जागतिक महिला दिना निमित्ताने खारपाडा येथे शिवणकला प्रशिक्षण वर्ग
पेण
ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा व शासकीय तंत्र निकेतन पेण रामवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकार पुरस्कृत सामूहिक योजने अंर्तगत विनामूल्य कौशल्य विकासाचे शिवणकला क्लास प्रशिक्षण वर्ग खारपाडा येथे सुरू करण्यात आले असून या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा सरपंच सौ रश्मी दयानंद भगत ह्यांचे हस्ते संपन्न झाले
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपसरपंच सौ. सुप्रिया पाटेकर, ग्रामसेविका सौ. स्मिता पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ. मिनाक्षी घरत, ग्रंथपाल सौ. विजेता म्हात्रे, बचत गटाच्या अध्यक्षा सौ. सुनीता घरत, मेघा पाटील, वैशाली भगत, सविता ठाकरे, सीता पवार, शिवणक्लास प्रशिक्षक सौ. मंदा घरत, काशिनाथ ठाकूर, रामा म्हात्रे आदी मान्यवरांसह महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
सरपंच सौ. रश्मी भगत यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. सर्व महिलांनी या शिवणकला प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेट देण्यात येणार असून जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण मार्फत शिलाई मशीन देण्यात येणार आहेत.
तत्पूर्वी स्व. मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था खारपाडा आणि शासकीय तंत्रनिकेतन पेण रामवाडी संचालित प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सात महिलांना शिलाई मशीनचेही वाटप करण्यात आले.
विद्यमान राज्यमंत्री व रायगड जिल्हा पालकमंत्री अदितीताई तटकरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रशिक्षित महिलांना शिलाई मशिन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. याबाबतीत त्यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानण्यात आले. परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने प्रक्षिण घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
0 टिप्पण्या