Top Post Ad

Lets_Crack_Corona... सावधानता हाच उपाय


Lets_Crack_Corona..


सगळं समजून घेण्यासाठी DNA आणि RNA यांच्या व्याख्या आणि अर्थ गूगलवरून समजून  आधी समजून घ्या. ( माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे). 


१. प्रोटीन म्हणजे काय? 
  खूप सारे अमिनो ऍसिड एकत्र येऊन जेव्हा हायड्रोजन बॉण्डने  (H-H) जोडले जातात तेव्हा प्रोटीन तयार होतात. सर्व enzyme प्रोटीन असतात. त्यासाठी केमिस्ट्री मध्ये एक वाक्य प्रसिद्ध आहे. "All enzymes are protein but all protein are not enzyme". 


२. व्हायरस म्हणजे काय? 
      Virus म्हणजे एक अतिशय सूक्ष्म, सजीव नसलेला, जैविक कण असतो. उघड्या डोळ्यांनी बघणं अशक्य पण मायक्रोस्कोप मध्ये पाहिला जाऊ शकतो. मग प्रश्न उद्भवतो कि, सजीव नसूनही त्यांचं प्रमाण कुठल्याही प्राणी किंवा वनस्पतीमध्ये कसे वाढते? Virus तर प्रजनन करत नाहीत मग त्यांच्या प्रति (copy) कशा तयार होतात? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कुठल्याही सजीव शरीरात (प्राणी किंवा वनस्पती) पेशींच विभाजन ( Cell Division) चालू असतं.. म्हणजे एका पेशीपासून दोन, दोनाचे चार.... असं. सजीवांच्या पेशींवर रिसेप्टर असतात. या रिसेप्टरला व्हायरस जाऊन चिकटतात. त्यानंतर ते सजीव पेशींमध्ये जातात. व्हायरस एखाद्या पेशीमध्ये जातो, तीच विभाजन चालूच असत आणि त्यामुळेच व्हायरसच्या एका सूक्ष्म कणापासुन खूप साऱ्या संक्रमित पेशी तयार होतात. 
        व्हायरस म्हणजे एक प्रोटीनच आवरण असते आणि त्या आवरणात असलेला DNA किंवा RNA. आपल्या पेशी नेहमी DNA च्या कॉपी बनवत असतात. त्याचप्रमाणे पेशीत गेल्यावर व्हायरस मधला DNA किंवा RNA पेशीतील इतर मटेरियल वापरून स्वतः च्या खूप साऱ्या प्रति बनवतो. यातील प्रत्येक प्रत म्हणजे एक नवा व्हायरस. एका पेशीतील मटेरियल संपलं कि, हे व्हायरस पेशीभित्तीका ( Cell Wall) फोडून बाहेर येतात. ज्या प्राण्याच्या शरीरात हे सर्व काही चालू असत, तो हळूहळू आजारी पडतो. हळूहळू संपूर्ण शरीरावर व्हायरसचा ताबा येतो. मग लस किंवा antidote मिळाला तर ठीक नाहीतर मृत्यू नक्कीच. व्हायरसचा DNA  प्राण्यांच्या DNA मध्ये घुसून DNA sequence बदलून अनुवांशिक बदल घडवू शकतो. 


३. व्हायरस सजीव नाही मग त्याला मारणार कस? 
      - व्हायरसला मारण्यासाठी प्रथमतः त्याच प्रोटीन आवरण नष्ट करणे गरजेचे असते. मग हे जर एखाद्या केमिकल किंवा द्रवाने होत असेल तर त्याचा उपयोग त्या Antiviral Drug मध्ये केला जाऊ शकतो. ते आवरण नष्ट झाल्यास व्हायरस कुठल्याही पेशीला चिकटत नाही व नष्ट होतो. 
      - एखाद्या व्हायरसला जर होस्ट मिळालाच नाही तर आपोआपच हवेत स्वतःहुन नष्ट होऊन जातो. 


४. लस काय काम करते?
      - माणसाच्या पेशींवर व व्हायरसच्या पेशींवर वेगवेगळे रिसेप्टर असतात. यामुळेच व्हायरस आणि माणसाच्या पेशींमध्ये Interaction होते. मग एका पेशीतून दोन, चार, आठ अस करत संपूर्ण शरीर संक्रमित होते.  
       काही लस या रिसेप्टरला inactive करून टाकतात. जर रिसेप्टर Inactive झाला तर दोघांमध्ये interaction होणारच नाही व व्हायरस नष्ट होऊन जाईल. 
काही लस व्हायरसच्या प्रोटीन आवरणाला तोडून टाकतात. त्यामुळे फक्त DNA किंवा RNA राहतात व कुठल्याही पेशींशी Interaction होत नाही व व्हायरस नष्ट होतात. 
 जर एखाद्या लसमुळे व्हायरसचा DNA किंवा RNA नष्ट झाला तर व्हायरस त्याच्या कॉपी तयार करू शकत नाही. 


# Coronaviris
१. कोरोना हे नाव का? 
      कोरोना हा गोलाकार (Spherical Structure) असतो. त्याच्या पृष्ठावर खूप सारे spikes ( काट्यासारख आवरण) असतात. एकंदरीत तो एखाद्या मुकुटासारखा (Crown) भासतो. लॅटिन भाषेत Crown ला कोरोना म्हणतात. म्हणून त्याच नाव कोरोना (Crown like appearance). 


# Covid-19_नामकरण.
Co- Corona
Vi- Virus 
D- Disease 
19- २०१९ मध्ये सापडला म्हणून १९. 
व्हायरस हे होस्ट स्पेसिफिक असतात म्हणजेच एका प्रजातीला बाधित करणारे व्हायरस दुसऱ्या प्रजातीला बाधित करतीलच असे नाही. म्हणलं जात कि, वटवाघूळामध्ये खूप सारे व्हायरस असतात. चीनच्या वूहानमधील ज्या लॅबमधून कोरोना सुटला अस म्हणलं जात आहे, त्याठिकाणी सुद्धा वटवाघुळांवर शोध कार्यक्रम चालू होते. वटवाघूळ आणि Pangelion ( खवल्या मांजर) या दोन प्राण्यांच्या शरीरात सापडणारा कोरोना हा सध्याच्या Covid-19 सारखाच आहे. 


प्राण्यांतून हा व्हायरस माणसांमध्ये कसा आला? 
हि गोष्ट सांगणे कठीण आहे परंतु पहिला अंदाज असा वर्तवला गेला आहे कि, वटवाघूळीच सूप पिल्याने, किंवा न शिजलेली वटवाघूळ खाल्याने हा व्हायरस माणसात आला असावा. चीनमध्ये काय काय खाल्लं जात हे आपल्याला ठाऊक तर आहेच. मग असाही अंदाज लावला जात आहे कि, वटवाघूळ खवल्या मांजरीने खाल्ले व खवल्या मांजरांना माणसांनी खाल्लं असल्यामुळे सुद्धा हा व्हायरस माणसात आलेला असू शकतो. परंतु या दोन्ही केस स्टडीला अजूनही कुणीसुद्धा सहमती दर्शवलेली नाही. 
 
Mutation म्हणजे काय?
     एखाद्या जिवाच्या जेनेटिक मटेरियल मध्ये अचानक झालेला अनुवंशिक बदल म्हणजे Mutation. ( मराठी शब्द ज्ञात नाही). परंतु Mutation एखाद्या व्हायरसमध्ये स्वतःहुन होणे फारच कठीण. एकतर हा व्हायरस एखाद्या केमिकल किंवा फिजीकल Mutagenic एजेन्ट च्या संपर्कात यायला हवा. उदा- UV किरण, EMS, Azide किंवा Acridine dyes सारखे केमिकल. जरी जेनेटिक ड्रीफ्ट झाली असेल तर खरच एवढी मोठी ड्रीफ्ट शक्य आहे का? 
         
 कोरोना जैविक हत्यार आहे का? 
नाही तर का? 
      - एखादा व्हायरस स्वतःच्या हाताने तयार करून जैविक हत्यार बनवण्याइतक तंत्रज्ञान अजून विकसित नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, २००३ ला आलेला SARS आणि २००८ ला आलेला MERS हे दोघेही कोरोनाच्याचमुळे आले होते. आता आलेला Covid-19 हा पण कोरोनाचा एक प्रकार आहे. ज्याप्रमाणे माणसांमध्ये वर्ण असतात त्याप्रमाणे व्हायरस मध्ये सुद्धा स्ट्रेन असतात. याला आधी n-Cov 2019  म्हणलं जात होत म्हणजेच कोरोनाचाच २०१९ साली सापडलेला नवा स्ट्रेन. 


आहे तर का? 
यावर लिहिताना सापडलेली एक माहिती, JNU मध्ये असणारे जेनेटिक इंजिनीरिंगचे प्रोफेसर आनंद रंगनाथन यांनी ३१/०१/ २०२० रोजी केलेली ट्वीट. त्या ट्विटमध्ये त्यांनी अस सांगितलं होत कि, कोरोना व्हायरसमध्ये सापडलेले चार प्रोटीन हे HIV/AIDS मधून Insert केलेले आहेत. Insertion हा देखील एका Mutation चाच प्रकार आहे. HIV आणि कोरोना यांची रचना पाहिली तर खूप प्रमाणत सारखीच दिसते. आणि ज्या रुग्णांमध्ये सुधारणा झाली त्यांना HIV च औषध आणि फ्लू च औषध एकत्र बर केल्याचं थायलंड येथील वैज्ञानिकानीं सांगितलं होत. चार प्रोटीन सारखे असल्याची माहिती हि Bioinformatics च्या मदतीने कळते. व्हायरसच वर्गीकरण करताना HIV हा Retrovirus मध्ये येतो तर कोरोना Rhabdovirus येतो. मग वर्गीकरणात वेगळे असलेले व्हायरस सारखेच प्रोटीन बनवतात ते पण एक सोडून चार. त्यात मुख्य म्हणजे दोघांचेही जेनेटिक मटेरियल RNA च आहे.
 यात दुसरी आणि लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे १ डिसेंबरला पहिला कोरोना रुग्ण चीनमध्ये आढळला आणि व्हायरस आल्याची बातमी संपूर्ण जगाला १७ जानेवारीच्या दिवशी कळली. याच ४७ दिवसात चीनने स्वतःसोबत जवळपास ६ देशात संक्रमण पोहोचवले होते. आता फक्त सहाच देश उरले असतील जेथे कोरोना पसरला नाही.
आणि जवळपास सर्वांचेच म्हणणे असे आहे कि,  कोरोना एक जैविक हत्यार आहे.


# जमेची_बाजू. 
१. रोग प्रतिकार शक्ती चांगली असल्यास कोरोनाची लागणं झालेले लवकर बरे होतात. 
२. मृत्यूदर (Mortality Rate) 
    १००० पैकी फक्त ३४ लोक मारली जात आहेत.
३. लस उपलब्ध नसली तरीही २५०००० पैकी ९०००० लोक बरी झाली आहेत आणि जवळपास ३५००० लोकांत सुधारणा झपाट्याने होत आहेत. 
४. वैज्ञानिकांना कोरोनाचा RNA आणि प्रोटीन वेगळं करण्यात यश आलं आहे. त्यामुळे लस लवकर तयार होईल पण टेस्टिंग वेळ जाईल.


# तर्कवितर्क भविष्यवाणी.
      # End_of_the_Days. २०१० साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात अशी वार्ता केली गेली आहे कि, २०२० साली एखादा रोग संपूर्ण विश्वव्यापून टाकेल. अचानक आलेला हा रोग अचानक नाहीसा सुद्धा होईल. १९८१ साली आलेल्या पुस्तकात सुद्धा असच भविष्य वर्तवल गेलं होत. परंतु या दोन्ही पुस्तकात कुठलाही उपाय सांगितला गेला नाही. 


नोट- उन्हामुळे कोरोनाचा विषाणू मरतो परंतु तो खुल्या हवेत असेल तर... जर एखाद्या शरीरात तो असेल तर त्याला काहीच होत नाही कारण आपली बॉडी त्याला कॅरियर म्हणून काम करते. सकाळच्या उन्हात अवश्य उभे रहा, ड जीवनसत्व मिळवा. पण कोरोना झालेला असल्यास तो मूर्खपणा करू नका.  आहारात क जीवनसत्व असलेल्या वस्तूंचा समावेश करा. स्वतःसोबत कुटुंबियांची काळजी घ्या. राज्य आणि केंद्र सरकारने दिलेले नियम पाळा ते आपल्यासाठीच आहेत. शक्य तितकं सहकार्य करा सरकारला. समाप्त
🙏🙏🙏
Received on WhatsApp Forwarded for information...
Stay Safe.. Stay Home..


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com