Trending

6/recent/ticker-posts

'आबासाहेब ' पाहीलीत का आपली षंढ माणसं !

मृत्युंजय अमावस्या.... रक्तरंजित पाडवाअमावस्येच्या इतिहासातील चित्तथरारक, अंगावर शहारे आणणारा, मन व्यथित करुन टाकणारा हाच तो काळा दिवस !  ३२५ वर्षापूर्वी तुळापूरच्या मातीत रक्तरंजित इतिहास घडला ! ११ मार्च १६८९ हाच तो दिवस होता !  मनुस्मृतीच्या कायद्याची अंमलबजावणी आज तंतोतंतच झाली होती, याच दिवशी संभाजीराजाच्या देहाचे लचके तोडले गेले ! रक्ताच्या रंगपंचमीने मनुवाद्यांनी शिमगा साजरा केला, 
इंद्रायणी-भिमातीरी मृत्युचा सोहळा:
शंभुराजांच्या तेज:पुंज शरीरातील शूर रक्त आज इंद्रायणीत सांडलं !
ही इंद्रायणी या वीर मरणाची एकमेव साक्षीदार !
आज तीही पावन झाली होती, 
थरारली होती... कारण तिच्या काठावरच, भाल्याच्या टोकावर शंभुराजांचं मस्तक अडकवून  'गुढी' उभारली गेली होती, शरीराचा सापळा टांगून त्या भोवती कडुलिंबाची पानं बांधली होती. व इथूनच ही परंपरा आपल्या घराघरात घुसली...
............. ती कायमची !
षंढासारखी 'गुढी' आजही आम्ही उभारतो व शंभूराजाच्या बलिदानाची टिंगल करतो.
गुढीपाडवा: समज व प्रचलित रुढींची समीक्षा: गुढीपाडव्याच्या बाबतीत अनेक मतमतांतरे आहेत.
राम विजयी होऊन आले म्हणून गुढ्या उभारल्या,असे काहींचे म्हणणे आहे. जर या विधानात तथ्य असेल तर हा सन महाराष्ट्रापलीकडे कुणा राज्यात का साजरा होत नाही ?
दूसरे एक मत सांगितलं जातं ते असं, की-
"टाळी वाजवावी। गुढी उभारावी । वाट ती चालावी। पंढरीची ।। "
हा संत चोखोबा यांचा अभंग १२ व्या शतकातील, ज्यामध्ये  'गुढी' शब्द आला आहे. वारकरी धर्मामध्ये पंढरीच्या वाटेवर भगवे पताका खांद्यावर घेण्याचा चोखोबा 'गुढी' संबोधतात !
चोखोबांची गुढी ही उलटा गडवा नव्हे !
तिसरे मत- आणखी असं सांगतात, की हा सण पूर्वापार चालत आलाय. संभाजीराजांच्या बलिदानाशी याचा काही संबंध नाही. पूर्वापार चालत आलेला म्हणून  ग्राह्य धरु या; पण शिवरायांच्या शहाजीराजांच्या काळात कधीही हा सण साजरा झाल्याची नोंद इतिहासात का  नाही. वरील मत-मतांतराचा स्पष्ट अर्थ आहे, की मानवतेच्या मारेकर्यांनी या दिवसाला उत्तेजन देण्यासाठीच चैत्र प्रतिपदा निवडली. ४० दिवसामध्ये महाराजांना ते कधीही ठार करु शकले असते. तत्कालिन बखरकार 'भिमसेन सक्सेना', 'ईश्वरदास नागर ' यांनी शंभुराजांच्या कैदेबाबत इतिहासात तारीखवार नोंद केली आहे, त्यांच्या मते १ फेब्रुवारी १६८९ ला महाराज संगमेश्वरी कैद झाले, तिथून त्यांची राजवस्त्र, जिरेटोप काढून 'कख्ता कुलाह' म्हणजे विदूषकी कापड, लाकडी टोपी चढविली गेली. 
कवी कलषासमवेत ६ दिवस त्यांची जाहीर धिंड काढली गेली, ७ फेब्रुवारीस रक्तबंबाळ शरीर, लोखंडी साखळदंडामध्ये कैद करुन वडू व तुळापुर येथील संगमेश्वरावर औरंगजेबासमोर हजर केले गेले, इतके दिवस त्यांच्या पोटात पाण्याचा एक थेंब व अन्नाचा एकही कण नसताना निधड्या छातीने शंभुराजे औरंगजेबास भिडले त्याच्यासमोर यत्किंचितही मान न झुकवता त्याने विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अजिबात दाद दिली नव्हती .
त्या प्रश्नांचे स्वरुप-
१) माझ्या फितूर झालेल्या साथीदारांची नावे ...व  २) खजिन्याच्या किल्यांचा पत्ता सांग
मात्र वजीर आसदखानास शंभुराजांनी मोठ्या हिंमतीने झुकविले. औरंगजेबही झुकल्याचे कलशा कवीने काव्यात रेखाटले ते असे-
" पापी रावण की सभा ।  संभु बंध्यो बजरंग ।
लहू लखन सिंदूर सम ।  खुब खेल्यो रणरंग ।।
राजन तुम होतांव खरे ।  क्या खुब लढे हो जंग ।
तव-तुप तेज निहारी के । तखत त्यजत अवरंग ।।"
९ फेब्रुवारीस महाराजांचे डोळे मस्तकाच्या पात्रातुन तप्त सळयांनी वेगळे अलग केले गेले,
१२ फेब्रुवारीस लोखंडी सांडशीने जीभ उखडली गेली.
१३ तारखेस कानामध्ये तापलेले शिसं ओतलं गेलं.
नंतर हातापायाची नखं काढली गेली.
अंतत: शरीर तलवारीच्या टोकाने सोललं गेलं.
त्यावर गरम मीठाचं पाणी टाकून शरीराला यातना दिल्या गेल्या व गुडघ्याच्या कटोर्या काढून त्यांचे हातपाय तोडले गेले,
अशा अवस्थेतही शंभुराजे जिवंतच होते. २० फेब्रुवारी ते ११ मार्च पर्यंन्त धर्माचे ठेकेदार का थांबून होते ? त्यांचा शिरच्छेद त्यांना २० फेब्रुवारीलाच करायला हवा होता; मात्र ते मुद्दाम थांबले ते ११ मार्चच्या अमावस्येसाठीच !
रक्ताचा पाडवा साजरा करायला.
शंभुहत्येतील मूळ आरोपी कोण ?
शिर्के ?...की, रंगनाथ स्वामी ??
गणोजी शिर्केंनी शंभुराजांना पकडून दिल्याचे अनेक लेखकांचे मत आहे; शिर्क्यांच्या कन्या येसुराणीबाई साहेबांच्या हाती स्वराज्याची सुत्रे शंभुराजांनी दिलेली आहेत हा विषय इथे सध्या बाजूला ठेवू या.
प्रश्न हा येतो, की संगमेश्वराच्या कैदेप्रसंगी संभाजीराजेंसोबत पुढील निवडक सहा माणसे होती.
त्यांची नावे -
संगमेश्वराचे सेनापती म्हालोजी घोरपडे ,
दुसरे कवि कलश ,
खंडो बंल्हाळ,
संताजी, धनाजी व
सहावा रंगनाथ स्वामी !
मुकर्रब खान संगमेश्वरावर चाल करुन आल्याची वार्ता समजताच अत्यंत संयमाने सहाही जणांना एकत्र बोलावून महाराजांनी त्यांना युध्दास सज्ज राहून फळी फोडून आपआपली सुटका करुन पुढच्या मुक्कामाची दिशा ठरविली. ठरल्याप्रमाणे पहिल्या प्रहरी रात्रीस युध्दास सुरुवात झाली व वृध्द घोरपडे स्वराज्याच्या कामी आले .
दुसर्या फळीत संताजी-धनाजी फळी मोडून बाहेर निसटले.
तिसर्या फळीत कवी कलष
तर
दस्तूरखुद्द संभाजीराजे चौथी फळी मोडून निघाले;
पण रंगनाथस्वामी कुठेच कसा नव्हता? तो नेमका बिकट क्षणी कुठे होता ?
संभाजीराजांच्या मरणसोहळ्यात तो औरंगजेबाच्या अखत्यारीत कसा ?
कारण....
त्यानेच मुकर्रबखानास शरण येऊन , फळी फोडून निसटून गेलेले संभाजीराजे जुन्या मंदिरात लपून बसल्याची खबर दिली म्हणूनच मुकर्रबखानचा वजीर आसदखान याने त्या पडक्या मंदिरास वेेढा दिला व शंभुराजे रंगनाथाकरवी पकडले गेलेत.. पण इतिहासकारांनी गणोजी शिर्केंना खलनायक दाखवले.
रंगनाथाचा शोध :
रामदासाच्या शिष्यसंप्रदायातील एक प्रमुख म्हणजे रंगनाथ
११ मार्चच्या हत्येनंतर साधा उल्लेखही कुठेच आला नव्हता, कारण शंभुराजांच्या हत्येनंतर ६४ भटांच्या घरांची तानाजी व धनाजी यांनी तुळापूरला राखरांगोळी केल्याची नोंद ' रक्तरंजित तुळापूर ' या दुर्मिळ पुस्तकात आहे .
या घरातील एक घर मुरार जगदेवाच्या वारसाचं आणि रंगनाथ स्वामीच !
हा रंगनाथ स्वामी पुढे पळून गेला व गोंडवन राज्याच्या अखत्यारीत चंद्रपूर परिसरात आल्याची शक्यता आहे.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये चंद्रपूरच्या परिसरात वणी हे तालुक्याचं ठिकान असून रंगनाथ स्वामीची समाधी याच ठिकाणी आढळते, ' वणी ' येथे रंगनाथस्वामीच मंदिर असून त्या समाधीची बांधणी ही १७ व्या शतकातील असावी.
दरवर्षी रंगनाथस्वामीची फाल्गुन शुध्द एकादशीस वणी येथे यात्रा भरते. फाल्गुन शु. एकादशीस रंगनाथ स्वामी वणीत दिसला, म्हणजे त्याच तिथीवर प्रकट दिन साजरा होतो, संभाजीराजांची हत्या फाल्गुन वद्य अमावस्येला, एकाच महिन्यात हे दोन प्रकार घडले आहेत. आता रंगनाथस्वामीचा शोध घेणे गरजेचे असून शंभुराजांच्या कैदेप्रसंगी महत्वाची भूमिका बजावणारा ....
त्याचा उत्सव जर होत असेल,
तर संभाजीराजांच्या बलिदानाशी ही सरळ बेईमानी होतेय असाच त्याचा सरळ अर्थ निघतो,
रंगनाथावर आणखी पक्के संशोधन होणे गरजेचं असून  'वणी' तील रंगनाथस्वामीशी शंभुचरीत्राचा संबंध असल्यास निश्चितच त्यावर मंथन व्हावे!
पाडवा तरुणांनी साजरा करावा का ?
गुढी पाडवा हा सण असू शकतो का ?
आईची साडी चोळी घरावर टांगणे मानवधर्माला धरुन आहे का ?
वढू व तुळापूरला गुढीपाडवा का साजरा होत नाही ?
शिवले- भांडारे व शिरसाट ही तुळापूरांतील बौद्ध व मातंग समाजातच आडनावे का आढळतात?
शिख समाज 'गुरु गोविंदसिंगांच्या' बलिदानातून प्रेरणा घेतो, तिथं सचखंड गुरुद्वारा उभारला जातो, तसं आपण आपल्या शंभुराजांच्या बलिदानाचं पावित्र्य जपतो का ?
बांधवांनो शंभुराजांच्या बलिदान दिनी आपण टोकाचा विरोध स्वीकारुन  गुढीची अपमानी परंपरा बदलवू व सुर्योदयसमयी, येणार्या पाडव्यास, अत्यंन्त साध्या पध्दतीने , गोडधोड न खाता स्टीलच्या रॉडवर एकपाती भगवा ध्वज, कलशामध्ये रोवून प्रत्येकाच्या निदान आपल्या तरी घरावर स्वाभिमानाचा, शौर्याचा, बलिदानाच्या परंपरेला भावपूर्ण मानवंदना देऊन भगवा फडकवू या!
तुम्हाला माझ्या शंभुराजांच्या बलिदानाची शपथ !
चला स्वराज्याच्या धाकल्या , धन्याचे वीर वारस होऊ या, 
नाहीतर शंभुराजे आज म्हणतील.
'आबासाहेब ' पाहीलीत का आपली षंढ माणसं !
अहो , स्वराज्याच्या बलिदानाचंही  यांनी भांडवल केलं !
यांना कुणीही सांगितलं तरी ते हेकेखोरपणे रूढीला चिटकून बसतील ! धर्माची ओळख देतील ! याच धर्मीयांनी आम्हाला  "धर्मवीर" म्हणून  कायमचं संपवून टाकलं ! आमचं बलिदान हे स्वराज्यासाठी झालं, म्हणूनच शेवटच्या क्षणीही, मिर्जाखान हा आमच्याशी इमान राखून राहीला !
शहजाद्या अकबराने आमचे प्राण वाचविले !
आमच्या प्रेताचे संस्कार इथल्या महारांनी केले !!!
मात्र ज्यांनी आमचा वारसा सांगितला ते आम्हाला समजू शकले नाहीत !!
शेवटी या षंढामध्ये काही बाणेदार निपजतील आबासाहेब !!
तीच मानसं स्वराज्याची खरी वारस असतील !


भूमिका :
अमोल मिटकरी यांच्या संदर्भातून


--------------------------


 


या वर्षांपासून गुढी उभारायची नाही
        आम्ही  "गुढीपाडवा "या सणाच्या इतिहासात थोडे डोकावून पहाणार आहोत .
     १.गुढीपाडवा हा सण संभाजी राजांच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवसापासून सुरु झाला त्या पुर्वी कधीच गुढ्या ऊभारल्याचा इतिहास नाही.
     २.शिवरायांच्या गुढ मृत्यूची संभाजी राजांनी शहानिशा केल्यावर त्याला जबाबदार असलेले तीन ब्राम्हण मोरोपंत पिंगळे,अण्णाजी दत्तो ,राहू सोमनाथ यांना हत्ती च्या पायाखाली दिले.
 ३.भारतात पहिल्यांदाच ब्राम्हणाला दंडित केले गेल्या चा राग मनात धरुन ब्राम्हणांनी कट-कारस्थान करुन संभाजी राजांना पकडून दिले.
४.संभाजी राजांचा मृत्यू आदेश औरंगजेबाने जरी दिला होता पण त्याच्या अंमलबजावणी चे काम ब्राम्हण मंत्र्यांकडून झाले म्हणून ब्राम्हणांनी मनुस्मृती नुसार डोळे फोडणे,कानात शिसे ओतणे,जिभ कापणे या सारख्या अनेक शिक्षा फर्मावल्या अशा प्रकारच्या शिक्षा मुस्लिमांच्या कोणत्याही धर्मग्रंथात नाही हे लक्षात घेणे गरजेचं आहे .
५.संभाजींना हालहाल करुन मारल्याने बामणं इतके आनंदित झाले कि त्यांनी हत्ती वरुन साखर वाटली.त्या नंतर संभाजी चे शिर तलवारी च्या टोकावर घेऊन परिसरात फिरलेत.
६. रयतेचं राज्य संपवून यशस्वी पणे पुन्हा ब्राम्हण राज स्थापन झाल्याचा तो इशारा होता 
    हा ब्राम्हणांंचा विजय दिवस आहे म्हणून याबाबत बामणं जास्त आग्रही असतात .या विजय दिवसाचे प्रतिक म्हणून "गुढी" ऊभारली गेली .
  👇👇👇
१. घट किंवा तांब्या जो नेहमी सरळ ठेवणे शुभ मानले जाते तो मात्र पाडव्याला उलटा ठेवला जातो हे संभाजी राजांच्या शिरा चे प्रतिक आहे.
२.गुढी बांबू पासून बनलेली असते ,धर्मशास्त्रात बांबू चा वापर प्रेतासाठी करतात .
३.कोरे कापड आणि लिंबाची पाने हे देखील प्रेतासाठी वापरतात 
  मग या गोष्टी शुभ कशा ? 
तर गुढी हे बामणांच्या विजयाचे प्रतिक आहे.
          गुढीपाडवा फक्त महाराष्ट्रात साजरा केला जातो .महाराष्ट्राबाहेर  कोठेही साजरा केला जात नाही.आपल्याला सांगितलं जातं रावणाच्या पाडावानंतर रामाने अयोध्या येथे प्रवेश केला तेव्हा लोकांनी गुढ्या ऊभारुन स्वागत केले पण उत्तर प्रदेशातील लोकांना  गुढि बाबतीत काहिही माहीत नाही याबाबतीत आपल्या यु.पी.मधिल मित्राकडे खात्री करु शकता.अट एकच तो ब्राम्हण नसावा .
संभाजी महाराज आपले पुर्वज आहेत आणि पुर्वजांचा मृत्यू दिवस आनंदाने साजरा करावा असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल गुढ्या ऊभारा आणि बामणांनी आयोजित केलेल्या शोभा यात्रेत जरुर सहभागी व्हा.
                  
--- प्रा.नितीन बानगुडेपाटील( सातारा )


Post a Comment

0 Comments