हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मुलभूत हक्कांसाठी आहे
20 मार्च महाडच्या प्रसिद्ध सत्याग्रहास देणगी देणारांची नांवे
सुडक्या हरी साळवे नांदवीकर 3
विट्ठल धर्मा वडवलकर 2
हरी भिकू हादे टोळकर 5
चंद्र्या बाळू वडवलकर 5
जिवाजी येसू हादे टोळकर 2
गंगाराम सुडक्या वलवलकर 2
सादू भिकू “ 2
शिवा संभू “ 2
बाळू राया बावेकर 3
गोविंद रामजी साळवे नांदवीकर 3
पांडू येसू फलानकर 3
पांडू शिवा संदेरीकर 3
भिकू बाबाजी गोवेलकर 2
सदू सूभान्या धीवलकर 2
शिवा लक्ष्मण “ 2
गंगाराम शिवा नांदवीकर 2
गोपाळ लक्ष्मण पुराटकर 2
भाग्या बाजी नांदविलकर 2
देऊ लक्ष्मण ताम्हणकर 2
धोंडू गुणाजी सोनधरकर 2
गंगाराम तुकाजी माजरुनकर 1
लक्ष्मण कानु आळसूंदकर 1
हरी शिवा लेपकर 1
कृष्णा धर्मा शिलीमकर 1
भिकू लक्ष्मण टोळकर 1
चांगु राघो धवीलकर 1
बाळू माळू गोईलकर 1
बाळू गणू फलानकर 2
पांडू राघो तारणेकर 1
बाळकनाथ मांडविकरबुवा 2
भाग्या बाळू हारकोळकर 2
लक्ष्मण राजू फलानकर 2
गुण्या राज्या नांदवीकर चांभार 1
तुकाराम रामा वडवलकर 2
तुकराम शिवराम टोळकर 1
विट्ठल भागू वडवलकर 2
भांबू गिकू शिरलीकर 2
फडकू कमळाजी गोईलकर 2
भिकू काळू “ 2
तुकाराम चांगू गोईलकर 2
तुकाराम धोंडू सापेकर 2
चांगू रामा आळसूंदकर 1
दामाजी दाजी “ 1
संभू गोविंद सापेकर 2
बाळाजी धर्मा वागांवकर 1
वेशा रामजी शिलीमकर 1
सखाराम देऊ नांदवीकर 1
रामजी भागू गोईलकर 1
राघो कावजी धवीलकर 1
बाळू भाग्या वडघरकर 1
सोनू बाळू हारकोळकर 2
सुडक्या धर्माजी जोशी 2
बाबू माळू “ 1
काशिराम विठ्ठल “ 2
धोंड्या धाक्या नांदवीकर 4
गांवाचे नाव म.पा. रु.आ.
बदली 1-6 1-8
तारणे 1-0 1-0
वडवली 3-0 2-0
वाकी 1-0 1-0
काचले 1-0 1-0
पुरार 1-6 1-8
शिंगवली 1-0 1-0
नांदवी 1-0 1-0
केस्तूडी 1-6 1-8
भांडवली 1-6 1-8
टोळखुर्द 1-6 1-8
खामगांव 1-6 1-8
टोळबुदरूख 3-6 3-8
सापे 1-0 1-0
दाभोळ 1-6 1-8
कोंकरे 1-0 1-0
आंबेत 2-0 2-0
संदेरी 2-0 2-0
वावे 2-0 2-0
कुडगांव 0-0 1-0
आढाढणे 2-0 2-0
पानदारे 1-0 1-0
पाजती 1-6 1-8
कनघर 1-0 1-0
वडघर 1-0 1-0
फलसप 1-0 1-0
हारकोळ 3-0 3-0
सोनघर 1-0 1-0
ताम्हणे 1-0 1-0
फलाणी 2-0 2-0
नवशी 0-6 1-0
वागांव 1-6 1-8
गोवेली 2-0 2-0
लेप 0-0 2-0
वागणी 2-0 2-0
चांढोरे 2-0 2-0
कुडतुरी 0-0 0-8
मुद्रे 1-0 1-0
माजरुणे 1-6 1-8
शिलीम 1-6 1-8
आळसुदे 1-0 1-0
वरील यादी पाहून आपणास आश्चर्य वाटले असेल. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत देखील बाबासाहेबांच्या एका हाकेवर अशा पद्धतीने लोकांनी देणग्या दिल्dया. या देणग्या माणूसकीच्या जाणीवेतून होत्या. 20 मार्च 1927 रोजी बाबासाहेब पिढ्यान पिढ्या गुलामगिरीत खितपत पडलेल्dया लोकांना नव्या पहाटेकडे नेणार होते. आपल्dया हक्काची जाणीव करुन देणार होते. या जाणीवेतूनच कोकणातील अनेक गावातून विविध प्रकारच्या देणग्या आल्dया होत्या त्यातली ही काही नावे.
सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेब आपल्dया भाषणात म्हणाले होते. ’महाडचें हें तळें सार्वजनिक आहे. महाड येथील स्पृश्य लोक इतके समजूतदार आहेत कीं, ते माणसाला त्या तळ्याचें पाणी भरण्यास त्यांनीं मुभा ठेविली आहे. व योनीपेक्षां कमी मानलेल्या पशुपक्ष्यादि योनींतील जीवजंतूंस या तळ्यावर पाणी पिण्यास ते हरकत करीत नाहींत. इतपेंच नव्हे तर अस्पृश्यांनी बाळगिलेल्या जनावरांना देखील ते खुशाल पाणी पिवूं देतात. स्पृश्य हिंदुलोक दयेमायेचे माहेर घर आहेत. ते कधीं हिंसा करीत नाहींत व कोणाचा छळ करीत नाहींत. उष्ट्या हातानें कावळा न हाकणाऱया कृपण व स्वार्थी लोकांचा हा वर्ग नाहीं. साधु संतांची व याचकांची झालेली बेसुमार वाढ ही त्यांच्या दातृत्वाची जागती जोत साक्ष आहे. परोपकार हें पुण्य आणि परपीडा हें पाप अशी त्यांची वागणूक आहे. इतकेंच नव्हे तर ’दिधले दुःख परानें उसनें फेडूं नयेचि सोसावें।“ हा त्यांचा स्वभावधर्म आहे. आणि म्हणूनच गाईसारख्या निरुपद्रवी प्राण्याला जसे ते दयेनें वागवितात तसे सर्पासारख्या उपद्रवी कृमी कीटकांचीहि ते रक्षा करतात. अर्थात् ’सर्व भुति एक आत्मा“ असें त्यांचें शील आहे. असे हे स्पृश्य लोक आपल्याच धर्मातील कांहीं मामसांना त्याच चवदार तळ्यांतील पाणी घेण्यास बंदी करितात ! ! तेंव्हां आपणांसच ते बंदी कां करितात असा प्रश्न कोणाच्याही मनांत उद्भवल्याखेरीज राहणार नाही. या प्रश्नांचें उत्तर काय आहे हें सर्वांनीच नीट समजून घेणें अत्यंत जरुरीचें आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व अतिशूद्र. वर्णव्यवस्था हा हिंदुधर्माच्या यम नियमाचा पहिला नियम आहे. त्याच धर्माच्या यमनियमाचा दुसरा नियम असा आहे कीं, हे वर्ण असमान दर्जाचे आहेत. एकापेक्षा दुसरा हलका अशी त्याची उतरती मालिका आहे. या यमनियमाप्रमाणें नुसते दर्जे ठरुन गेले आहेत, इतकेंच नव्हे तर कोण कोणत्या दर्जाचा आहे हें ओळखितां यावें म्हणून प्रत्येक वर्णांची मर्यादा ठरवून टाकिलेलीं आहे. हिंदुधर्मांत बेटीबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी व भेटीबंदी या परस्परांतील नुसत्या सहवासाच्या मर्यादा आहेत, असा सर्वसाधारण समज आहे. पण हा समज अपुरा आहे, कारण या पंचप्रकारच्या बंदी या सहवासाच्या मर्यादा तर आहेतच, पण त्या असमान दर्जाच्या लोकांना त्यांचा दर्जा कोणता हें दर्शविण्याकरितां घातलेल्या आहेत. अर्थात् या सहवासाच्या मर्यादा म्हणजे असमानतेची चिन्हें आहेत. जसें डोक्यावर मुकुट असला म्हणजेतो राजा समजला जातो, हातांत धनुष्य असलें म्हणजे तो क्षत्रिय ओळखला जातों. तसेंच ज्याला या पंचबंदापैकी कोणताच धरबंद नाही तो वर्ग सर्वांत श्रेष्ट समजला जातो. व ज्याला या चारी बंदांनी बांधून टाकलें आहे त्या वर्गाचा दर्जा सर्वांत हीन मानला जातो. या पंचबंद्या कायम राखण्यासाठी जी एवढी धडपड करण्यांत येते ती एवढ्याच करितां कीं, तसें झाल्यानें धर्मानें ठरवून दिलेली असमानता मोडून तिच्याऐवजीं समता प्रस्थापित होईल.“
पण आज आपण पाहिले तर कायद्याने समानता प्रदान केली असूनही आपणास सगळीकडे विषमताच दिसून येते. याला कारण आपणच आहोत. विजयादशमी दिनी आपण नवीन जन्म घेऊनही जुन्याच चालीरिती व्यापून आहोत. म्हणूनच गेल्dया 47 वर्षात आपली म्हणावी तशी प्रगती झालेली दिसत नाही. महाडचा संगर हा केवळ पाण्याचा नसून धर्मसंगर होता. अस्पृश्यतेविरुद्ध चळवळ होती. मात्र आजही अस्पृश्यता तेवढीच कायम आहे हे मागील काही घटनावरून आपणास दिसून येत आहे. गाय मारली म्हणून दलितांना मारले, बिहारमध्ये उच्चवर्णियांच्या प्रक्षोभाला नेहमी सामोरे जाणारे दलित त्यांची हत्या. एवढेच काय मागील महिन्यात औरंगाबाद या ठिकाणी रा.स्व.सं.निर्मित तथाकथित भारतमातेच्या प्रतिमेची पुजा करण्यास मज्जाव केल्dयामुळे नऊ युवकांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेही वैद्यकिय महाविद्यालयात. शासक्यी वैद्यकिय महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वादातून या विद्यार्थ्यांच्या खोल्dया पेटवून देण्यात आल्dया त्याच त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे, पुस्तके, कपडे आणि जिवनावश्यक वस्तू नष्ट झाल्dया डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशन (दामा) आणि रा.स्व.संघ प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोन विद्यार्थी संघटनेत ‘महाविद्यालयाच्या वार्षिक महोत्सव प्रसंगी रा-स्व-संघ निर्मीत तथाकथित भारतमातेच्या प्रतिमेची पूजा करण्यास आंबेडकरवादी तरुणांनी नकार दर्शविल्dयामुळे’ प्रकरण मारहानी पर्यंत गेले आणि त्यातूनच या पिसाळलेल्dया भटशाहीच्या लांडग्यांनी हा क्रुर प्रकार केला. मात्र कालपर्यंत पँथरचे वाघ असणारे आज आपली शेपटी पोटात घेऊन निपचीत कुणाच्यातरी दावणीला बांधून पडले आहे.
असे प्रकार संबध भारतामध्ये प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे घडत आहेत. परंतु समाजाचा एकसंघपणा नसल्dयामुळे शत्रू आमच्या उरावर बसला आहे. शिका-संघटीत व्हा-संघर्ष करा असा महा संदेश बाबासाहेबांनी आपल्dया अनुयायांना दिला. मात्र आम्ही त्याचा विपर्यास केला. शिका म्हणाले तर आम्ही जेमतेम लिहीता वाचता येईल येवढे शिकलो. ज्या गोष्टी शिकावयास पाहिजे त्याच्यापासून मात्र आम्ही कोसो दुर राहिलो. त्यामुळे सामाजिक बांधीलकी विसरून आम्ही संघटीत व्हा या महा संदेशाला केव्हाच तिलांजली दिली. त्याचा परिणाम आम्ही आपआपसातच संघर्ष करु लागलो. केवळ एका अविद्येने आमचे केवढे मोठे नुकसान केले. याची जाणीव आजही आम्हाला नाही. क्रांतिबा फुले देखील म्हणाले होते.
‘विद्येवाचून गती गेली, गती वाचून निती गेली,
नितीविणा शुद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले.’
शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील कारकुनी शिक्षण नव्हे तर समाजाला दिशा देणारे शिक्षण जे बाबासाहेबांनी घेतले. आणि नवीन समाज घडविला. मात्र आम्ही त्यांचे अनुयायी पुन्हा ‘येरे माझ्या मागल्dया’ सारखे वागू लागलो आहोत.
गेल्dया 45 वर्षातील प्रत्येक वर्षाचा आढावा घेतल्dयास केवळ मुंबईपुरतेच बोलायचे झाल्dयास प्रत्येक वर्षी बाबासाहेबांच्या जयंतीनिमीत्त कित्येक कोटी रुपयांची उलाढाल होते. लाखो संस्था, मंडळे बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. अगदी महिना-दोन महिने हा कार्यक्रम चालू असतो. सरासरी प्रत्येक मंडळास 25 ते 30 हजाराचा खर्च धरल्dयास आपणच अंदाज लावावा केवळ मुंबई शहरात जयंतीनिमित्त किती खर्च होत असावा. बाबासाहेबांना हेच अपेक्षित होते का? तसं पाहिलं तर आपला समाज जैन समाजासारखा उद्योगधंद्वालाही नाही. महापालीका किंवा तत्सम खाजगी उद्योंगद्यांत कोठेतरी बारा-बारा तास काम करुन आपला उदरनिर्वाह करणारा समाज. तरीही एवढा प्रचंड खर्च तोही पहायला गेलो तर वायफळ करीत आहे.
आज बौद्धजन पंचायत समितीच्या मध्यवर्ती शाखेची इमारत जिचा आराखडा गेली दहा वर्षापासून समिती देत आहे, किंवा शेड्यूल कास्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या नियोजित इमारतीचा आराखडा तोही गेल्dया अनेक वर्षापासून त्यांच्या प्रसिद्धी पत्रकावर देण्यात येतो. शिवाय गेल्dया चार वर्षापासून जागतिक किर्तीचे भदन्त राहूलबोधी यांनी संकल्पिलेले चार मजली भव्य बुद्धविहार जे संपूर्ण मुंबईची शान असेल. अशा संस्था आणि त्यांच्या कार्याकडे मात्र आम्ही जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसतो. कारण ते आमच्या ध्यानीमनीही नसतं.
मागील काही महिन्यापूर्वी एक संबंध खेडेगाव स्वतला सवर्ण समजणाऱया लोकांनी पेटवले. त्यात अस्पृश्य लोकांची प्रचंड हानी झाली त्यांना दुसऱयादिवशी जेवण्यास देखील अन्न नव्हते. अशा वेळेस जर आपल्dया समाजाचा एकत्रित कुठेतरी फंड असता तर आपण ताबडतोब जाऊन ते संपूर्ण गाव पुन्हा बसवलं असतं. पण आमचा पैसा नाहक कुठेतरी व्यर्थ खर्च होत असल्dयाकारणाने आम्ही हे करु शकलो नाही. तेव्हा आताही वेळ गेलेली नाही. आज करे सो अब कर या उक्तीप्रमाणे आपण येणाऱया पीढीसाठी काही करणं काळाची गरज आहे. कोकणातील मंडळींनी नेहमीच्या खर्चातील पै-पै काढून बाबासाहेबांच्या या प्रचंड कार्यास मदत केली. कारण त्यांना नव्या युगाची आस होती. आम्ही मात्र नव्या युगात जन्म घेऊन देखील आम्हाला जुन्याच युगाची आस आहे की काय असे वाटू लागले. आहे.
आज मुंबईतल्dया सर्व संस्था मंडळांनी थोडेतरी मनावर घेतले की जयंती अगदी साधेपणाने साजरी करायची आणि तोच पैसा या प्रचंड कार्यासाठी खर्च करायचा तर भारत तर दूर राहिला परंतु मुंबई तरी आपण बौद्धमय केल्dयाशिवाय राहणार नाही.बाबासाहेब म्हणत,‘माझी जयती साजरी करु नका, तो पैसा समाजाच्या हिताकरिता, इमारत फंड शाळा, कॉलेजेस तसेच बुद्धविहार व गरजूंना योग्य मदतीकरिता खर्च करा. सहकारी तत्वावर मिशनरी पद्धतीने धम्मप्रचार व उद्योगधंदे सुरु करा.’
- सुबोध शाक्यरत्न
0 टिप्पण्या