंपनीज स्थानिक, जागतिक संस्थांसह सरकारसोबत करोनाशी लढण्यासाठी जोडले गलेले आहेत, असे सांगताना टाटा ट्रस्टने स्वतःचा जीव धोक्यात घालून या संकटाशी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आम्ही सन्मान करतो, अशा शब्दांत कृतज्ञताही व्यक्त केली आहे.



करोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापनाची कक्षा वाढवण्यासाठी तसंच नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी संशोधनासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर अभिनेता अक्षय कुमारने २५ कोटींची मदत जाहीर केली आहे. अक्षय कुमारने ट्विट करत सांगितलं आहे की, “आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी जे काही गरजेचं आहे ते सगळं केलं पाहिजे. मी माझ्याकडील २५ कोटी रुपये पंतप्रधान केअर फंडसाठी देत आहे. चला आयुष्य वाचवू…”.


 


.







 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com