Top Post Ad

स्वदेशी कोरोना टेस्ट किट तयार

स्वदेशी कोरोना टेस्ट किट तयार



पुणे 
कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी या आजाराच्या चाचण्या वेगवान गतीने होणे आवश्यक आहे. या करिता पुणे स्थित मॉलिक्युलर डायग्नोसिस कंपनी मायलॅबने COVID-19 च्या चाचणीसाठी या टेस्ट किटची निर्मिती केली आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) या किटला मान्यता दिली आहे. या एका किटची किंमत ८० हजार रुपये असून, एकाचवेळी १०० रुग्णांची चाचणी करता येणे शक्य आहे. अत्याधुनिक पद्धतीने बनवण्यात आलेल्या या किटमुळे करोना चाचणीचा वेळ कमी होणार असल्याचा दावा माय लॅबने केला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
आठवडयाभरात एक ते दीड लाख टेस्ट किटचे आम्ही उत्पादन करु शकतो. जनतेसाठी उत्पादन क्षमता वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आयात केलेल्या किटच्या तुलनेत स्वदेशात बनवण्यात आलेल्या या किटची किंमत खूपच कमी आहे असे मायलॅबचे संशोधक रणजीत देसाई यांनी सांगितले.
“सीडीएससीओ/एफडीए या नियामंक संस्थांनी तात्काळ उचललेली पावले, आयसीएमआर, एनआयव्ही, केंद्र आणि राज्य सरकारांनी या इमर्जन्सीच्या काळात केलेले सहकार्य खरोखर कौतुकास्पद आहे. मेक इन इंडियावर भर देत राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने COVID- 19 चा किट बनवण्यात आला आहे. हा किट बनवताना जागतिक आरोग्य संघटना आणि सीडीसीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात आले आहे. विक्रमी वेळेत आम्ही हा किट बनवला” असे मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल यांनी बिझनेस टुडेशी बोलताना सांगितले.


शहरातील मायलॅब डिस्कव्हरी सॉल्युशंस कंपनीला या कोव्हिड-19 (कोरोना व्हायरस) टेस्ट किटसाठी सोमवारी वाणिज्यिक उत्पादनाची परवानगी मिळाली आहे. अशी परवानगी मिळालेली ही देशातील पहिली कंपनी आहे. कंपनीने एका वक्तव्यात सांगितले की, कोरोना व्हायरसची तपासणी करणारी त्यांची ‘मायलॅब पॅथोडिटेक्ट कोव्हिड-19 क्वॉलिटेटिव्ह पीसीआर किट’ केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संस्था (सीडीएसको) कडून वाणिज्यिक उत्पादनाची परवानगी मिळाली आहे.








मायलॅबला RTPCR किट बनवण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. ही भारतीय एफडीए / सीडीएससीओद्वारा अनुमोदित सुविधांवर किटची एक श्रृंखला निर्माण करते. मायलॅब भविष्यात ब्लड बँक / रुग्णालये आणि एचआयव्ही तपासणी, एचबीव्ही आणि एचसीव्ही किटसाठी आयडी-एनएटी स्क्रीनिंग किट बनवते. मायलॅबला COVID-19 गुणात्मक किट बनवण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडूनदेखील मान्यता मिळाली आहे.


मायलॅबचे कार्यकारी संचालक शैलेंद्र कावडे म्हणाले की, आम्ही आपल्या देशाला अत्याधुनिक टेक्निक आणि स्वस्त किमतीवर उपलब्ध करून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत. हे परीक्षण संवेदनशील पीसीआर टेक्निकवर आधारित असल्यामुळे, प्रथानिक स्तरावरील संक्रमणही हे डिटेक्ट करू शकते. ज्याची अचूकता उच्चतम आहे. हे आईसीएमआरमध्ये परीक्षणादरम्यान पहिले गेले.


भविष्यात भारत प्रति मिलियन लोकसंख्येवर केल्या गेलेल्या परीक्षणाच्या बाबतीत सर्वात खाली आहे. ही संख्या 6.8 आहे. याच्याशी निपटण्यासाठी भारत सरकारने जर्मनीहून लाखो परिक्षण किट आयात केल्या होत्या. दक्षिण कोरिया आणि सिंगापुर यांसारख्या देशांनी परीक्षणाची संख्या वाढवुहन कोरोनो व्हायरसच्या वाढत्या संख्येला यावर घातला. मायलॅबचा दावा आहे की, येणाऱ्या काळात ते एक लाख किटची निर्मिती एका आठवड्यात करू शकतील.













 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com