अखेर संजीव जयस्वाल यांनी सोडला ठामपा आयुक्तपदाचा पदभार
ठाणे :
आपल्या कारकिर्दीत सदैव चर्चेत असलेले ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त संजीव जैसवाल यांनी आज ४ मार्च रोजी आपला पदभार सोडला. मागील अनेक दिवसांपासून आयुक्तांच्या पदभाराविषयी ठाण्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. अखेर जयस्वाल यांनीच आज महापालिकेत प्रसिद्धीमाध्यमांद्वारे या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
मागील काही दिवसापूर्वी आयुक्त आणि अधिकाऱ्यांमधील व्हॉट्सअॅपवर झालेला वादाने महापालिकेत चांगलाच चर्चेचा विषय झाला होता. यावर आयुक्त व्यथीत झाले होते. आयुक्त जाण्याच्या तयारीत असल्यामुळेच त्यांनी अशा चर्चां घडवून आणल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांना सहा महिने वाढीव मुदत मिळत असल्याची बातमीही चर्चेला होता. या सर्व चर्चांना उत्तर देतांना आयुक्तांनी स्वत:च मी हे पद सोडत असून यापुढे मन:शांतीसाठी धर्मशाळा, ऋुषीकेशला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
पाच वर्षे 2 महिने ठाण्यासाठी खुप केले, स्वप्नातही ठाण्याच्या विकासाची स्वप्ने पाहिली. ठाणोकरांनी दिलेल्या प्रेमामुळेच मी हे करु शकलो. या कार्यकाळात काही कामे अपूर्ण राहिली असतील काही चुका झाल्या असतील, त्या मी मान्य करतो. परंतु आता मी माङो पद सोडत असल्याचे त्यांनी जाहीर केले आणि जाता जात ते भावूक झाले. मागील पाच वर्षे 2 महिने ठाण्याच्या विकासासाठी रस्ते रुंदीकरण, विविध महत्वांकाक्षी प्रकल्प आणले, काही प्रकल्प पूर्ण झाले काही अपूर्ण राहिले आहेत. काही प्रकल्पांवरुन एकमत झाले तर काही प्रकल्पांवरुन मतभेदही झालेले आहेत. मात्र हे मतभेद वैयक्तीत नसुन त्यात वैचारिक होते. कदाचित मी त्यांना समजवू शकलो नाही किंवा ते त्यांनी ते समजून घेतले नसावे त्यामुळेच वाद झाले. मात्र यामधे कुणाचे नुकसान करणे किंवा मन दुखावणे असा काही हेतू नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या