Top Post Ad

आता देशभरातील टोलनाकेही बंद, टोलवसुलीला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती 

आता देशभरातील टोलनाकेही बंद, टोलवसुलीला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती नवी दिल्ली :


 देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 606 वर गेली असून, त्यात 43 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं मोदी सरकारनंही आतापासूनच सतर्कतेची पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी भारतातही लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सर्व बंद करण्यात आलं आहे. याच अनुषंगाने आता देशभरातील टोलनाकेही बंद करण्यात आले आहेत.  टोलवसुलीला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात टोलनाक्यांवर कोणत्याही स्वरूपाचा टोल आकारला जाणार नाही. मोदींनी जाहीर केलेल्या १४ एप्रिलपर्यंत भारतात कुठल्याही टोलनाक्यावर टोलवसुली करता येणार नाही, असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे.


अत्यावश्य सेवा पुरवणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. संचारबंदी लागू असल्यानं कारणाशिवाय वाहनाने कोणालाही प्रवास करता येत नाही. अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने, वैद्यकीय कारणास्तव होणाऱ्या वाहतुकीलाच परवानगी आहे. तसेच खासगी वाहनात चालक अधिक दोन, तर रिक्षामध्ये चालक अधिक एक इतक्याच प्रवाशांना राज्य सरकारने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने कोणत्याही अडथळ्याविना गंतव्यस्थानी पोहोचावीत म्हणून भारतात टोलवसुली तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र 'रस्त्यांची देखभाल आणि टोलनाक्यांवर आपत्कालीन स्रोतांची उपलब्धता नेहमीप्रमाणे सुरू असल्याचंही आश्वासन नितीन गडकरींनी दिलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com